मायणीकरांचे उद्या सोमवारी उपोषण
पोलीस ठाणे होण्याच्या प्रमुख मागणीसह व इतर प्रश्नांसाठी ग्रामस्थ आक्रमक
मायणी दि.२२ :- प्रतिनिधी
मायणी येथे गेले अनेक दिवस सुरू असणारे चोऱ्यांचे सत्र थांबता थांबणे झाले असून याप्रश्नी मायणी येथील ग्रामस्थ , विविध संघटना , व्यापारी संघटना यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मायणी येथे तातडीने पोलीस ठाणे होणे आवश्यक असून पोलीस कारभारा विषयी ग्रामस्थांच्या प्रचंड नाराजी आहे. या सर्व बाबींसाठी सोमवार दि. २३ जून रोजी मायणी पोलीस दुरक्षेत्र बाहेर सकाळी. १० वाजता वरील संघटना व ग्रामस्थांकडून एकदिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे.
यासंबंधी सविस्तर माहिती अशी की, गेली अनेक वर्षे मायणी येथे पोलीस दूरक्षेत्र आहे, आणि त्या
अधिपत्याखाली जवळ जवळ ३५ ते ३६ गावे व वाड्या येत आहेत. तसेच अपुरा स्टाफ असल्यामुळे, सर्व
परिसरात चोऱ्या, मारामारी, खून, दरोडे, व्यापाऱ्यांचे नुकसान, व्यापारी वर्गावर हल्ले, मुलींची छेड-छाडा असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. अश्या प्रकारांमुळे मायणी परिसरातील लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .तसेच शेतकऱ्याची जनावरे, शेतीमाल, मोठ्या प्रमाणात चोरीला जात आहेत . तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात सतत चोरीचे प्रकार चालू आहेत. हे सर्व विषय खूप गंभीर आहेत, यासाठी मायणी येथे पोलीस स्टेशन व्हावे हि विनंती आहे. तसेच जे गुन्हे झालेले आहेत त्याचा लवकरात लवकर तपास लावून जे गुन्हेगार आहेत त्या शिक्षा व्हावी आणि सामान्य जनतेला
न्याय मिळावा. यासाठी वरील ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांच्या वतीने हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सोमवारी करण्यात येणार आहे.यात सर्व क्षेत्रातील लोकांनी सहभागी व्हावं असे आवाहन करण्यात आले आहे.


