डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचा मायणी येथे प्रकाशन सोहळा संपन्न
मायणी : प्रतिनिधी.विशाल सुतार
मायणी ता .खटाव येथील साहित्यिक बाळासाहेब कांबळे यांच्या लेखणीतून साकारलेल्या आणि युनिक फाउंडेशन प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : साताऱ्याच्या भूमीतील विचार व कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि. २९ जुलै, २०२५ रोजी मायणी तालुका खटाव येथे संपन्न होत आहे. श्री. कांबळे यांनी यापूर्वी असे घडले महापुरुष,सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले,रमाई चरित्र या पुस्तकांचे लेखन केले असून रमाई चरित्र कन्नड भाषेत अनुवादित झाले आहे. शिवाय त्यांनी भिनवाडा या कादंबरीचे लेखन केले आहे.
सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मा अरुण जावळे व शहाजीराजे महाविद्यालय, खटावचे प्र. प्राचार्य डॉ. जितेंद्र कदम हे या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय युनिक फाउंडेशन पुणेचे संचालक डॉ. विवेक घोटाळे व डॉ. केदार देशमुख हेही उपस्थित राहणार आहेत.कला व वाणिज्य महाविद्यालय, मायणीचे प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे यांच्या अध्यक्षतेखाली कला व वाणिज्य महाविद्यालय, मायणी दि.२९ रोजी सकाळी ९.०० वा.संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन वाङ्मय मंडळ व मराठी विभाग प्रमुख डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांच्यावतीने करण्यात आले आहे. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


