• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ४ मुलाखतकार सुधीर गाडगीळ *ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
June 1, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती ४ मुलाखतकार सुधीर गाडगीळ *ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*आयुष्यातले सांगाती ४* *मुलाखतकार सुधीर गाडगीळ* *ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार,

मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७आज सकाळीच फेसबुक बघताना अचानक लक्षात आले की हे वर्ष सुधीर गाडगीळ यांचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. सुधीर गाडगीळ हा एक नामावंत निवेदक आहे. अनेक मान्यवरांच्या त्याने प्रकट मुलाखती घेतलेल्या आहेत.

लता मंगेशकर यांच्यापासून अनेक मान्यवरांचे संगीत कार्यक्रमांचे त्याने मंच संचालन केलेले आहे. तो एक यशस्वी पत्रकारही आहे. लेखक देखील आहे. त्याची अनेक पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. एक सेलिब्रेटी म्हणून म्हणून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगात जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे तिथे सुधीरचे नाव पोहोचलेले आहे. थोडक्यात तो एक सेलिब्रेटी आहे. मात्र त्याचबरोबर सुधीर माझा चांगला मित्र देखील आहे. आज फेसबुक वर त्याचा जयंत नारळीकरांसोबत क्रिकेट खेळताना चा फोटो पाहिला आणि क्षणभर आमच्या मैत्रीचा मला अभिमान वाटला. या निमित्ताने सुधीरच्या सर्वच आठवणी जाग्या झाल्या.

सुधीर गाडगीळचा माझा परिचय होऊन जवळजवळ ४२ वर्ष झाली असावी. मला आठवते, त्याची माझी पहिली भेट १९८३ साली झाली होती. त्याआधी तो दूरदर्शनचा निवेदक म्हणून मला माहित होताच. त्या काळात “मुलखावेगळी माणसं” या गाजलेल्या कार्यक्रमाचे निवेदन करून मान्यवरांच्या मुलाखती तो घेत असे. हा कार्यक्रम त्यावेळी चांगलाच लोकप्रिय होता. १९८३ मध्ये मी नागपूरच्या सप्ताह सप्तक या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संघटनेत सक्रिय होतो. या संघटनेतर्फे नागपूरच्या पंजाबराव देशमुख सभागृहात मुंबईच्या एका संचाचा एक सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे मंच संचालन करण्यासाठी सुधीर देखील आला होता. कार्यक्रमाच्या आधी व्यासपीठावर कार्यक्रमाची व्यवस्था लावणे सुरू होते. सुधीर आणि इतर कलाकारांचे सूचना देणे सुरू होते. त्यावेळी आम्ही व्यासपीठावर गेलो.

तिथे सप्ताह सप्तकचा राजा पाटणकर याने सुधीरशी माझी ओळख करून दिली.” हा अविनाश पाठक दूरदर्शनचा इथला न्यूज कॅमेरामन आहे”. हे ऐकताच सुधीर लगेच माझ्याजवळ आला आणि गप्पा मारू लागला. त्यादिवशी आमच्या थोड्याफार गप्पा झाल्या. नंतर मुंबईला गेल्यावर त्याचे पत्र देखील आल्याचे आठवते. यानंतर दोन तीनदा मुंबईत दूरदर्शनला काही कामाने गेलो असताना अचानक आमच्या भेटी झाल्या. मात्र त्या अल्पकाळाच्याच होत्या. दहा पंधरा मिनिटे बोलण्यापलीकडे आमच्या भेटी नव्हत्या. मध्ये चार-पाच वर्षे आमची भेट नव्हती.

१९८८ मध्ये नागपूरला महाराष्ट्रीयन व्यावसायिक क्लब तर्फे त्याच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी आम्ही चार-पाच जणांनी मिळून त्याची मुलाखत घेतली होती. जवळजवळ तीन-चार वर्षांनी भेट झाल्यामुळे आम्ही दोघेही सुखावलो होतो. त्यानंतर वर्षभरातच त्याचा वसंतराव देशपांडे सभागृह एक कार्यक्रम होता. तिथेही मुंबई पुण्याचा एक संच आला होता, आणि त्यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होता. सुधीरनेच त्याचे संचालन केले होते. आम्ही कार्यक्रम सुरू होण्याआधी सुधीरला भेटायला विंगेत गेलो. माझ्यासोबत अजून तीन मित्र होते.

