• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

‘पन्नास गुंठ्यात ६८ क्विंटल विक्रमी मका पिकाचे उत्पादन.”त-हाडी येथील युवा शेतकरी देवेंद्र उद्धवराव करंके यांच्या मेहनतीला फळ.’

माणगंगा by माणगंगा
May 5, 2025
in Uncategorized
0
‘पन्नास गुंठ्यात ६८ क्विंटल विक्रमी मका पिकाचे उत्पादन.”त-हाडी येथील युवा शेतकरी देवेंद्र उद्धवराव करंके यांच्या मेहनतीला फळ.’

‘पन्नास गुंठ्यात ६८ क्विंटल विक्रमी मका पिकाचे उत्पादन.’
‘त-हाडी येथील युवा शेतकरी देवेंद्र उद्धवराव करंके यांच्या मेहनतीला फळ.’


त-हाडी :- सद्या रब्बीतील मका पीक काढणीचा हंगाम जोरात सुरु असून तालुक्यातील त-हाडी येथील शेतकरी युवा शेतकरी देवेंद्र उद्धवराव करंके यांनी आपल्या मोजे त-हाडी शिवारातील ५० गुंठ्यात विक्रमी ६८ क्विंटल मका पिकाचे उत्पादन घेतले आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व पिकाचे योग्य व्यवस्थापन करत त्यांनी आपल्या मेहनतीतून हे विक्रमी उत्पादन घेतले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे सर्वच पिकांचे उत्पादन घटत असतांना नियोजनाची कास धरली तर विक्रमी उत्पादन काढणे सहज शक्य असल्याचे त्यांनी यातून दाखवून दिले आहे.


यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पाहिजे ते उत्पादन तालुक्यातील कोणत्याच शेतकऱ्याला होऊ शकले नाही. त्यामुळे खरीप हातचा गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर होती. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू, हरभरा व मका पीक पेरणीला प्राधान्य दिले. गव्हाचे पीक बऱ्यापैकी आले मात्र हरभऱ्यावर ऐन पीक परिपक्व अवस्थेत करप्या सदृश्य रोगाने आक्रमण केल्याने हे पीक अनेक शेतकऱ्यांना ठेंगा देऊन गेले. आता आता रखरखत्या उन्हात रब्बी हंगामातील मका पीक काढणीचा हंगाम सुरु झाला असून व नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना ह्या पिकानेही हुलकावणी दिली असली तरी काही शेतकऱ्यांना हे पीक तारणहार ठरत आहे. त-हाडी येथील शेतकरी देवेंद्र उद्धवराव करंके यांनी याही परिस्थिती योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आपल्या त-हाडी शिवारातील गट नं. १२४ तील एकूण ९० गुंठे क्षेत्रापैकी असलेल्या ५० गुंठ्यात विक्रमी ६८ क्विंटल मका पिकाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.


चौकट ;
‘मका पिकाचा खर्चाचा ताळेबंद.’
बियाणे – ९ किलो – ४५०० रुपये
रासायनिक खत – पहिला डोस – २६०० रुपये
– दुसरा डोस – २९७० रुपये
– तिसरा डोस – १८०६ रुपये
औषधी खर्च – दोन फवारण्या – २००० रुपये
सोंगणी खर्च – मजु्रांकडून – ८००० रुपये
काढणी खर्च – मळणी यंत्र – ४७६० रुपये ———–
एकूण खर्च २६,६३६ रुपये.

प्रतिक्रिया ;
‘मी माझ्या त-हाडी शिवारातील एकूण असलेल्या ९० गुंठ्यातील क्षेत्रात ५० गुंठे ग्रीन गोल्ड कंपनीचा युनिव्हर्सल ११५२ आणि हायटेक कंपनीचा ५२०२ या दोन वाणाची निवड करून १२ डिसेंबर २०२४नोव्हेंबर रोजी ठिबक सिंचनवर बोरवेल सिंचनातून पेरणी केली होती.मका या पिकाला पहिला डोस २ डीएपी,दुसरा डोस २ डीएपी व एक युरिया सोबत १० किलो झिंक,तिसरा डोस एक पोटॅश व एक बॅग युरिया ठिबक सिंचन द्वारे असे एकूण तीन डोस ठराविक अंतराच्या कालावधीने दिले.तसेच फवारणीसाठी अळीच्या नियंत्रणाकरिता डेलिकेट ,दुसऱ्या फवारणीत प्रोक्लेम आणि झिंक १०० ग्राम फवारणी करून ५० गुंठ्यात ६८ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. हा मका शिरपूर येथे विक्रीस नेला असता १ लाख ४० हजार रुपये मिळाले.यासाठी एकूण खर्च २६ हजार ६३६ रुपये आला असून जवळपास खर्च वजा १ लाख १२ हजार रुपये ५० गुंठे क्षेत्रातून मिळाले आहे.’


युवा शेतकरी देवेंद्र उद्धवराव करंके शेतकरी,त-हाडी

Views: 262
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आरेचे सिंगम विलास पवार यांचा पुन्हा अनधिकृत झोपड्यांवर हातोडा.

आरेचे सिंगम विलास पवार यांचा पुन्हा अनधिकृत झोपड्यांवर हातोडा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)