• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ३०,डॉ. श्रीकांत जिचकार,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
September 14, 2025
in Uncategorized
0
भारताला हिंदूराष्ट्र म्हणून संवैधानिक दर्जा मिळायला हवा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!,

आयुष्यातले सांगाती ३०,डॉ. श्रीकांत जिचकार,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.नागपुरात काल बोले पेट्रोल पंप ते विद्यापीठ परिसर चौक या अमरावती मार्गावरील अडीच किलोमीटर रस्त्यावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले.

या उड्डाणपुलाला ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. या पुलाला डॉ. जिचकारांचे नाव देण्यामागे कारण असे की याच मार्गावर असलेल्या भरत नगर परिसरात जिचकारांचे घर आहे. दुसरे म्हणजे अमरावती मार्गावरच जिचकारांचा अपघात झाला होता, आणि तिथून त्यांना जखमी अवस्थेत याच मार्गावरील रवी नगर चौकात असलेल्या डॉक्टर दंदेंच्या हॉस्पिटलमध्ये आणले असताना तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.

काल हे लोकार्पण झाले आणि योगायोगाने उद्या म्हणजेच १४ सप्टेंबरला डॉ. श्रीकांत जिचकारांची ७१ वी जयंती आहे. डॉ. जिचकार हे एक चतुरस्त्र राजकारणी तर होतेच, पण एक अभ्यासू वक्ते देखील होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एक विद्वान म्हणून ओळखले गेले होते. त्यांनी अत्यल्प आयुष्यात अनेक पदव्या मिळवल्या आणि या पदवी परीक्षांमध्ये अनेक पुरस्कारही मिळवले. आयएएस आणि आयपीएस परीक्षा देखील ते उत्तीर्ण झालेले होते. राजकारणासोबत अर्थकारण समाजकारण वैद्यकशास्त्र साहित्य इतकेच काय तर वेदविद्यांचा देखील त्यांचा दांडगा अभ्यास होता.

अशा या चतुरस्त व्यक्तिमत्त्वाचा जनसंपर्क देखील प्रचंड होता. सर्वच स्तरात त्यांचे मित्र पसरले होते. त्या अनेक मित्रांपैकी मी देखील एक होतो. तसा विचार करता आम्ही दोघे समवयस्कच, आणि पुन्हा नागपूरकर. त्यामुळे माझी आणि श्रीकांत जिचकारांची चांगलीच मैत्री जमली होती.एस एस सी झाल्यावर मी हिस्लॉप कॉलेजमध्ये गेलो. त्यावेळी मला आठवते, एकदा एका वादविवाद स्पर्धेत श्रीकांत जिचकार एस एफ एस कॉलेज कडून स्पर्धक म्हणून आला होता. मात्र त्यावेळी त्याची ओळख झाली नव्हती. पुढे बीएससी पार्ट वन नंतर आमच्यातले बरेच मित्र इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला गेले. श्रीकांत सुद्धा मेडिकलचाच विद्यार्थी झाला होता. आमच्यासोबत असलेले शशांक सुभेदार, सुनील देशपांडे, उदय बोधनकर असे बरेच मित्र मेडिकललाच होते. त्यांच्याकडून अधून मधून श्रीकांत जिचकार बद्दल कानावर यायचे. मात्र प्रत्यक्ष भेट नव्हती.आमच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला १९७५ मध्ये. त्यावेळी मी कॉलेज शिक्षण आटोपून बाहेर निघालो होतो. श्रीकांत मात्र एमबीबीएस चा अभ्यासक्रम पूर्ण करत होता. त्यावर्षी विद्यापीठ विद्यार्थी संघाने उत्कृष्ट विद्यार्थी स्पर्धा घेतली होती. त्यात श्रीकांत नागपूर विद्यापीठातून उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवडला गेला होता.

१९७५ च्या बहुदा जून महिन्यात एक दिवस नागपूरच्या सरोज टॉकीज समोर मी आणि माझा मित्र राजा गवळी आम्ही दोघे बोलत उभे होतो. तितक्यात स्कुटरने तिथे श्रीकांत जिचकार येऊन पोहोचला. माझा त्याचा परिचय नव्हता. मात्र राजा गवळीची त्याची चांगली ओळख होती. राजाने लगेच त्याला थांबवून त्याचे अभिनंदन केले.