आम्ही चौघेही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सुधीरला भेटलो. तेव्हा कार्यक्रमाला बसणार का असे त्याने विचारले. आम्ही तिकिटे काढली आहेत आणि कार्यक्रम अटेंड करणार असे त्याला सांगितले. लगेचच सुधीरने आयोजकांना बोलावले आणि आणि हे माझे मित्र आहेत त्यांची तिकिटे परत घ्या आणि त्यांना पहिल्या ओळीतले व्हीआयपी पास द्या असे सांगून आम्हाला पहिल्या ओळीत बसवले होते. १९९२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात मी शिकलो त्या हडस हायस्कूलचा सुवर्ण महोत्सव होता. त्या कार्यक्रमात सुधीरच्या एखाद्या संचाचे सुगम संगीताचे आयोजन करावे असे प्रस्तावित होते.

योगायोगाने त्यावर्षी मे महिन्यात दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी सुधीर नागपुरात आला होता. त्याचा मला फोन आला. मी त्याला भेटायला गेलो. तेव्हा मी त्याला नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाबाबत बोललो. आणि तू असं एखादा कार्यक्रम द्यावा अशी विनंती केली. सुधीर लगेच तयार झाला. त्यावेळी या सर्व सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या सुहासिनी लाडकर या शिक्षिका होत्या. पंधरा दिवसापूर्वीच त्यांचे यजमान वारले होते. सुधीर येणार हे मी त्यांना बोललो होतो. मात्र मी सुधीर गाडगीळ यांना भेटायला येऊ शकणार नाही, तूच त्यांना भेटून घे, असे त्यांनी मला सुचवले होते. मी सुधीरला हे सांगितले. तेव्हा तो म्हणाला, हरकत नाही तुझ्या या शिक्षिका इथून किती दूर राहतात? त्यांचे घर अंदाजे चार किलोमीटरवर होते.

हे सुधीरला सांगताच दिवसभराचे काम आटोपल्यावर संध्याकाळी आपण दोघेही त्यांच्या घरीच जाऊया, असे त्याने सुचवले.त्यानुसार त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता आमदार निवासातून मी, सुधीर गाडगीळ आणि अरुण काकतकर असे तिघेही एका फोटोरिक्षाने अजनी चौकातील त्या लाडकर मॅडमच्या घरी पोहोचलो. घरात गेल्यावर त्यांना जेव्हा सांगितले की सुधीर गाडगीळ माझ्यासोबत आले आहेत, तेव्हा त्या अक्षरशः हादरल्याच. मग आमची सविस्तर चर्चा झाली. सुधीरने कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले, आपल्या अटी आणि अपेक्षा सांगत खर्चाचा अंदाजही दिला, आणि आम्ही तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी लाडकर मॅडमनी मला फोन करून चांगलेच झापले.

इतक्या मोठ्या माणसाला तू सरळ उचलून न सांगता घरी घेऊन आलास. इतक्या मोठ्या माणसाला असं कुठेही घेऊन जाणे बरं दिसते का? तू आता मोठा झाला आहेस. माझा विद्यार्थी राहिला नाहीस. म्हणून नाहीतर तुला शाळेत सांगायची तसे कान धरून उठावशा काढायला लावले असते, असेही त्यांनी दाटले पुन्हा असले उपद्व्याप करू नकोस, असेही दम भरून सांगितले. मी त्यांना सांगत होतो की सुधीर माझा मित्र आहे, आणि तो म्हणाला की तुझ्या टीचर त्या माझ्याही टीचर, त्यांच्याकडे आपण जायला काय हरकत आहे? मात्र लाडकर मॅडम माझे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. ठरल्याप्रमाणे सुधीर नोव्हेंबर महिन्यात आपला पूर्ण संच घेऊन नागपुरात आला. त्याने आमच्या शाळेत दणदणीत कार्यक्रमही केला.

सर्वच मंडळी चांगलीच खुश झाली होती. १९९४ च्या दरम्यान मी आणि सुधीर मिळत दूरदर्शनसाठी मराठी नाट्यगीते भावगीते आणि चित्रपट गीते यांच्यावर एक दूरदर्शन मालिका करण्याचे प्लॅनिंग करत होतो. त्यावेळी नागपूर मुंबई आणि पुण्यात आमच्या नियमित भेटी व्हायच्या. दुर्दैवाने हा प्लॅन मटेरियलाईज होऊ शकला नाही. एकदा असंच तो नागपुरात आला असताना त्याचा फोन आला. त्या दिवशी अरुण दातेंसोबत त्याचा कार्यक्रम होता. दुपारी मी त्याला रवी भवन शासकीय विश्रामगृहात भेटायला गेलो. तिथेच त्याने अरुणजींची माझी भेट करून दिली. त्या दिवशी संध्याकाळीच रेशीम बागेत त्यांचा कार्यक्रम होता. संध्याकाळच्या कार्यक्रमाला तुम्ही उभयता या, असा अरुणजी आणि सुधीर दोघांनीही खूप आग्रह केला.

