वाठार किरोलीच्या अंबामाता विद्यालयात डॉ. बापूजी साळुंखे यांचा स्मृतिदिन उत्साहात संपन्न.
मायणी दि.१२ :- प्रतिनिधी
श्री अंबामाता विद्यालय व ज्यु. कॉलेज वाठार किरोली ता. कोरेगाव येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचा 3८वा स्मृतिदिन अतिशय उत्साहत साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आयोजित समारंभात स्वामी विवेकानंद व डॉ . बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सदस्य सतीश कदम, भगवान ठोंबरे, अंकुश पवार ,मुख्याध्यापिका सौ.मनीषा पाटीलआदी मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थितीत करण्यात आले.यावेळी. कु पूर्वा खरात, सान्वी बनकर या विद्यार्थीनीनी भाषणे केली. उपशिक्षक विठ्ठल कदम यांनी शिक्षक मनोगता मध्ये बापूजी साळुंखे याच्या कार्याविषयी माहिती दिली. उपशिक्षक शंकर चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ. अश्विनी वास्के यांनी केले.
त्यानंतर ढोल ताशा व झांज पथकांच्या निनादात डॉ.बापूजी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक सजविलेल्या गाडीतून काढण्यात आली.