मग माझी देखील ओळख करून दिली. हा माझा मित्र अवी पाठक. मग मी देखील श्रीकांतशी हात मिळवला. पाच एक मिनिट आम्ही गप्पा मारल्या असतील. त्यावेळी सरोज टॉकीज मध्ये मिली हा सिनेमा लागला होता. तो बघायला श्रीकांत आत निघून गेला. ही त्याची आणि माझी पहिली भेट होती.त्यानंतर बरेच दिवस आमची भेट नव्हती. दरम्यान मी मुंबई दूरदर्शन वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत झालो होतो. १९७७ ला नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाची अध्यक्षपदाची निवडणूक होती. त्याचे वृत्त संकलन करायला मी गेलो होतो. अध्यक्षपदासाठी श्रीकांत जिचकार विरुद्ध नितीन गडकरी अशी लढत होती. श्रीकांतला ९१ मते मिळाली तर नितीनला ८९ श्रीकांत दोन मतांनी विजयी झाला. त्या निकालाच्या वेळेस पुन्हा एकदा माझी श्रीकांतची भेट झाली होती.

तेव्हापासून मग अधून मधून आमच्या भेटी होऊ लागल्या. कधी कोणत्या कार्यक्रमात तर कधी विद्यार्थी आंदोलन असे आम्ही भेटू लागलो. मात्र त्या भेटी अशा घाई घाईतच व्हायच्या. त्यावर्षी श्रीकांत ने विद्यापीठ विद्यार्थी संघात विद्यार्थ्यांच्या अभिरूप संसदेचा प्रयोग केला होता तो प्रचंड गाजला होता त्याचे वृत्त संकलन करण्यासाठी मी दोन दिवस तिथे गेलो होतो.१९८० च्या विधानसभा निवडणुकीत श्रीकांत काटोल विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीला उभा राहिला. त्यावेळी तो विजयी झाला. तेव्हा त्याचे वय जेमतेम २५ वर्षाचे होते. लगेचच एक दिवस नागपूरला विमानतळावर तत्कालीन राज्यपाल यायचे होते. त्यांच्या स्वागताचे चित्रीकरण करण्यासाठी मी विमानतळावर गेलो होतो. तिथे श्रीकांत जिचकार सुद्धा आला होता. आता श्रीकांत एक आमदार असल्यामुळे मी जरा अंतर राखूनच उभा होतो.

तितक्यात नागपूर महाविद्यालयाचे संस्कृत विभागप्रमुख डॉ. मधुकर आष्टीकर तिथे आले, आणि त्यांनी मला सोबत नेऊन श्रीकांत जिचकारशी ओळख करून देऊ लागले. तर श्रीकांतने लगेच सांगितले अहो मी याला चांगला ओळखतो सर. हा अविनाश पाठक. आमची जुनी मैत्री आहे. आणि मग तो माझ्याशी गप्पा मारू लागला. त्यावेळी आम्ही समवयस्क असलो तरी श्रीकांत आमदार होता. त्यामुळे मी त्याच्याशी आदराने बोलू लागलो. तेव्हा त्यानेच मला हटकले. अरे यार हे अहो जाहो बंद कर. आपण जुने मित्र आहोत. तसेही तुझे जुने शाळेतले क्लासमेट्स माझ्याबरोबर मेडिकलला होते. ते माझे मित्रच आहेत. मग आपण पूर्वीसारखे एकेरीतच बोलूया. मग त्या दिवशीपासून मी त्याच्याशी एकेरीतच बोलू लागलो. विधानसभा सदस्य म्हणून श्रीकांतची कारकीर्द चांगलीच गाजत होती. अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तो प्रमुख अतिथी म्हणून असायचा. तिथे त्याची विद्वत्तापूर्ण भाषणे ऐकणे हा एक आनंद असायचा.

