*श्री.देवेन भारती, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या नवं नियुक्ती नंतर पुन्हा मुंबई पोलीस दलात खाकी गँग वॉर सुरू झाले का?**माजी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक श्री सूनिल टोके यांचे मनोगत !!*
दिनांक १४/०६/२०२५ रोजीच्या मध्य रात्री नंतर व दिनांक १५/०६/२०२५ रोजीच्या ०१:५०नंतर मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील एम.आय.डी. सी.पोलीस ठाणे मुंबई हद्दीतील नाईट लव्हर बार अँड रेस्टॉरंट येथे मुंबई गुन्हे शाखा पोलीस सह आयुक्त मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असता सदर बार मध्ये एकूण ४० नर्तकी (बारबाला) बार व्यवस्थापक,वेटर इत्यादी वर कायदेशीर कारवाई करून एम.आय.डी. सी.पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे
नमूद कारवाई नंतर सदर पोलीस ठाण्याचे वपोनी श्री.राजीव चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.मी माझ्या या लेखाची सुरवात खाकी गँग वॉर सुरू झाले का? या शिर्षका पासून सुरवात करण्याचे खरे विदारक सत्य हे आहे की दिनांक१४/०६/२०२५ रोजी च्या मध्य रात्री व दिनांक १५/०६/२०२५ रोजी च्या अंदाजे ०२:००दरम्यान कांदिवली पोलीस ठाणे येथील सद्या कार्यरत असणारे शासनाच्या व वरिष्ठ ips अधिकारी यांच्या खास मर्जीतील ७५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यातील नामांकित नामवंत श्री.रविंद अडाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या व श्री.आनंद भोईटे मा.पोलीस उप आयुक्त परी मंडळ ११ यांच्या छत्र छायेत खुलेआम चालणाऱ्या विजय पॅरा डाईज (vp) ऑर्केस्ट्रा(कम डान्सबार) वर मा.पोलीस उप आयुक्त परी मंडळ ११ श्री आनंद भोईटे महोदय यांच्या स्टाफ ने कारवाई करून एकूण ५४नर्तिका(बारबाला)ज्या अश्लिल हाव भाव करून डान्स करत होत्या त्यांच्यावर आणि व्यवस्थापक,वेटर इत्यादी वर गुन्हा दाखल केला आहे
मात्र ही कारवाई झाल्या नंतर सदर कारवाई बाबत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यावर या कारवाई बाबत प्रसिद्ध करण्यात आली नाही इतक्या बेमालूमपणे ही कारवाई करण्यात आली मात्र या परिमंडळ 11 मुंबई येथील सर्व ऑर्केस्ट्रा बार मध्ये दररोज जी दौलत जादा होत असते डान्स होतो त्या डान्सर वर उडविण्यात येणारे लाखो रुपये,मे.सर्वोच्च न्यायालयाने तसेच मे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचे अटी शर्थी चे खुलेआम दररोज जे वस्त्रहरण केलं जातं होत
या संदर्भात मी स्वतः महाराष्ट्र राज्य सरकार चे आमचे हितचिंतक व पारदर्शक श्री.देवेंद्र फडणवीस मा.महाराष्ट्र राज्य(गृह मंत्री) मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस सह आयुक्त(का.व.व्यवस्था) सदर विभागाचे अपर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त या सर्वांना ई मेल मार्फतीने तक्रारी केल्या तरीही कोणी कारवाई करण्यास धजावले नाही?*मात्र अशी अचानक कारवाई केल्या नंतर ती ही एकाच दिवशी मग कांदिवली पोलीस ठाण्याचे नामवंत नंबर एकचे नंबरकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र अडाणे यांच्यावर एम.आय.डी. सी.पोलीस ठाणेचे वपोनी श्री राजीव चव्हाण यांच्यावर करण्यात आली तशी कारवाई करण्यात का?आली नाही हे अनाकलनीय गुढ सत्य नक्की काय आहे?शिवाय ज्या ७५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मुंबई,ठाणे नवी मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड इत्यादि ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वपोनी पदावरील वपोनी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त/अधीक्षक पदाची पदोन्नती नाकारली त्यांच्या वर शासनाच्या अटी शर्थी, नियम यांच्या,नागरी सेवा नियम इत्यादि नुसार शिस्तभंग कारवाई आणि त्या वपोनी यांच्या बदल्या अकार्यकारी विभागात कराव्यात या बाबत मा.पोलीस महासंचालक यांच्या आदेशाला सुद्धा हरताळ फासणारे विभाग प्रमुख,घटकप्रमुख यांना जबाबदार धरून कारवाई का?करत नाहीत हा ही गुलदस्त्यात ठेवलेला मनमानी कारभार च म्हणावा लागेल*
आता येऊ मूळ विषयावर मी गेल्या दोन ते तीन महिन्या पासून कांदिवली पोलीस ठाण्याचे वपोनी श्री रविंद्र अडाणे ,श्री.आनंद भोईटे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ११मुंबई व त्यांच्या मर्जीतील कांदिवली पोलीस ठाण्यातील प्रतिनियुक्ती वरील पोलीस निरीक्षक श्री.कांबळे(जे सदर पोलीस ठाण्यातील ५ वे पोलीस निरीक्षक आहेत) यांच्या मनमानी गैर कारभार आणि अवैध धंदे ,गुटखा विक्रेते ,ऑर्केस्ट्रा कम डान्सबार ,अवैध बांधकाम भु माफिया इत्यादी सोबत असलेले या सर्व पोलीस अधिकारी यांचे आर्थिक हित संबंध या बाबत लेखी व ई मेल माध्यमातून तक्रारी करून ही या नामवंतांनी त्यांचा मनमानी कारभार खाबूगिरी चा कार्यक्रम बिनदिक्कत ,कोणालाही न घाबरता न जुमानता बेमालूम पणे चालूच ठेवला आहे?*
यातील खरं अनाकलनीय सत्य व षड्यंत्र याची सांगड घातली तर मात्र या दोन्ही कारवाया किंबहुना परी मंडळ ११चे पोलीस उप आयुक्त श्री आनंद भोईटे व नामवंत वपोनी श्री रवींद्र अडाणे यांचे प्रबळ हितचिंतक श्री.देवेन भारती पोलीस आयुक्त मुंबई यांच्या किंवा पोलीस सह आयुक्त गुन्हे यांच्या कार्यालयातील झारीतल्या त्या शुक्राचार्य यांनी पूर्व कल्पना देऊन सबंधितांना निलंबन कारवाई तुन वाचवण्यासाठी खाकीशी गद्दारी तर नक्कीच केलेली आहे पण या प्रकरणात मी आवश्यकते नुसार अति वरिष्ठ प्राधिकरण यांच्या कडे पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे. जय हिंद सुनील भगवंतराव टोके !!*


