बँक ऑफ इंडियातील ग्राहकाच्या खात्यावरील 12,700 रुपये गायब…सायबर गुन्हे अन्वेषण कडे तक्रार दाखल…
झरे ता.आटपाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील एका ग्राहकाचे खात्यावरील 12700 रुपये डीबिड झाले आहेत.त्या ग्राहकाचे बँक ऑफ इंडिया मध्ये कर्जाचे खाते पण आहे त्यामुळे त्या ग्राहकाचा ग्राहकाचा गैरसमज झाला की आपल्या कर्जाच्या खात्याला पैसे जमा झाले असतील असा त्याचा समज झाला .त्यामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर वीस मिनिटांनी त्याने चौकशी केली असता ते पैसे बँकेत जमा झाले नसून ते पैसे इतरत्र कुठेतरी गेले होते.
त्यानंतर चौकशी केली असता किंवा आलेल्या फोनवर फोन केला असता फोन बंद लागत होता .त्यावेळेला त्या ग्राहकाच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे .त्यानंतर त्या ग्राहकाने पोलिसांना हकीगत सांगून पोलिसांनी सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा नोंद केला आहे.याबाबत त्या ग्राहकाने बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांना विचारपूस केली तर त्यांनी जबाबदारी झटकून टाकली व आम्हाला काही माहीत नाही असे उत्तरे दिली.तुम्ही सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करा असे सांगितले.आपले ग्राहक आहे आपण त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे असे त्यांना वाटलेच नाही. त्यांनी जबाबदारी झटकून दिली.
तसेच खात्यावर पैसे गेले कुठे गेले ते बघा अन्यथा पोलिसांमध्ये तक्रार द्या असे उत्तर देण्यात आले. ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठी बँक म्हटले तर बँक ऑफ इंडिया आहे आणि या बँकेतच जास्तीत जास्त झरे परिसरातील माण ,खटाव व आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील नागरिकांचे व्यवहार येथेच असतात त्यामुळे अधिकाऱ्यांनी ग्राहकांना योग्य सेवा द्यावी व मार्गदर्शन करावे अशी ही मागणी ग्राहकांमधून होत आहे.
*आटपाडी पोलिसांची सायबर फसवणुकीविरुद्ध जलद कारवाई,* व ग्राहकांना दिल्या सूचना
तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.आटपाडी पोलिस स्टेशनमध्ये एका तक्रारदाराने त्याच्या बँक खात्यातून ऑनलाइन फसवणुकीद्वारे (fraud) रक्कम काढल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत तक्रारदाराची गेलेली रक्कम गोठवण्यात (freeze) यश मिळवले आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आटपाडी पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटना लक्षात घेता, पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत: तसेच ओटीपी (OTP) आणि वैयक्तिक माहिती शेअर करू नका:
कोणत्याही परिस्थितीत आपला ओटीपी, बँक खाते क्रमांक, एटीएम पिन किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका. बँक कधीही अशी माहिती फोनवर विचारत नाहीत.तसेच अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका: व्हॉट्सअॅप, जीमेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरून आलेल्या कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा. अशा लिंक्समधून तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर (malware) किंवा स्पायवेअर (spyware) इंस्टॉल होऊ शकतो, ज्यामुळे तुमची गोपनीय माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो. तसेच अँटिव्हायरस (Antivirus) वापरा:
आपल्या मोबाईल आणि संगणकामध्ये चांगल्या दर्जाचा अँटिव्हायरस इन्स्टॉल करा. यामुळे तुमचा मोबाईल व्हायरस आणि इतर मालवेअरपासून सुरक्षित राहील आणि तुमची माहिती सुरक्षित राहील.आटपाडी पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे तक्रारदाराचे नुकसान टळले असून, त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःला आणि आपल्या पैशांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन आटपाडी पोलिसांनी केले आहे.