एकदा होमिओपॅथी डॉक्टर्सच्या एका परिसंवादात तो प्रमुख पाहुणा म्हणून गेला होता. तिथे मी देखील होतो. श्रीकांत ऍलोपॅथी डॉक्टर, मात्र त्याने होमिओपॅथीवर देखील अभ्यासपूर्ण भाषण दिले होते. त्यावेळी अंतुले मुख्यमंत्री होते. श्रीकांत सुद्धा मंत्रिमंडळात येणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र त्याचे नाव काही येत नव्हते. योगायोगाने १९८२ च्या जानेवारी महिन्यातच अंतुलेंचे सरकार कोसळले आणि बाबासाहेब भोसले यांचे सरकार सत्तेत आले. त्या सरकारमध्ये लगेचच श्रीकांतला राज्यमंत्री म्हणून शपथ दिली गेली. अवघ्या २८ व्या वर्षी तो मंत्रिमंडळात आला होता. मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर तीन-चार दिवसांनी तो नागपुरात आला. संध्याकाळी विमानतळावर स्वागत झाले तेव्हा त्याची माझी भेट झाली खरी. पण ती खूपच घाईत झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकांत विनोबा भावे यांना भेटायला पवनार आश्रमात आला. मी आधीच पवनारला पोहोचलो होतो. तिथे प्रवेशद्वारावरच मी कॅमेरा घेऊन उभा होतो. कारमधून उतरल्यावर श्रीकांत पुढे चालत येतानाच त्याचे माझ्याकडे लक्ष गेले. लगेचच त्याने काय अविनाश कसा आहेस म्हणून मला आवाज दिला. मग मी समोर जाऊन त्याच्याशी हात मिळवला. त्याने थोडा वेळ थांबून चौकशी केली आणि मगच तो पुढे दिनोबांना भेटायला आश्रमाच्या आत निघाला. निघताना मग पुन्हा थोडा वेळ थांबून आमचे बोलणे झाले होते.श्रीकांत मंत्री झाल्यावर त्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे चित्रीकरण करायला मला जावे लागत होते. नागपूर दूरदर्शन केंद्राचा शिलान्यास समारंभ झाला त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. पंतप्रधान यांच्या आगमन प्रसंगी विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेने अचानक मला आज जाण्यापासून रोखले.

योगायोगाने तितक्यातच तिथे श्रीकांत येऊन पोहोचला. माझा आणि सुरक्षारक्षकाचा वाद चालू असलेला पाहून तो थांबला आणि त्याने विचारले “काय अविनाश काय प्रॉब्लेम आहे?” मी त्याला इथे अडवले जात असल्याचे सांगताच त्याने त्या सुरक्षारक्षकाला चांगलेच धारेवर धरले. लगेचच त्याच्या वरिष्ठांना बोलावून त्यांनाही सांगितले आणि दूरदर्शनच्या छायाचित्रकाराला असे अडवत जाऊ नका असेही सुनावले होते. १९९२ च्या नोव्हेंबर महिन्यात आचार्य विनोबा भावे यांची तब्येत अचानक बिघडली. साऱ्या देशाचे लक्ष तिकडे लागून राहिले होते. परिणामी मुंबई दूरदर्शनचे वृत्त संपादक डॉ. गोविंद गुंठे आणि इतर दोघे नागपूरला येऊन थांबले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी श्रीकांत जिचकार विशेष विमानाने मुंबईतील जसलोकचे तज्ञ डॉक्टर गोयल यांना घेऊन आला होता.

