• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मातोश्री सरुताईंचा रथोत्सव व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न माऊलींच्या आठवणीत भक्तांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यारथावर साडेचौदा लाख रुपयांहून अधिक रुपयांची भाविकांकडून उच्चांकी देणगी अर्पणमायणी

माणगंगा by माणगंगा
September 14, 2025
in Uncategorized
0
मातोश्री सरुताईंचा रथोत्सव व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न माऊलींच्या आठवणीत भक्तांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यारथावर साडेचौदा लाख रुपयांहून अधिक रुपयांची भाविकांकडून उच्चांकी देणगी अर्पणमायणी

मातोश्री सरुताईंचा रथोत्सव व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न माऊलींच्या आठवणीत भक्तांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यारथावर साडेचौदा लाख रुपयांहून अधिक रुपयांची भाविकांकडून उच्चांकी देणगी अर्पणमायणी

गेले दिवस मोठ्या भक्तिभावात अनेक धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरू असलेला मातोश्री सरुताईंच्या तेराव्या संजीवन समाधी सोहळ्याची शुक्रवारी पुण्यस्मरण निम्मित फुलांचा कार्यक्रम व रथोत्सव आणि पालखी सोहळ्याने सांगता झाली. यावेळी मठात हजारो भाविकांनी सरुताईंचे दर्शन घेतले, हजारो भाविकांनी मोठ्या श्रध्देने रथावर नोटांच्या माळा अर्पण केल्या.

येथील मातोश्री सरुताई यांच्या १३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी पालखी व रथोत्सव हा मुख्य कार्यक्रम होता. भल्या पहाटे चार वाजून ३२ मिनिटांनी मातोश्रींच्या मठामध्ये फुलांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी यावेळी उपस्थिती दाखवली.त्यानंतर भजन व कीर्तनाचा कार्यक्रम झाला. दुपारी १२ च्या सुमारास फुलांनी सजविलेल्या रथामध्ये माउलींची प्रतिमा ठेवण्यात आली. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्या वेळी मातोश्री सरुताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, कोल्हापूरचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांचे शुभहस्ते हा सोहळा प्रारंभ झाला.

यावेळी डॉ. ऊर्मिला येळगावकर, रेणू येळगावकर, अभिजित येळगावकर, धनंजय चव्हाण, बाळासाहेब माने, अनिल भोसले, विशाल बागल, भाजपचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप माळी, सुरेश पाटील, ट्रस्टचे सचिव रवींद्र शेठ बाबर,पांडुरंग लोहार, ब्रह्माकुमारी शिवानी दीदी आदी मान्यवर उपस्थित होते. रथोत्सवात माउलींच्या पालखी पुढे हत्ती, घोडे, उंट, ढोल ताशा पथक, ढोल गजी पथक, भजनी मंडळ, शाळकरीमुलांची लेझीम व झांजपथके सहभागी झाली होती.सोनिया गोरे म्हणाल्या, “मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मा सरुताई ट्रस्टसाठी ४५ लाख रुपये उपलब्धकरून देण्यात आले असून, देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ”

दरम्यान, येथील मुस्लिम समाज बांधव व अजंठा फ्रेंड सर्कल नूराणी मोहल्ला व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मायणी शहर यांचे वतीने भाविकांसाठी पाणी व चहा वाटप करण्यात आले. रथ मुख्य पेठ, बस स्टँड, चांदणी चौक परिसर येथून रात्री उशिरा माऊलींच्या मठात परतला. मायणीचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चौकट :- रथावर उच्चांकी रुपये भक्तांकडून दान श्रीसंत मातोश्री सरुताई यांच्याप्रती श्रद्धाभाव ठेवणाऱ्या भक्तात वर्षानुवर्ष वाढ होताना दिसून येत आहे. यंदाच्या १३ व्या पुण्यस्मरण सोहळ्यात भाविकांनी सढळ हाताने रथावर देणगी स्वरुपात तब्बल १४५४९८० /- इतक्या रुपयांचे दान केले. ही. रक्कम आजवरच्या तुलनेत उच्चांकी ठरले आहेत.

(फोटो – मातोश्री सरुताईंच्या पालखी व रथसोहळ्याचे पूजन करून प्रारंभ करताना मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे, डॉ. दिलीपराव येळगावकर , श्री.काडसिद्धेश्वर महाराज व मान्यवर. (छाया – दत्ता कोळी)

Views: 155
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
भारताला हिंदूराष्ट्र म्हणून संवैधानिक दर्जा मिळायला हवा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

आयुष्यातले सांगाती ३०,डॉ. श्रीकांत जिचकार,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)