विद्यार्थ्यांनी ए.आय. व चॅटजीपीटीचा वापर योग्य गोष्टींसाठी करावा –
अॅड. चैतन्य भंडारीजगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.धुळे – धुळे येथे एसएसव्हीपीएस कॉलेज बापूसाहेब देवरे इंजिनियर कॉलेज तर्फे विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती विषयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सांगितले की आजकाल विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल अॅडिक्शन मोठया प्रमाणात वाढत आहे याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत असून त्यातूनच अनेक जण नकळत सायबर फ्रॉडमध्ये अडकत आहे.
कारण मोबाईल अॅडिक्शन आणि सायबर फ्रॉड हे एकमेकांशी जुळलेले आहेत. त्यामुळे फ्रॉडच्या मुळावर घाव घालायचा असेल तर आधी मोबाईलचे व्यसन कमी केले पाहिजे. तसेच आर्टिफिशल इंटेलिजन्स, चॅट जीपीटीचा देखील आजकाल दुरुपयोग करणे सोशल मिडीयावर दिसून येत आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स, चॅट जीपीटीचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करावा असेही अॅड. भंडारी यांनी यावेळी सांगितले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने आणलेल्या नविन सायबर सेक्युरिटी टूल्सविषयी जागरुक केले. यावेळी कॉलेजमधील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी गण मोठया संख्येने उपस्थित होते.