त्यावेळी चित्रीकरण करण्यासाठी डॉ. गुंठे आणि आम्ही इतर सर्व सहकारी पवनारला पोहोचलो होतो. श्रीकांत आणि डॉ. गोयल लगेच परत जाणार होते. त्यामुळे दूरदर्शनच्या फिल्म्स आणि टेप्स त्यांच्यासोबत पाठवायच्या असे ठरले. मग मी जाऊन श्रीकांत शी बोलायचे ठरवले. माझ्यासोबत डॉ. गुंठे सुद्धा आले. श्रीकांत समोर जाताच मी लगेच त्याला बोललो “अरे श्रीकांत आमच्या या टीव्हीच्या फिल्म्स आणि टेप्स तुझ्याजवळ देतोय. घेऊन जाशील ना. त्याने लगेच “हो ते मी माझ्या पीएला सांगतो घ्यायला” असे म्हणून त्याने पीएला आवाज द्यायला तो मागे वळला. एव्हाना डॉ. गुंठेंनी मला झापायला सुरुवात केली “अरे अविनाश जिचकार साहेब राज्यमंत्री आहेत, आणि तू त्यांना चक्क ए श्रीकांत म्हणून हाक मारतोस” मी त्यांना सांगितलं “डॉक्टर तो माझा जुना मित्र आहे” तरी ते मला रागवतच होते. इतक्यात श्रीकांत वळला आणि त्याने आमचा काहीतरी वाद चालू असलेला बघितले. काय झाले म्हणून त्याने विचारले तेव्हा मी त्याला सांगितले की तुला एकेरीत हाक मारल्याबद्दल डॉक्टर गुंठे मला रागवत आहेत. तर श्रीकांत लगेच बोलला “डॉक्टर मी आणि अविनाश जुने मित्र आहोत त्यामुळे तो माझ्याशी एकेरीतच बोलणार. तुम्ही काही माईंड करू नका.” मग डॉक्टर गुंठे सुद्धा शांत झाले होते. विनोबांचे आजारपण आणि त्यांचे निधन हा कार्यक्रम जवळजवळ आठ नऊ दिवस पुरला.

त्या दरम्यान श्रीकांतची माझी नियमित भेट होत होती. दररोज विशेष विमानाने जाताना त्याच्याजवळ हक्काने फिल्म आणि टेप देत असे. तो देखील मुंबईला नेऊन दूरदर्शन ला पोहोचवण्याची व्यवस्था करत असे.विनोबांच्या आजारपणात त्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी येणार होत्या. आदल्या दिवशी संध्याकाळी नागपूरहून दूरदर्शनची मी सोडून सर्व मंडळी सरकारी जीप ने पवनार ला रवाना झाली. मात्र रस्त्यातच सेलू जवळ त्यांच्या जीपला अपघात झाला. जीपमध्ये पाच जण होते. त्यापैकी दोघे चांगलेच जखमी झाले होते. रात्री उशिराच ही बातमी सर्वत्र पोहोचली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला घरी शासकीय अधिकाऱ्यांचे फोन आले, आणि सद्य परिस्थितीत चित्रीकरणासाठी मी ताबडतोब निघावे असे सांगण्यात आले. मी तयारीला लागलो. तितक्यात दुसरा फोन वाजला. मी तो उचलला तर तो फोन श्रीकांतचा होता. “काल दूरदर्शनच्या वाहनाला अपघात झाल्याचे कळले. तू तर त्यात नव्हतास ना” असे त्याने विचारले.

मी त्या मध्ये नव्हतो असे सांगतात त्याने “थँक्स गॉड” म्हणून सुस्कारा सोडला. पवनारला भेटूच असे सांगून त्याने फोन बंद केला. पवनारला गेल्यावर थोड्या वेळातच श्रीकांतही तिथे पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याने गाडीत कोण होते त्याची चौकशी करत तिथे तशाही स्थितीत वृत्त संकलनाला कोण कोण आले ते विचारून त्या सर्वांना भेटून त्याने विचारपूसही केली होती. योगायोगाने वर्षभरातच श्रीकांतचे मंत्रीपद गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणूकीत त्याच्या पक्षातील मित्रांनीच धोकेबाजी करून त्याला पाडले. तरीही श्रीकांत चे काम सुरूच होते. दरम्यान शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी श्रीकांतला विधान परिषदेत सदस्य म्हणून घेतले आणि आपल्या मंत्रिमंडळातही घेतले. यावेळी अर्थ खाते देखील श्रीकांत कडेच आले होते. त्या काळात मी नागपूरला केंद्र सरकारच्या एका योजनेत व्हिडिओ कार्यक्रम निर्मिती केंद्र उभारण्याचा घाट घातला होता.

