• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकारयांचा गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास !!

माणगंगा by माणगंगा
May 30, 2025
in Uncategorized
0
नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकारयांचा गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास !!

नांदेड रेल्वे विभागाच्या अधिकारयांचा गलथान कारभारामुळे जनतेला नाहक त्रास !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नांदेड रेल्वे डिव्हिजन च्या अधिकाऱ्यांचा गलथानपणाचे आणखी उदाहरण समोर आले असून त्यांच्या विनंती वरून धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून एक महिण्या पासून तय्यार केलेले वॉटर कुलर नांदेड रेल्वे स्थानकावर बसविण्यासाठी जागा द्यायला वेळ मिळत नसल्यामुळे दिलीप ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, साधारणत: चाळीस दिवसापूर्वी जेष्ठ समाजसेवक धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना नांदेड रेल्वे डिव्हिजन च्या कमर्शीयल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्यांनी फोन द्वारे विनंती केली की, नांदेड रेल्वे स्थानकावर पिण्याचे थंड पाणी मिळत नसल्यामुळे प्रवाश्यांची अडचण होत आहे. त्यासाठी आपण पाणपोई लावून सहकार्य करावे. यावर दिलीप ठाकूर यांनी असे उत्तर दिले की, तात्पुरती पाणपोई लावण्यापेक्षा कायम स्वरूपी वॉटर कुलर लावणे योग्य राहील. त्यावर त्या अधिकाऱ्याने हे तर आणखी चांगले असे सांगितले. त्या नंतर आणखी एका वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यानी सांगितले की, पाण्याची अडचण असल्यामुळे वॉटर कुलर लवकरात लवकर बसवावा. यानंतर दोन दिवसात दिलीप ठाकूर यांनी नविन वॉटर कुलर विकत घेऊन तो कुठे ठेवायचा याबाबत विचारणा केली. वरिष्ठाना विचारून सांगतो असे सांगून आठ दिवसाची वेळ निघून गेली.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी लेखी अर्ज देण्याची सूचना केली. दिलीप ठाकूर यांनी लेखी अर्ज देऊन एक महिना झाले तरी काहीही निरोप मिळाला नाही. याबाबत डिव्हिजन रेल्वे मॅनेजर यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला संबधित अधिकाऱ्याने दिला. दिलीप ठाकूर यांनी डीआरएम यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या स्वीय सहाय्यक यांनी डीआरएम व्यस्त असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर प्रकरण खा. डॉ.अजित गोपछडे यांना सांगितले.

त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन दिवसात जागा उपलब्ध करुन देतो असे त्यानी खासदारांना सांगितले.डीआरयुसी मेंबर अरविंद भारतीया यांनी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. तरी देखील काही उपयोग झाला नाही. आज दिलीप ठाकूर यांनी वाणिज्य अधिकारी यांना पुन्हा एकदा संपर्क साधला. तुम्हाला जागा उपलब्ध करता येत नसेल तर कशाला आधी मला सांगितले.

त्यामुळे माझ्या पन्नास हजार रुपयाच्या वॉटर कुलरचा योग्य उपयोग होत तर नाहीच शिवाय मनस्ताप होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मला वृतपत्राकडे जावे लागेल असे दिलीप ठाकूर यांनी सांगितले असता,त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा. यापुढे तुमचा फोन उचलणार नाही असे सांगितले.रेल्वे अधिकाऱ्यांच्या गलथान पणा मुळे दिलीप ठाकूर सारख्या जेष्ठ समाजसेवकाला जो मनस्ताप झाला आहे आणि प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी दिलीप ठाकूर यांनी रेल्वे मंत्र्याकडे केली आहे.

Views: 53
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
डॉ . दशरथ पारेकर गौरव समितीकडून ” सादिक खाटीक ” यांचा सन्मान !

डॉ . दशरथ पारेकर गौरव समितीकडून " सादिक खाटीक " यांचा सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)