गुन्हा नोंद करून न घेणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होणार
आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद केला नाही. म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या कडे तक्रार होती त्या तक्रारीवरून गुन्हा नोंद न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती संतोष हेगडे यांनी दिली आहे.
महासंचालक महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना आटपाडी पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक यांच्या विरोधात गैर वर्तणूक तसेच गुन्हा दाखल करून न घेणे ,तसेच पक्षपात करणे या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे कायदेशीर कारवाईसाठी तक्रार अर्ज वरिष्ठांकडे दाखल केला होता. त्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक कार्यालय कडून पोलीस अधीक्षक सांगली यांना संबंधित तक्रारी अर्जानुसार चौकशी करून पोलीस अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे पत्र दिले आहे.