तिथे महाराष्ट्र शासनाकडून काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी मी श्रीकांतकडे वारंवार जात असे. राज्य शासनातील आपले वजन वापरून त्याने मला योग्य ती मदत देखील केली होती. मात्र तो प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात श्रीकांतचे पुन्हा मंत्री पद गेले. या काळात श्रीकांत ने ज्योतिषाचा अभ्यास देखील सुरू केला होता. मंत्रिपद गेल्यावर एकदा डॉ. शशांक सुभेदार च्या क्लिनिक मध्ये काही कामाने मी गेलो असता तिथे श्रीकांत देखील आला. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यावेळी मी देखील ज्योतिष्यशास्त्राचा जुजबी अभ्यास करू लागलो होतो. तेव्हा विविध अंगांनी आमच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. तोपर्यंत श्रीकांत ब्रह्मचारीच होता. अचानक एक दिवस श्रीकांतचे लग्न ठरल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाले.

मग मी श्रीकांतला फोन केला आणि त्याचे अभिनंदनही केले. लग्नाची तारीख लवकरच काढतो आहे. मग तुला कळवतोच असे त्याने त्यावेळी सांगितले होते. श्रीकांतचे लग्न म्हणजे एक ऐतिहासिक घटना होती. त्याने वैदिक पद्धतीने स्वतःचे तर लग्न केलेच, पण अविनाश पांडे, सुनील देशमुख आणि माधव सोलव या तिघा मित्रांचाही आपल्याच सोबत सामूहिक विवाह सोहळा घडवून आणला. नागपूरच्या विद्यापीठ क्रीडांगणावर त्याने विवाह सोहळा आयोजित केला होता. तिथे त्याचे अभिष्टचिंतन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला फक्त एक बुंदीचा लाडू देऊन तोंड गोड केले जाते होते. अनावश्यक देखावा आणि खर्च त्याने टाळला होता. त्यावेळी तिथे आलेल्या असंख्य उपस्थिततांमध्ये मी देखील एक होतो. वर्षभरानेस माझेही लग्न झाले. लग्नाचे निमंत्रण श्रीकांतला पाठवले होते. मात्र तो येऊ शकला नव्हता. त्याने पत्र पाठवून शुभेच्छा कळवल्या होत्या.

नंतर धनवटे रंग मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात माझी त्याची भेट झाली. कार्यक्रमाच्या आधी तिथल्या विशेष अतिथी कक्षात तो बसला आहे असे कळताच मी तिथे गेलो. तेव्हा मी भेटताच त्याने अभिनंदन केले आणि आमची वहिनी कुठे आहे अशी चौकशी केली. सोबत माझी पत्नी होतीच तिची ओळख करून दिल्यावर तिच्याही त्याने चांगल्या फिरक्या घेतल्या होत्या. वर्षभरानेच श्रीकांतची निवड राज्यसभेसाठी झाली. मग तो राज्यसभेत केला. परिणामी आमच्या भेटी कमी झाल्या. तरीही दर दिवाळीला आमची भेट होत असे. एमबीबीएस झाल्यावर त्याने धरमपेठ मेन रोडवर एक गाळा घेऊन क्लिनिक सुरू केले होते. मात्र पुढे जाऊन ते त्याचे जनसंपर्क कार्यालयच बनले होते. आम्ही मित्र तिथे श्रीकांत ची मेडिकल कन्सल्टन्सी नसून पॉलिटिकल कन्सल्टन्सी आहे अशी थट्टाही करायचो. कधीमधी येता जाता तिथे त्याची भेट व्हायची.

