• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
June 2, 2025
in Uncategorized
0
महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधन आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात भव्य उत्साहात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमास विशेष रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत वृक्षदान आणि कोल्हापुरी फेटा बांधून, हलगीच्या गजरात सन्मानपूर्वक करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवर व कर्तृत्ववान पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमात पत्रकारितेच्या समोरील आव्हाने आणि विश्वासहर्ता यावर बोलताना प्रमुख वक्ते किरण सोनावणे म्हणाले, पत्रकार हा समाजाचा सजग प्रहरी आहे. तो केवळ घटना सांगत नाही, तर समाजाची दिशा ठरवतो. अशा पत्रकारांचे मनोबल उंचावणारे उपक्रम काळाची गरज आहेत.


कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार व पोलीस यांच्यातील समन्वयाच्या गरजेवर भर दिला.
सकारात्मक कामांची दखल घेऊन समाजात विश्वास निर्माण करण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे ते म्हणाले.


खासदार धैर्यशील माने यांनी स्पष्ट शब्दांत पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. आमदार अशोकराव माने, यांचा वाढदिवस असूनही त्यांनी अधिवेशनाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. माजी आमदार सुजित मिणचेकर, राजू किसनराव आवळे, तसेच विजयसिंह माने, विनायक भोसले, अविनाश बनगे आदींचीही उपस्थिती होती.


मान्यवर राज्याध्यक्ष कोळेकर यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडत सांगितले की, २००४ मध्ये स्थापना झालेल्या संघटनेच्या २१ व्या अधिवेशनाची यजमानी कोल्हापूर जिल्ह्याला मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे.यावेळी श्री सुनिल कांबळे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये, तालुकाध्यक्ष पापालाल सनदी, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


सत्कारमूर्तीना कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह आणि शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. बाहेरून आलेल्या पत्रकारांचा सत्कार ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज’ यांच्या प्रतिमेद्वारे करण्यात आला.
कार्यक्रमासाठी भव्य हॉल, अद्ययावत ध्वनीव्यवस्था, आरामदायक बैठक व्यवस्था यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधव व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. श्री शिवाजी शिंदे, श्री शशिकांत शामकांत भावसार,सौ. यमुना अमोल शिवतरे, ॲड. मंगेश नेने, श्री संभाजी पाटील, पत्रकार युनूस आयुब शेख,संपादक अयुब पठाण,श्री सागर मलगुंडे, डॉ. विजयकुमार कांबळे,श्रीमती शैला बैसाणे,श्री भानूविलास पुंडलिक भावसार,डॉ. अविनाश सहदेव बनगे,सौ. मंगल आप्पासो मगदूम,श्री राजुल अनिल लाईन्सवाला, श्री संजय भगत, पत्रकार श्री रोहन जिन्नाप्पा देसाई, पैलवान वसंतराव पाटील,श्री प्रताप शिरतोडे,श्री लक्ष्मीकांत शिवाजीराव काळे, श्री सुरेश मार्कड,श्री पोपट नलावडे,श्री सुर्यकांत भोसले,श्री मदन पवार, श्री संपतराव विष्णू डोंगरे व सौ. कमलबाई संपतराव डोंगरे,श्री ज्ञानेश्वर पांडूरंग भालेराव,श्री किरण भानुदास वाळके,श्री गणेश साहेबराव शिंदे,श्री भास्कर सदावर्ते,श्रीमती उषा सुरेंद्र नांदोडे,ज्ञानेश्वर सुपडू पाटील व सौ. रेवाबाई सुपडू पाटील,श्री विवेककुमार अनिलकुमार पाठक,ॲड. अनिशा फणसळकर,श्री विजय आत्माराम राऊत,श्री राजेंद्र श्रीपती काळे, श्री बबनराव गंगाराम धायगुडे, श्री रुपेश भानुदास भडकुंबे,श्री मदन पाटणकर,डॉ. मुकुंद सुखदेव लोंढे,श्री श्रेणीक प्रकाश पारखे, श्री राजेंद्र ज्ञानदेव फाळके, प्रा. डॉ. अहिल्या विठ्ठल वाघमोडे (गोफणे ), पत्रकार रमेश बोभाटे यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

Views: 43
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ग्रीस च्या युनिव्हर्सल फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकपदी अमोल भगत…….युवा चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ग्रीस मधील चवथ्या युनिव्हर्सल चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी म्हणून निवड

ग्रीस च्या युनिव्हर्सल फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकपदी अमोल भगत.......युवा चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ग्रीस मधील चवथ्या युनिव्हर्सल चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी म्हणून निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)