• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कोल्हापुरात अपेडा यांच्यातर्फे गूळ निर्यात क्षमतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 4, 2025
in Uncategorized
0
कोल्हापुरात अपेडा यांच्यातर्फे गूळ निर्यात क्षमतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कोल्हापुरात अपेडा यांच्यातर्फे गूळ निर्यात क्षमतेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यात विकास प्राधिकरण (APEDA), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (MSAMB) आणि कृषी विज्ञान केंद्र (KVK), कणेरीमठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात गूळ निर्यातीसाठी क्षमतेवाढ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश गूळ उत्पादक, शेतकरी, FPO/FPC आणि उद्योजक यांना गुणवत्तापूर्ण गूळ उत्पादन, ग्रेडिंग, पॅकिंग, प्रमाणन व निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करणे हा होता.दिनांक 30 जून 2025 रोजी इजिनिअर असोसिएशन हॉल,उद्यमनगर,कोल्हापूर येथे गुळ निर्यात कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विद्यासागर गेडाम, प्रमुख गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री. पांडूरंग बामने, सहाय्यक व्यवस्थापक अपेडा, मुंबई डॉ.सुभाष घुले उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ कोल्हापूर, कृषि विज्ञान केंद्र कनेरीचे प्रा. पांडूरंग काळे, गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासाहेब पाटील, पणन मंडळाचे अधिकारी ओंकार माने, प्रसाद भुजबळ, सत्यजित भोसले, सुयोग टकले, व गुळ उत्पादक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केली. गुळ उत्पदकांनी गुळ निर्यात करणेकरीता अपेडा चे माध्यमातून प्रयत्न करावे भौगोलिक मानांकन अतर्गत वैयक्तिक गुळ उत्पादकांनी नोंदणी करणे अवश्यक असल्याने गुळ उत्पादकांनी जि आय नोंदणी करावी,

जेणेकरून कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यास मदत होईल याबाबत कृषी पणन मंडळा च्या योजनांचा फायदा गूळ उत्पादकांनी घ्यावा असे सांगीतले. तसेच पणन मंडळाच्या योजनांबाबत माहिती दिली. अपेडाचे श्री. पांडूरंग बामने यांनी अपेडाच्या योजना, निर्यात क्षेत्रातील संधी, गॅप प्रमाणपत्र, गुळाची मागणी, गुळ प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. पांडूरंग काळे यांनी गुळ उत्पादन वाढीबाबत व त्याच्या प्रतवारी बाबत मार्गदर्शन केले. उत्तम प्रतीचा गूळ कसा तयार करावा याबाबत डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासोहेब पाटील यांनी गुळ उत्पादकांनी कोमिकल विरहीत उत्तम प्रतीचा गुळ उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूर गुळाची निर्यात करू असे नमुद केले. तसेच विविध देशाचे प्रतवारी मानके काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले. गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण करणे बाबत प्रश्न उपस्थित केला, यावर श्री बामने यांनी याबाबत शेतकर्‍यांनी अपेडा कडे संपर्क केल्यास त्याबाबत मदत केली जाईल आसे सांगितले.

कार्यशाळेस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातीन गुळ उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यशाळा संपले नंतर गूळ संशोधन केंद्राच्या गुऱ्हाळ गृह भेट देण्यात आली. यावेळी डॉ गोविंद येनके यांची सर्वाना प्रकल्पा विषई सविस्तर माहिती सांगितली. यावेळी डॉ गेडाम यांनी आधुनिक तंत्रज्ञान गूळ उत्पादनात वापरणे गरजेचे असल्याचे नमूद केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पणन मंडळाचे श्री.ओंकार माने यांनी केले व प्रा. पांडूरंग काळे केविके कन्हेरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Views: 69
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
“राज्यस्तरीय कराओके गीत गायन” स्पर्धा – 2025

"राज्यस्तरीय कराओके गीत गायन" स्पर्धा – 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)