दै.प्रजा शासनाचे संपादक संजय कांबळे, सहसंपादक विक्रांत शिरसाट, उपसंपादक प्रदीप पोटफोडे”समाजरत्न”पुरस्काराने सन्मानित. ——————————————
-बदलापूर-सामाजिक क्षेत्रात काम करण सोईस्कर असते, पण पत्रकारिता क्षेत्रात आणि खास करुन वर्तमानपत्र काढून ते चालविणे म्हणजे खुप मोठ धैर्याचे आणि जोखीमीचे काम असते.परंतु यवतमाळ येथून प्रसिद्ध होणारे दै.प्रजा शासन हे वर्तमानपत्र आपल्या नाविन्यपूर्ण लेखणीने जनतेसमोर आलेले आहे.या दै.वर्तमानपत्राच्या जडणघडणीत संपादक संजय कांबळे यांचा सिंहाचा वाटा आहे.
त्याच प्रमाणे त्यांना सहसंपादक विक्रांत शिरसाट तसेच उपसंपादक प्रदीप पोटफोडे यांचे बहुमोल सहकार्य लाभत आहे.या तिहांचेही सामाजिक क्षेत्रातील काम ही उल्लेखनीय आहे.संपादकीय, पत्रकारिता, सामाजिक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना जनजागृती सेवा संस्थेकडून”समाज रत्न”पुरस्कार देण्यात आला आहे.हा पुरस्कार त्यांना ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यात आला आहे.
संपादक संजय कांबळे, सहसंपादक विक्रांत शिरसाट, उपसंपादक प्रदीप पोटफोडे यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी अभिनंदन केले आहे.तसेच त्यांचे विविध स्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे.


