• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

घ्या समजून राजे हो…..नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात भाजप आणि रा. स्व. संघावर येणारी जबाबदारी……ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
April 19, 2025
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो….त्यासाठी आधी उद्योगाधिष्ठित आणि उद्योगाभिमुख मराठी समाज घडवायला हवा…..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजे हो ….नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात भाजप आणि रा. स्व. संघावर येणारी जबाबदारी.ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

अखेर नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि लोकसभेतील विद्यमान विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोघांसह मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सॅम पित्रोदा, सुमन दुबे यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती आहे. या व्यक्तींविरोधात यापूर्वीच गुन्हे नोंदवून यांना अटकही करण्यात आली होती. सध्या हे सर्व आरोपी जामिनावर मुक्त फिरत आहेत.

केली काही वर्ष देशात गाजत असलेले हे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण नेमके काय आहे हा वाचकांना निश्चितच प्रश्न पडेल. त्यामुळे त्याबाबतची थोडी माहिती देणे गरजेचे आहे. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी चालवत असे. हे वृत्तपत्र २००८ मध्ये बंद पडले. सदर वृत्तपत्र १९३७ साली सुरू झाले होते. त्यावेळी देशभरातील स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी जवळचे पैसे टाकून असोसिएटेड जर्नल लिमेटेड ही कंपनी उभी केली आणि त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. ज्यांनी पैसे गुंतवले होते त्यांना त्या त्या रकमेचे शेअर्स देण्यात आले होते.

स्वातंत्र्योत्तर काळात या वृत्तपत्राचा विस्तार देशभर झाला. त्यामुळे प्रत्येक शहरात शासकीय जमिनीवर या वृत्तपत्राची कार्यालये उभी राहिली. हे वृत्तपत्र बंद पडले त्यावेळी या वृत्तपत्राच्या मालकीची मालमत्ता अंदाजे दोन हजार रुपये कोटी रुपये इतक्या किमतीची होती.

वृत्तपत्र चालू असताना काँग्रेस पक्षाने या कंपनीला ९०.२५ कोटी रुपये रकमेचे बिनव्याजी कर्ज दिले होते. वृत्तपत्र बंद पडले तेव्हाही हे कर्ज कायम होते. म्हणजेच हे कर्ज फिटल्यावर उरलेल्या जवळपास १९०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सर्व भागीदारकांचा हक्क होता.

याच दरम्यान २०१० च्या नोव्हेंबर महिन्यात यंग इंडियन्स ही चॅरिटेबल कंपनी दिल्लीत स्थापन झाली. कायदेशीर परिभाषेत याला नॉन प्रॉफिट मेकिंग कंपनी किंवा सेक्शन 8 कंपनी असे म्हणतात. या कंपनीचे उद्दिष्ट देशातील तरुणांमध्ये लोकशाही आणि सर्वधर्मसमभाव बिंबवणे हेच होते. या कंपनीचे भाग भांडवल रुपये पाच लाख इतके होते. त्यात सोनिया गांधी यांचे ३८% राहुल गांधी यांचे ३८% आणि उर्वरित २४% रकमेत मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस हे गुंतवणूकदार होते.

ही कंपनी स्थापन झाल्याच्या दुसऱ्याच महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०१० मध्ये काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्सला सांगितले की आम्हाला फक्त ५० लाख रुपये द्या आणि आमचे उरलेले ८९.७६ कोटी रुपये तुम्ही यंग इंडियन्सला ट्रान्सफर करा. काँग्रेसने हक्काच्या ८९.७५ कोटी रुपयांवर पाणी सोडले आणि ते वसूल करण्याचा हक्क यंग इंडियन्स म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या गांधी कुटुंबाला बहाल केला. एका अर्थाने काँग्रेसने ८९.७५ कोटी रुपये गांधी कुटुंबाला भेट म्हणून दिले.

