• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव

माणगंगा by माणगंगा
June 7, 2025
in Uncategorized
0
शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव

शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव

राहुरी (जि. अहमदनगर) येथील सुप्रसिद्ध शिवशाहीर, व्याख्याते आणि समाजसेवक डॉ. विजय तनपुरे यांची शांतीदूत परिवारातर्फे “सेवारत्न पुरस्कार” या मानाच्या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त दिनांक २६ जून २०२५ (गुरुवार) रोजी LOC हॉस्पिटल, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान, रोगनिदान व अवयवदान जनजागृती अभियान कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शांतीदूत परिवाराचे संस्थापक आणि माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

डॉ. विजय तनपुरे हे वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे एका पायाने अपंग झाले. मात्र या शारीरिक मर्यादेला बाधा न मानता त्यांनी गेली ३८ वर्षे महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात शिवचरित्राचे पोवाडे, कीर्तन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून प्रभावी कार्य केले आहे. शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम आणि राष्ट्रप्रेम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले आहे.

केवळ सांस्कृतिक कार्यातच नव्हे तर दिव्यांगांसाठी सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी स्वतःसारख्या दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी राहुरी येथे ४२०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे “शिवाश्रम” उभारले असून त्याचे लोकार्पण २५ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आले. या आश्रमातून अनेक दिव्यांगांना रोजगार, शिक्षण आणि आत्मविश्वास मिळाला आहे. सध्या ते मनाने खचलेल्या सामान्य व्यक्तींना सशक्त आणि यशस्वी बनवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांचे ध्येय आहे – २०,००० व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनवणे.

आजवर त्यांना कलारत्न पुरस्कार, अपंग उद्योजक पुरस्कार, तसेच दिनांक १२ जानेवारी २०१६ रोजी सिंदखेडराजा येथे छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी महाराज आणि तंजावूरचे छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला “विश्वशिवशाहीर पुरस्कार” अशा अनेक राष्ट्रीय सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.

“शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे” हे केवळ एक व्यक्तिमत्व नसून संघर्षातून यशाकडे नेणाऱ्या जिद्दीचे, शिस्तीचे आणि सेवाभावाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. शांतीदूत सेवारत्न पुरस्काराने त्यांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव होणार आहे, ही समाजासाठीही अभिमानाची बाब आहे.

Views: 50
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
तऱ्हाडी सह परीसरात मान्सून पूर्व वादळीवाऱ्यासह पावसामुळे केळी व इतर पिकांचे नुकसान*पंचनाम्यासाठी आमदार शेताच्या बांधावर

तऱ्हाडी सह परीसरात मान्सून पूर्व वादळीवाऱ्यासह पावसामुळे केळी व इतर पिकांचे नुकसान*पंचनाम्यासाठी आमदार शेताच्या बांधावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)