शेवटी त्यांच्या दोघांच्याही आग्रहाला मान देऊन आम्ही उभयता त्या कार्यक्रमाला गेलो देखील होतो. त्याच दरम्यान मी एकदा पुण्यात गेलो असताना तिथे आमची भेट झाली होती सदाशिव पेठेतल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही सोबत इडली सांबर देखील खाल्ला होता. १९९५ पासून एका राजकीय मित्राच्या प्रसिद्धीचे नियोजन करण्यासाठी मी वारंवार मुंबईला जाऊ लागलो. त्यावेळी दादरच्या रानडे रोडवरील हॉटेलमध्ये मी मुक्काम करायचो. सुधीर देखील तिथेच मुक्कामी येत असे. त्यामुळे तिथे आमच्या नेहमी भेटी व्हायच्या. रात्री फुरसत असली की खूप गप्पा व्हायच्या. सुधीर वेगवेगळ्या मंडळींचे वेगवेगळे किस्से मला सांगायचा. एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्याच्या एका पुस्तकाचे प्रकाशन मातोश्रीवर होणार होते.

त्यादिवशी तिथे यावे हा त्याचा आग्रह होता. मात्र मला दुसऱ्या काही कामांमुळे तिथे जाणे जमणार नव्हते. एकदा बहुदा २००३ किंवा २००४ मध्ये नागपूरला सायंटिफिक सभागृहात सुधीरचे त्याच्या विविध मुलाखतींमध्ये किस्से सांगणारे एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मी देखील तिथे उपस्थित होतो. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांकडून प्रश्न मागवले होते. आणि त्याची उत्तरे सुधीरने दिली. मी देखील एक प्रश्न पाठवला होता. खाली माझे नाव पाहून सुधीरने प्रेक्षकात मी कुठे बसलो आहे ते बघून व्यासपीठावरूनच माझी फिरकी घ्यायला सुरुवात केली होती.माझ्या आठवणीत सुधीरची माझी शेवटची भेट २००८ मध्ये नागपुरातच झाली होती. त्यावेळी आशा भोसले यांच्या जाहीर कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी तो नागपुरात आला होता.

माझी मुलगी दिव्येशा हिला सुधीरचा ऑटोग्राफ हवा होता, म्हणून तिला घेऊनच मी सुधीर उतरला त्या हॉटेलवर दुपारी गेलो होतो. दुपारी तिथे आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. पुन्हा भेटण्याच्या कबुलीने आम्ही उठलो. मात्र गेल्या १६-१७ वर्षात आमचा पुन्हा भेटीचा योग आला नाही. नाही म्हणायला २०१० मध्ये नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यावेळी त्यांच्या झालेल्या नागरी सत्कारात सुधीरने नितीनजी आणि कांचन वाहिनी यांची प्रकट मुलाखत घेतली होती. तेव्हा आमची ओझरती भेट झाली होती. मात्र कोणत्याही गप्पा झाल्या नव्हत्या. असे असले तरी अधून मधून फोनवर आमचे बोलणे होते. अधून मधून ख्याली खुशाली कळते. त्याला कोणतीही सूचना केली किंवा एखाद्या नव्या कार्यक्रमाबद्दल सुचवले तर त्याचा कायम सकारात्मक प्रतिसाद असतो. आज सुधीर आधी नमूद केल्याप्रमाणे सेलिब्रेटी आहे.

मात्र त्याच्यात अहंकाराचा लवलेशही नाही. म्हणूनच अजूनही आमची मैत्री कायम आहेअसा हा माझा मित्र यावर्षी नोव्हेंबर महिन्यात, २५ नोव्हेंबरला वयाची ७५ वर्ष पूर्ण करणार आहे. परमेश्वराने त्याला दीर्घायुरारोग्य द्यावे. आणि या काळात त्याने अशा अनेक अनेक मुलाखती घ्याव्यात, आणि अनेक मान्यवरांना बोलते करावे, त्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा.

Views: 216
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ज्ञानदान मोहीम २०२५

ज्ञानदान मोहीम २०२५

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)