मात्र ही भेट गांधी कुटुंबाला रोख स्वरूपात मिळाली नाही. असोसिएटेड जर्नल्स ने आपल्या खाते पुस्तकात ८९.७५ कोटी रुपयांच्या कर्जाचे रूपांतर शेअर्स मध्ये केले. असोसिएटेड जर्नल्सच्या एकूण शेअर्सच्या ९९% शेअर्स यंग इंडियन्सचे झाले याचाच अर्थ यंग इंडियन्सच्या खाते वहीत असोसिएटेड जर्नल्स मधील शेअर गुंतवणूक स्थावर मालमत्ता म्हणून नोंदली गेली. आणि असोसिएटेड जर्नल्सचा संपूर्ण ताबा तसेच कंट्रोल यंग इंडियन्स कडे गेला. थोडक्यात म्हणजे यंग इंडियन्स ही कंपनी पाच लाख रुपये देऊन दोन हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक बनली. मनी लॉन्ड्रींग म्हणतात ते हेच झाले होते. या मालमत्तेची आजची किंमत अंदाजे ५००० कोटी रुपये इतकी असल्याचे बोलले जाते.

याच दरम्यान हा व्यवहार भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना कळला. त्यांनी या प्रकरणात न्यायालयात दावा ठोकला. मात्र हे प्रकरण काँग्रेस पक्ष, यंग इंडियन्स आणि असोसिएटेड जर्नल्स यांच्यातील आहे, आणि स्वामी हे त्रयस्थ व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना हस्तक्षेप करता येत नाही असा दावा या प्रतिवादींनी केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. आणि स्वामींची याचिका मान्य केली. डॉ. स्वामी हे भारताचे नागरिक असल्यामुळे एका राष्ट्रीय पक्षाच्या कारभाराबाबत हस्तक्षेप करण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे असे न्यायालयाने नमूद केले..त्यामुळे या प्रकरणाची चौकशीही सुरू झाली. स्वामींनी केलेल्या दाव्यानुसार असोसिएटेड जर्नल्स कडून आलेली ८९.७५ कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांनी खर्च म्हणून राईट ऑफ म्हणजेच रद्दबातल ठरवली आहे. हे जर खरे असेल तर हे प्रकरण भयंकर आहे. याचा अर्थ अप्रत्यक्षरीत्या ५००० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता वही खात्यातून गायब करण्यात आली आहे.

चौकशी सुरू झाल्यावर हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे असल्यामुळे इनफोर्समेंट डायरेक्टोरेटकडे हस्तांतरित झाले, आणि चौकशीअंती यंग इंडियन्सच्या सर्व भागधारकांना आरोपी बनवून त्यांना दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात उभे करण्यात आले. यात सोनिया गांधी या आरोपी नंबर एक, तर राहुल गांधी हे आरोपी नंबर दोन आहेत. याशिवाय मोतीलाल व्होरा, सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि ऑस्कर फर्नांडिस हे देखील इतर आरोपी आहेत. या सर्वांची या खटल्यात जामिनावर मुक्तता झाली आहे. दरम्यान नॅशनल हेरॉल्ड च्या काही मालमत्तांवर इडीने टाच देखील आणल्याचे वृत्त आहे.

आता ईडीने या प्रकरणात संपूर्ण चौकशी करून सर्व आरोपींवर आरोप पत्र दाखल केले आहे. आता २५ एप्रिल रोजी या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी होणार असल्याची बातमी आहे.

हे आरोपपत्र दाखल झाल्याची बातमी बाहेर येताच देशभरात जे उरलेसुरले काँग्रेसजन आहेत, त्यांनी ठीक ठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. काल काही शहरांमध्ये ईडीच्या कार्यालयात समोर असलेल्या फलकांवर काळे फासण्याचेही प्रकार घडल्याच्या बातम्या आल्या. काल नागपुरात काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते चेन्निथाला यांनी राजकीय सोडबुद्धीने भारतीय जनता पक्ष ही कारवाई करत असल्याचा आरोप करत देशभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इरादा घोषित केला.

