• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सहज सुचलं म्हणून…,असे अवैध विवाहबाह्य विवाह धोक्याचेच,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

माणगंगा by माणगंगा
August 27, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती २२,प्रमिलाताई मेढे,*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

सहज सुचलं म्हणून…,असे अवैध विवाहबाह्य विवाह धोक्याचेच,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

!!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.पहिली पत्नी जिवंत असताना तिच्यापासून रीतसर घटस्फोट न घेता दुसऱ्या पत्नीशी महिलेशी लग्न केले तर त्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या निवृत्तीवेतनावर आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांवर पहिल्याच पत्नीचाच अधिकार राहील असा महत्त्वपूर्ण निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे. या निर्णयाचे विविध क्षेत्रातून स्वागत होत आहे.

भारतातील विद्यमान विवाहविषयक कायद्यानुसार एका व्यक्तीला एका वेळी एकच लग्न करता येते. जर काही कारणाने पहिल्या पत्नीशी किंवा पतीशी पटत नसेल आणि दुसरा विवाह करायचा असेल तर पहिल्या जोडीदारापासून कायद्याने रीतसर घटस्फोट न्यायालयाकडून घ्यावा लागतो. तरच दुसरे लग्न वैध धरले जाते. मात्र काही वेळा या कायद्यातूनही पळवाटा शोधल्या जातात. जर रीतसर घटस्फोट घ्यायचा नसेल, तर पहिल्या जोडीदाराच्या सहमतीने देखील दुसरा विवाह केला जातो. अशावेळी जोवर जोडीदार आक्षेप घेत नाही, तोवर काहीच अडचण नसते. जर कोणी आक्षेप घेतला तर हा दुसरा विवाह अवैध ठरतो आणि असे करणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा देखील दाखल करता येतो. अशा प्रकरणात आरोपींना शिक्षा देखील ठोठावलेल्या आहेत.मात्र बरेचदा पहिल्या जोडीदारापासून त्रास होत असेल, तर अशी व्यक्ती स्वखुशीने वेगळी होऊन जाते.

मग घटस्फोटासाठी कोर्टकचेरी नको म्हणून ती व्यक्ती आपल्या जोडीदाराला ना हरकत पत्र देखील देऊन टाकते. अनेकदा असे ना हरकत पत्र न घेताही विवाह केले जातात, आणि वर्षानुवर्षे संसारही चालतात. अशा अवैध विवाहातून संतती देखील होते. मात्र भविष्यात यातील कमावत्या व्यक्तीचा असा मृत्यू झाला तर त्याच्या मालमत्तेचा वारसदार कोण हा प्रश्न निर्माण होतो. प्रस्तुत प्रकरणातही असाच प्रश्न निर्माण झाला आहे. नागपुरातीलच एका शासकीय कर्मचाऱ्याने विवाह केल्यावर आपल्या पत्नीसोबत काही काळ व्यवस्थित संसार केला. त्याला एक मुलही झाले. मात्र नंतर त्याचे दुसऱ्या स्त्री बरोबर संबंध जुळले. मग हा कर्मचारी पहिल्या पत्नीला त्रास देऊ लागला. शेवटी त्रासून ही पत्नी त्याच्यापासून वेगळी राहू लागली, आणि स्वतः कष्ट करून आपले आणि मुलाचे पोट भरू लागली. नंतर या कर्मचाऱ्याने नवा घरठाव मांडला. या संबंधातूनही त्याला दोन मुले झाली. ती मुलेही मोठी झाली. दरम्यान या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याला मिळणारे निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधी तसेच इतर लाभ हे कोणत्या पत्नीने घ्यावे यावर वाद सुरू झाला.

पहिली पत्नी जी अधिकृत पत्नी होती आणि जिच्यापासून त्याने घटस्फोट घेतला नव्हता, तिने या लाभांवर दावा केला. दुसरीलाही सर्व लाभ हवेच होते. मग दोघीही उच्च न्यायालयात गेल्या. आणि तिथे खटला सुरू झाला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन्ही सवतींची बाजू आणि शासनाची बाजू ऐकून घेत आपला निकाल दिला. त्यात पहिली पत्नी जरी वेगळी राहत असली तरी तिचा घटस्फोट झालेला नाही. त्यामुळे दुसरे लग्न अवैध ठरते आणि कायद्यानुसार पहिली पत्नीच पहिली पत्नीच वारसदार ठरते. त्यामुळे या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर मिळणारे सर्व लाभ त्याच्या पहिल्या पत्नीलाच दिले जावे असा महत्त्वपूर्ण निकाल नागपूर खंडपीठाने दिला आहे. कायदे कितीही केले तरी समाज त्यातून पळवाटा शोधत असतो. विवाह संबंधांमध्येही अशा पळवाटा अनेकांनी शोधल्या आहेत. पहिल्या पत्नीचा किंवा पतीचा ना हरकत पत्र असले तर दुसरा विवाह करता येतो असे अनेकदा वकीलही सल्ला देत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक अवैध विवाह झालेले आज आम्ही अवतीभवती बघत असतो. नागपुरातीलच दोन ज्येष्ठ राजकीय नेत्यांनीच असे अवैध घरठाव केल्याच्या चर्चा दीर्घकाळ रंगल्या होत्या मात्र त्यांनी दोन्ही संसारांची आपल्या हयातीतच रीतसर सोय लावल्यामुळे वाद निर्माण होणार नाही असे सांगितले जात आहे.

त्याचबरोबर आज समाजात लिव्ह इन रिलेशनशिप नामक प्रकार देखील मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. या प्रकारामध्ये कोणतीही वैधता नाही किंवा साधनशूचीता देखील नाही. तरीही एक गरज म्हणून असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. विशेष म्हणजे अशी लिव्ह इन रिलेशनशिप मधली जोडपी वर्षानुवर्षे सोबत राहतात. मात्र त्यापैकी एकाचा जर अकस्मात मृत्यू झाला तर अशा तांत्रिक बाबी आडव्या येत असतात. प्रस्तुत प्रकरणातील निकालामुळे हे आता स्पष्ट झाले आहे की फक्त सोयीसाठी असले अवैध प्रकार काही काळ चालून जातील, मात्र दीर्घकाळ ते चालू शकत नाहीत. कधी ना कधी त्याचा फटका तुम्हाला बसतोच. कधी असे मृत्यूनंतरचे लाभ कोणी घ्यायचे यावर वाद होतात, तर कधी मुलाबाळांसाठी भविष्यात समस्या निर्माण होतात. त्यामुळे असे बेकायदेशीर प्रकार टाळणे हेच केव्हाही श्रेयस्कर ठरेल, इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.

Views: 95
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मक्याच्या नुकसानग्रस्त भागाची ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून पाहणी ..शासनाकडून मदत मिळवून देऊ …पडळकर

मक्याच्या नुकसानग्रस्त भागाची ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून पाहणी ..शासनाकडून मदत मिळवून देऊ …पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)