घरनिकी येथे रमेश जावीर यांच्या संग्रहित पक्ष्यांच्या फोटोंचे प्रदर्शन संपन्न
घरनिकी ता. आटपाडी येथे गणपती महोत्सवानिमित्त एक गाव एक गणपती या उपक्रम अंतर्गत तेथील मंडळातर्फे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते .
रमेश जावीर यांच्याकडे 40 भारतीय तसेच परदेशी दुर्मिळ पक्षांचे फोटो संग्रहित केले-‘ आहेत .त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील स्वर्गीय चित्रकार दिनानाथ दलाल यांच्या सुमारे 120 चित्रांचे प्रदर्शनही येथे भरवण्यात येणार आहे.
सायंकाळी ठीक पाच वाजता साहित्यिक का ष्ट शिल्पकार फोटो संग्रहक रमेश जावीर यांचे भारतीय कला संस्कृती व गणेश उत्सव यावर व्याख्यान होणार आहे. तरी कलारशीक गणेश व शिव चरित्र प्रेमींनी या प्रदर्शनाचा सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