दरम्यान मी देखील दूरदर्शन सोडून मुद्रित माध्यमांमध्ये सक्रिय झालो होतो. १९९६ आणि १९९८ च्या निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान आमच्या बऱ्याच भेटी झाल्या होत्या. नागपूरचे जुने दैनिक नागपूर टाइम्स आणि नागपूर पत्रिका ही दोन्ही वृत्तपत्रे चालवणारे व्यवस्थापन डबघाईला आले होते. त्यामुळे १९९३ मध्ये श्रीकांतने ही दोन्ही वृत्तपत्रे चालवायला घेतली. तेव्हा मी देखील पत्रकारितेत काम सुरू केले होते. श्रीकांतने तेव्हा मला तिथे बोलावले. देखील मात्र काही कारणांमुळे मी तिथे कामाला गेलो नाही, पण माझ्या बातम्या आणि लेख तिथे प्राधान्याने घेण्याबाबत त्याच्या सूचना होत्या. नंतर १९९६ मध्ये ही दोन्ही दैनिके बंद पडली. त्यावेळी दिलीप देवधर च्या ज्ञानयोद्धा व्याख्यानमालेत श्रीकांतची अनेक भाषणे व्हायची. त्यावेळी नेहमी आमच्या भेटी व्हायच्या.१९९७ मध्ये नागपुरात ज्योतिषांचे एक अखिल भारतीय संमेलन झाले होते. तिथे उद्घाटन समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत आला होता. त्यावेळी दोनच दिवस आधी नागपुरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पत्र परिषद घेऊन या संमेलनाला विरोध केला होता.

त्यावेळी त्यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात श्रीकांतने अभ्यासपूर्ण विवेचन करून त्यांचे सर्व मुद्दे खोडून काढले होते. राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यावर श्रीकांतला महाराष्ट्र शासनाने विश्वकोश निर्मिती मंडळाचा अध्यक्ष म्हणून नेमले होते. तिथे त्याने अनेक नवे नवे प्रयोग केले त्यावेळी त्याची मुलाखत घेण्यासाठी मी गेलो होतो. त्याने तेव्हा तू देखील विश्वकोश मंडळात ये तुला इथे चांगला स्कोप राहील म्हणून मला ऑफरही दिली. मात्र तोपर्यंत मी पत्रकारितेत रमलो होतो. माझा स्वतःचा दिवाळी अंक काढणे सुद्धा मी सुरू केले होते. त्यामुळे मग मी विश्वकोश मंडळाच्या कामात स्वतःला गुंतवून घेतले नव्हते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने श्रीकांतला रामटेक लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात शिवसेनेचे सुबोध मोहिते उभे होते. त्यावेळी प्रचारादरम्यान बरेचदा आमच्या भेटी व्हायच्या.

मात्र त्या निवडणुकीत श्रीकांतला पराभूत व्हावे लागले. आणि त्यानंतर जेमतेम महिनाभरातच श्रीकांतचा अपघात झाल्याचीच बातमी आली. मी संध्याकाळी एका ठिकाणी बसलो असतानाच अचानक मोबाईलवर फोन आला. जिचकारांच्या कारला अपघात झाला आहे आणि त्यांना जखमी अवस्थेत दंदे हॉस्पिटलमध्ये आणले जाते आहे अशी माहिती कळली. मी लगेचच स्कूटर काढून दंदे हॉस्पिटल कडे धावलो. तिथे पोहोचेपर्यंत श्रीकांतची प्राणज्योत मावळली होती. दुसऱ्या दिवशी काटोल जवळ श्रीकांतच्या शेतीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याने अग्निहोत्र स्वीकारले होते. त्यामुळे पूर्णतः वैदिक पद्धतीने त्याचे अध्यक्ष संस्कार झाले. पन्नाशीच्या आतच एका विद्वान अभ्यासकाचे आयुष्य संपले होते. श्रीकांतचा माझा संबंध जवळ जवळ ३० वर्ष होता. मात्र या काळात तो माझा चांगला मित्र झाला होता. तो आमदार झाला, मंत्री, खासदार, विश्वकोश मंडळाचा अध्यक्ष असे सर्व काही झाला. मात्र माझ्याकरिता तो माझा मित्र श्रीकांतच राहिला. आजही त्याच्या आठवणी मनात कायम आहेत.

Views: 204
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
प्रीतीताई घार्गे- पाटील यांच्या वाढदिवस निम्मित के एम शुगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रीतीताई घार्गे- पाटील यांच्या वाढदिवस निम्मित के एम शुगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)