दिघंचीतील महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा…. महेश खराडे
आटपाडी / प्रतिनिधी
दिघंची ता.आटपाडी येथील महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना तात्काळ ठेवी द्या, संचालक मंडळावर फौंजदारी दाखल करा आदिसह अन्य मागण्यासाठी शुक्रवार दिनांक 20 जून रोजी संस्थेच्या अध्यक्षा च्या घरावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाद्यक्ष महेश खराडे यांनी दिली. खराडे म्हणाले .
हा मोर्चा शुक्रवारी सकाळी दहा वाजता दिघंची स्टॅन्ड पासून सुरु होणार आहे. दिघंची भाजी मंडई मार्गे संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल शेटे यांच्या घरावर जाणार आहे. या मोर्चात महिलाही मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. ही संस्था 30 ते 35 वर्षा पूर्वी स्थापन झाली.
पूर्वी या संस्थेचा कारभार चांगला होता, पण अलीकडच्या काळात संस्थेने चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केले आहे. मॉर्गेज न करता किंवा कमी तारण आणि भरमसाठ कर्ज वाटप कारण्यात आले आहे. तसेच कर्ज वसुलीसाठीही विशेष प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुदत संपून गेली तरी ठेवीदाराच्या ठेवी मिळत नाहीत.
ठेवीदार हेलपाटे मारून थकले मात्र ठेवीचा पत्ता नाही चार ठेवीदार हेलपाटे मारून थकल्या नंतर मयत झाले आहे तर एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. त्यामुळेच ठेवीदाराचे पैसे तात्काळ द्या, चुकीचे कर्ज वाटप करणाऱ्या संचालक मंडळ आणि सचिव हणमंत माळी यांच्यावर फौंजदारीचे गुन्हे दाखल करा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात ठेवीदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे मोर्चा यशस्वी करण्यासाठी विजय माने पांडुरंग शेरकर निवृत्ती औंधकर देवा यादव मारुती भोसले मधुकर मोरे शिवाजी सावंत आदी प्रयत्न करत आहेत.