२०१४ नंतर देशात हळूहळू काँग्रेस पक्षाने आचके देणे सुरू केले होते. मधल्या काळात तर हा पक्ष अक्षरशः व्हेंटिलेटरवर होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांच्या नशिबाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फेकण्याची फेक नॅरेटीव पसरवण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे ते ५४ वरून ९९ पर्यंत लोकसभेत पोहोचू शकले. मात्र नंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा आलेख पुन्हा खाली यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात बोलायचे झाल्यास ज्या काँग्रेस पक्षाला १९७२ साली विधानसभेत २२२ जागा होत्या, त्या काँग्रेसला २०२४ मध्ये फक्त १६ जागा मिळाल्या आहेत. ही दुर्दशा लक्षात घेता त्यांना पुन्हा लोकांसमोर जायला एखादा ठोस मुद्दा हवा आहे.

त्यामुळेच काँग्रेस पक्ष या प्रकरणाचा उपयोग करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. आज आरोपपत्र दाखल होताच त्यांनी ही राजकीय सूडबुद्धीची कारवाई असल्याचा कांगावा करत देशभर निदर्शने केली. मात्र आज त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र उद्या मिळणारच नाही असेही म्हणता येत नाही.

इथे मला १९७७ आणि १९७८ मध्ये तत्कालीन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना झालेल्या अटक प्रकरणाची आठवण येते. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. इतकेच काय तर पंतप्रधान पदावर असलेल्या इंदिरा गांधी आणि त्यांचे सुपुत्र संजय गांधी यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षाची अवस्था अक्षरशः दयनीय झाली होती. मात्र सप्टेंबर १९७७ मध्ये तत्कालीन गृहमंत्री चौधरी चरण सिंह यांनी इंदिरा गांधींना एक दिवसाची अटक केली आणि संपूर्ण देशभरात काँग्रेसने रान पेटवले. त्याचा परिणाम काँग्रेसला पुन्हा नवी उभारी मिळण्यात झाला. त्यानंतर लगेचच काँग्रेस पक्षात दोन गट तयार झाले. त्याचे पुढे दोन पक्षही तयार झाले त्यातील इंदिरा काँग्रेसला जोरदार जनसमर्थन मिळाले. लगेचच वर्षभराने १९७८ मध्ये पुन्हा एकदा इंदिराजींना अटक करण्यात आली होती. त्याचाही व्हायचा तो परिणाम झालाच. त्यातच १९७९ मध्ये तत्कालीन सत्ताधारी जनता पक्षाची वाताहात झाली. परिणामी १९८० च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला दणदणीत यश मिळाले, आणि पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत आली होती.

अर्थात त्या वेळच्या तुलनेत आजची परिस्थिती बरीच वेगळी आहे. त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात असलेला जनता पक्ष हा सुरुवातीपासूनच काहीसा विस्कळीत होता. अखेरपर्यंत हा पक्ष एकसंघ होऊ शकला नव्हता. शेवटी त्याची शकलेच झाली होती. आज भारतीय जनता पक्षाची तशी अवस्था नाही. आज हा पक्ष खंबीर पायावर उभा आहे. त्यांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे छुपे पाठबळही भक्कम आहे. लोकसभेत पक्षाचे बहुमत तर आहेच पण देशातील जवळजवळ अर्ध्या राज्यांमध्ये भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या आव्हानांना हा पक्ष सक्षमतेने तोंड देऊ शकतो.

१९७७ आणि ७८ मध्ये तत्कालीन सरकारने अत्यंत घिसाडघाईने इंदिरा गांधींविरोधात कारवाई केली होती. त्यामुळे ती न्यायालयात टिकली नव्हती. यावेळी मात्र मोदी सरकार पहिल्या टप्प्यापासून प्रकरण न्यायालयात येऊनच पुढील कारवाई करत आहे. त्यामुळे आज या सर्व आरोपींना न्यायालयासमोर उभे करून लगेच जामीनावर सोडले गेले. आता भविष्यातही आरोपपत्र दाखल झाल्यावर त्यांना जामीन मिळेलच. त्यानंतर खटला चालेल. साक्षीपुरावे युक्तिवाद सर्व काही होईल, आणि मगच निकाल लागेल. त्यानंतरच आरोपींना शिक्षा ठोठावली जाईल. त्यामुळे या प्रकरणात नेमके वास्तव काय हे न्यायालयाच्या मार्फत जनसामान्यांसमोर आलेले असेल, आणि खरे गुन्हेगार कोण आहेत हे चित्रही स्पष्ट झालेले असेल.

