• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गोरगरीब सेक्स वर्कर महिलांना न्याय कोण देणार – विलास रुपवते

माणगंगा by माणगंगा
June 21, 2025
in Uncategorized
0
गोरगरीब सेक्स वर्कर महिलांना न्याय कोण देणार – विलास रुपवते

गोरगरीब सेक्स वर्कर महिलांना न्याय कोण देणार – विलास रुपवते

मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७मुंबई – इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेला मुंबईतील पारंपरिक रेड लाइट बाजार ६ जून २०२५ पासून अधिकृतरित्या बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, दिनांक २० जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ग्रँट रोड येथील दिनेश बिल्डिंगमध्ये धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ८ घरांचे दरवाजे तोडले गेले असून, लूटमार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सेक्स वर्कर महिलांचे म्हणणे आहे की, “आम्ही सर्वजणी आपापल्या घरात शांततेत होतो, व्यवसाय आधीच बंद करण्यात आलेला आहे, तरीही डीसीपी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजे तोडून जबरदस्तीने आम्हाला डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात नेले.”ही कारवाई मंगल प्रभात लोढा यांच्या मतदारसंघात होणाऱ्या ‘री-डेव्हलपमेंट’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सुरू असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधींनी विकासाच्या नावाखाली या गोरगरीब महिलांना पायाखालून जमीन काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महिला संघटनांचे म्हणणे आहे.

विलास रुपवते, अध्यक्ष – महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटना यांनी म्हटले आहे की, “सेक्स वर्कर महिलांनी कुणाचा खून, लुटमार, किंवा गुन्हा केलेला नाही, तरीदेखील DCP आणि त्यांच्या स्टाफने दादागिरी करून महिलांवर अन्याय केला आहे. जर या महिला नसतील, तर विकृत प्रवृत्तीचे लोक चांगल्या घरातील महिलांवर अत्याचार करतील. या महिलांनी समाजातील अनेक विकृत पुरुषांचे लैंगिक विकार थांबवले आहेत.

रेड लाइट बाजार बंद झाला, तर रस्त्यावर तुमच्या-आमच्यासारख्या सन्माननीय महिलांनाही सुरक्षितता राहणार नाही.”या प्रकारामुळे संपूर्ण मुंबईतील पोलीस दलाचे नाव काही अपप्रवृत्तीमुळे बदनाम होत आहे. कायदेशीर प्रक्रिया असताना दरवाजे तोडणे, लूट करणे आणि महिलांना जबरदस्तीने घेऊन जाणे ही घटनाच गंभीर आहे.यासंदर्भात महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटना कडून लवकरच राज्यभरात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य सरकार, गृहमंत्री, आणि मुख्यमंत्री यांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा व्यापक आंदोलन उभे राहील, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

Views: 75
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ९ ...डॉ मोहनजी भागवत….....ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)