तापीमाथ्यावर वटपौर्णिमा अगदी पारंपारीक पद्धतीनेच
त-हाडी/वार्ताहर :- शिरपूर तालुक्याच्या तापीमाथ्यावरील त-हाडी वरुळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे विखरण अर्थे व जळोद परिसरात महीलांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आसणारा वटपौर्णिमा हा सण अगदी पारंपारिक पद्धतीने पण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.अगदी सकाळ पासूनच महिलांच्या मध्ये या सणाची लगबग दिसून येत होती.
अगदी पारंपारीक पद्धतीनेच महिला वडाच्या झाडाला सात फेरे बांधून आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत होत्या.सकाळ पासूनच महिला नवीन साड्या नेसून,नाकात नथ,हातात हिरवा चुडा,कपाळावर गंध यासह सौभाग्याचे अलंकार परिधान करून गावातील किंवा गावालगत असणार्या तर काही ठिकाणी पर्याय म्हणून कुंडीतील वडाच्या झाडाची मोठ्या भक्तिभावाने पूजन करीत होत्या.
वड हा वृक्ष तसा पुर्ण साभार असणारा व वर्षानुवर्षे ठिकणारा वृक्ष.त्याच्या सानिध्यात प्राणवायुचा मोठ्या प्रमाणात पुरवठा असतो.त्यामुळे मुर्छीत अवस्थेत आसणार्या आपला पती सत्यवानाला जीवदान देण्यासाठी याच वृक्षाखाली बसून पत्नी सावित्रीने यमाकडे पतीच्या प्राणाची याचना केली होती.त्यामुळेच सत्यवानाचे प्राणही वाचले होते.तेव्हापासूनच पतिच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.
सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडा भोवती सुत गुंडाळून त्याची मोठ्या भक्तिभावाने पूजन करुन जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करत व एकमेकींना वाण देऊन ओटी भरताना दिसत होत्या.त्यातच सततच्या दुष्काळाने तसेच तापीमाथ्यावरून शिरपूर-शहादा राज्यमार्ग मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे.त्यामुळे आपसूकच वडाच्या झाडाची संख्याही रोडावली आहे.त्यामुळे काही ठिकाणी महीलांना पुजेसाठी कुंडीतील झाडाची वा वडाच्या झाडाच्या फांदीचा आधार घ्यावा लागला ही एक शोकांतिका ठरली हे मात्र खरे.