तरीही सर्वसामान्यांच्या मनात कुठेतरी भीती आहेच. उद्या या प्रकरणाचे भांडवल करून राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई झाली आहे असा कांगावा करत पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष नव्याने उभारणी करण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना, अशी शंका देशातील बहुसंख्या भाजप समर्थकांच्या मनात डोकावते आहे. ती शंका, भीती चुकीचीही मानता येणार नाही.

त्यामुळेच आता भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जबाबदारी वाढणार आहे. नॅशनल हेरॉल्ड चे हे प्रकरण वर काढण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काहीही देणे घेणे नाही, हे उघड आहे. तरीही प्रत्येक टप्प्यावर भाजपसोबत संघाला बदनाम करण्याची काँग्रेसची रणनीती राहिलेली आहे. मला आठवते १९७७ मध्ये इंदिराजींना जेव्हा अटक झाली तेव्हा नागपूरच्या चिटणीस पार्क स्टेडियमवर विरोधकांची निषेध सभा झाली होती. या सभेत संघाच्या हाफ पॅन्ट जाळण्यात आल्या होत्या. नंतरच्या काही दिवसात प्रत्येक निषेध सभेत या हाफ पॅन्ट जाळल्या जात होत्या. कारण नसताना संघाला ओढले जात होते. तसेच आजही काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षासोबत संघालाही ओढणार यात कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.

हे प्रकरण जसे जसे पुढे जाईल, तसे तसे हे काँग्रेसजन भाजप विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. देशात १९४७ नंतर दीर्घकाळ काँग्रेसचीच सत्ता राहिलेली आहे. या काळात काँग्रेसने अनेक काँग्रेसी आणि डावे विचारवंत आपल्या दावणीला बांधून ठेवलेले आहेत. आज देशात गत दहा वर्षांपासून काँग्रेस अल्पमतात आहे. तरीही हे कथित पुरोगामी विचारवंत देशभरात काँग्रेसचीच तळी उचलताना दिसतात. दुर्दैवाने अजूनही बऱ्याच जनसामान्यांचा त्यांच्यावर विश्वासही आहे. आज देशात शहरी नक्षलवादी नामक एक वर्गही पुढे येतो आहे. तोही याच मंडळींमधून पुढे आलेला आहे. ही मंडळी कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत खरे खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम करत असतात, आणि सामान्यांचा बुद्धिभ्रम करीत असतात.

त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनीही या मुद्द्यावर सावध राहण्याची गरज आहे. आज हे कथित पुरोगामी विचारवंत नॅशनल हेरॉल्डच्या मुद्द्यावर बुद्धीभ्रम करणार हे निश्चित आहे त्यावेळी संघ आणि भाजप यांनी त्यांना उत्तर देणारी सक्षम यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. किंबहुना त्यांनी असा प्रयत्न सुरू करण्यापूर्वीच एक पाऊल पुढे जाऊन आजच त्यांनी हे प्रकरण नेमके काय आहे आणि यात गांधी परिवाराने कसा फ्रॉड केलेला आहे हे दैनंदिन स्तरावर जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप आणि संघाने समांतर बुद्धिवंत, लेखक, पत्रकार, वक्ते, विचारवंत यांची सक्षम अशी चमू देशभरात सक्रिय करणे, आणि त्यांना पुरेशा सोयी सवलती देऊन पुढे नेणे हे गरजेचे आहे. तसे केले तरच काँग्रेसने केलेले हे प्रकरण आणि त्यांची इतरही कृष्ण कृत्ये जनसामान्यांसमोर येतील आणि मग या प्रकरणात आरोपींना कितीही मोठी शिक्षा झाली तरी त्याची विपरीत प्रतिक्रिया येणार नाही आणि राजकीय सूडबुद्धीने हे प्रकरण हाताळल्याचा कांगावा व्यर्थ ठरेल हे निश्चित.

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे….?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो…

Views: 185
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
व्हॉटस अॅपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका अॅड. चैतन्य भंडारी

व्हॉटस अॅपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका अॅड. चैतन्य भंडारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)