आटपाडी पोलीस स्टेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का ॽः मुकादमाच्या हाकेवर कारभार चालतोय का ?…. अँड गणेश जुगदर
आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती लिखित तक्रार देण्यासाठी गेल्यास त्याचा अर्ज स्वीकारला जात नाही . तुमची तक्रार आमच्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत नाही, असे काहीतरी सांगून उडवा उडवी चे उत्तर देऊन तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात व त्या तक्रारदाराला तेथून हाकलून दिले जाते.
तक्रारदार ऐकत नसेल तर त्याला अरे तुरे भाषेत बोलले जाते, जरी आपली त्याच पोलीस स्टेशनच्या विरोधात तक्रार असेल तर ती तक्रार ठाणे अंमलदाराने स्वीकारला हवी आहे. व सदर अर्जाची पोहच देणे बंधनकारक असताना सुद्धा अनेक तक्रारदारांच्या तक्रारी स्वीकारल्या जात नाहीत अशा अनेक दिवसापासून नागरिकांच्या तक्रारी आहेत.
तसेच ठाणे अंमलदारांनी तक्रारी अर्ज स्वीकारल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे परंतु अर्ज कचऱ्याच्या पेटीमध्ये फेकून दिला जात असल्याचे निदर्शनाला आले आहे.किंवा ज्या तक्रारदाराने अर्ज दिला आहे ती तक्रार आमच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही असे तरी कळवले पाहिजे परंतु अर्ज स्वीकारत नाहीत त्यामुळे तक्रारदाराने तक्रार नोंदवायची कुठे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दिलेल्या अर्जावर चौकशी करून योग्य ती कारवाई करायची असते नसेल तर त्यांनी तो अर्ज आमच्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत नाहीये असे लेखी अर्जदाराला कळवायचे असते पण असे असताना पोलीस ठाणे अंमलदार हे अर्जदाराला उलट , उद्द्ट बोलतात.
असाच एक प्रकार घडला आहे, एका शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता जात असताना त्याचे भूसंपादन तसेच कोणत्याही खात्याकडून तुमच्या शेतामधून रस्ता जाणार आहे. असे कळवले नाही किंवा सर्व्हे पण झालेला नाही. तरी तो रस्ता जबरदस्तीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करत आहेत. रस्त्याचे काम सुरू करीत असताना वादावादी झाल्यानंतर शेतकरी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यामध्ये गेला असता त्या शेतकऱ्याचा अर्ज स्वीकारला नाही.
त्यानंतर त्या शेतकऱ्यानी ॲड. गणेश जुगदर यांना फोन करून वरील हकीगत सांगितली. त्यानंतर ऍड गणेश जूगदर पोलीस ठाण्यामध्ये गेले व अर्ज स्वीकारा आणि आम्हाला पोच द्या एवढेच बोलले असता . ठाणे अंमलदारांनी अर्ज स्वीकारला नाही. तर उलट वाद घालायला लागला कारण मी एक वकील तसेच गणेश जुगदर हे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत.
जर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ठाणे अंमलदार वाद घालू शकतात तर मग सर्वसामान्य लोकांच्या बरोबर ठाणे अंमलदार कसे वागत असतील हे यावरून दिसून येत आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कोणाच्यातरी दबावाखाली काम करीत आहेत असे यावरून स्पष्ट होत आहे. तसेच अक्का चा फोन आला की खोटी तक्रार सुद्धा नोंदवली जाते परंतु सर्वसामान्य माणसाला इथे न्याय मिळत नाही. तसेच पोलीस ठाण्यामध्ये तक्रारपेटी नाही .तक्रार पुस्तक नाही तसेच पोलीस ठाण्यामध्ये कोणाची तक्रार काय आहे .हे ही विचारले जात नाही. अधिकाऱ्यांच्या नावाचा नामफलक कुठेही दिसून येत नाही . तसेच त्यांचा फोन नंबर कुठेही केलेला नाही .
येथील अधिकाऱ्याविषयी पुढे तक्रार कुठे करावी याची सुद्धा माहिती उपलब्ध नाही .कारण शासकीय ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी वरीष्ठ अधिकाऱ्यांचे फोन नंबर पत्ता पाहिजे, येथील पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर वरिष्ठाकडे दाद मागण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव फलक व फोन नंबर कार्यालयामध्ये कुठेही दिसून येत नाहीत
तरी या पोलीस स्टेशनच्या भोंगा कारभार संदर्भात लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखाला भेटून निवेदन देणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते ॲड .गणेश दुगदर यांनी सांगितले.
Show quoted text


