आटपाडी तालुक्यात अवैध धंदा जोमात…..पानटपरीवर मिळतेय देशी विदेशी ,
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यात गावोगावी देशी विदेशी पानटपरीवर मिळू लागल्याने दारू पिनारांची सोय झाली आहे.देशी विदेशी ,
वाळू तस्करी जोमात, तर ओपन खाऊ देईना… क्लोज झोपू देईना अशी अवस्था झाली आहे.
सध्या तालुक्यात खेडोपाडी पान टपरीवर देशी विदेशी मिळू लागली आहे.तसेच मटक्याच्या आहारी गेलेल्या सर्वसामान्य व विशेष करून तरूण युवा वर्गाचे कर्जबाजारी पणामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे चित्र आहे.या अवैध व्यवसायाला अभय कोणाचे आहे …? हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.जर जनतेचे रक्षकच भक्षक बनायला लागले तर सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर…?
असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला असल्याने याबाबत तक्रार करायची कुणाकडे..? हाच प्रश्न सर्वसामान्य नागरीकाला सध्या सतावत आहे. अनेक दिवसापासुन खुलेआम चालु असलेला दारू, मटक्याने मोठ्या प्रमाणात जोर धरून धुमाकुळ घातला आहे.
कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तालुक्यातील तरूण व युवा वर्ग या वाम मार्गाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसुन येत आहेत. अवैद्य व्यवसायाच्या नादी लागुन अनेकांचे संसार उघड्यावर आले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
तर मालक,चालक मात्र गबरगंड झाल्याचेही चित्र पहायला मिळत आहे.बादशहा खाऊ देईना…..आणी …राणी झोपू देईना अशी स्थिती झाली असून अनेक तरुण व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेले पहायला मिळत आहे..या अवैध व्यवसायाच्या नादी लागुन अनेकांनी आपले अख्खे संसार उधवस्त करून घेतले असुन,कर्जबाजारी होऊन दारू सारख्या व्यसनांच्या आहारी गेले आहेत.
बहुतांश युवक व तरून वर्ग बरबादीकडे वळताना दिसत आहे. अवैध व्यवसायात दिवसाला लाखो रूपयांची अवैद्य उलाढाल होते परंतु पोलिसांच्या नजरेस अजिबात पडत नाहीत. पोलीस सुद्धा लक्ष देत नाहीत. असे असल्याने सर्वसामान्य नागरीक या विषयापासुन चार हात लांब राहणेच पसंद करत आहेत.या झंजटीत पडायलाच नको असे म्हणून प्रत्येकजण गप्प बसने पसंत करत आहेत.
अवैध धंद्याविरोधात कारवाईबाबत पोलीस खात्याची भुमिका संशयास्पद असल्याने जनतेने भरवसा ठेवायचा कोणावर..? असा सुर सध्या नागरिकांमधून निघत आहे. पोलिसांनी मनावर घेतल्यास एक तासात तालुक्यातील सर्व अवैद्य धंदे हद्दपार होऊ शकतील. परंतु कडक कारवाईची भुमिका पोलिस खात्याने स्विकारणे गरजेचे आहे.
पोलिस खाते ठाम असणे गरजेचे आहे.परंतु पोलिस खात्याकडुन अशा अवैध धंदेवाल्यावर कारवाई का केली जात नाही…? हा गंभीर प्रश्न आहे.पोलिस खाते दोन नंबर व्यवसाय करणाऱ्याला घाबरत आहे की काय..? अशी चर्चा सध्या तालुकाभर रंगत असुन नक्की कुणाच्या आशिर्वादाने काळे धंदे सुरू आहेत याचा उलगडा जनतेला होणे गरजेचे आहे.
अवैध व्यवसायावर कारवाई म्हणजे मी मारल्यागत करतो आणि तू रडल्यागत कर अशीच अवस्था सुरू आहे. राजरोसपणे अवैध धंदे चालतात हे पोलिसांना माहिती असून सुद्धा पोलीस जाणून-बुजून याकडे कानाडोळा करीत आहेत . पोलीस या गोष्टीकडे दुर्लक्ष का करतात हेच जनतेला अजून समजले पण नाही. अन् उमजले पण नाही.


