• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अविनाश पाठक लिखित शह-काटशह पुस्तकाचे हंसराज अहिर यांचे हस्ते होणार प्रकाशन

माणगंगा by माणगंगा
September 20, 2025
in Uncategorized
0
अविनाश पाठक लिखित शह-काटशह पुस्तकाचे हंसराज अहिर यांचे हस्ते होणार प्रकाशन

अविनाश पाठक लिखित शह-काटशह पुस्तकाचे हंसराज अहिर यांचे हस्ते होणार प्रकाशन

साहित्य भारतीचे आयोजन

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

नागपूर – अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, विदर्भ प्रांताच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित शह काटशह या राजकीय कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आर. एस. मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर उपस्थित राहणार असून दै. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित आणि आकाशवाणीचे निवृत्त उपसंचालक वृत्त आणि साहित्यभारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री नीतीन केळकर या पुस्तकावर भाष्य करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य भारती विदर्भ प्रांताचे अध्यक्ष एड. लखनसिंह कटरे हे राहणार आहेत.

अविनाश पाठक यांचे शह काटशह हे पंधरावे पुस्तक असून तिसरा राजकीय कथांचा संग्रह आहे. शह काटशह हे पुस्तक नागपूरच्या लाखे प्रकाशन (निशिगंधा बुक एजन्सी)ने प्रकाशित केले आहे. अविनाश पाठक यांचे यापूर्वी दाहक वास्तव, कालप्रवाहाच्या वळणांवरून, मागोवा घटितांचा आणि दृष्टिक्षेप हे चार वैचारिक लेखांचे संग्रह, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज हे ललित लेखसंग्रह, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी मराठी वांङमय व्यवहार: चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक, काळ्या कोळशाची काळी कहाणी हे देशात गाजलेल्या कोळसा घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक, तर सत्तेच्या सावलीत आणि डावपेच हे राजकीय कथासंग्रह अशी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या यातिल काही पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्कारासह विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. याशिवाय पत्रकारितेतील योगदानासाठी अविनाश पाठक यांना नागपूरकर भोसले परिवाराचा राजरत्न पुरस्कार नाशिक येथील पत्रकार संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार, अरविंद बाबू देशमुख प्रतिष्ठानचा पुरस्कार, मातोश्री प्रतिष्ठानचा पत्ररत्न पुरस्कार, दर्पण पुरस्कार, पत्रभूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला साहित्य प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य भारती विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष चंद्रकांत लाखे, प्रांत मंत्री सुनील शिनखेडे, कार्यालय मंत्री विनय माहूरकर आणि संघटन मंत्री डॉ चंद्रशेखर भुसारी प्रभृत्तींनी केले आहे.

Views: 95
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
“विद्यार्थी देशाचा पाया त्याला घडविणे आपली सामूहिक जबाबदारी – राहुल सुरवाडे यांचे प्रतिपादन

“विद्यार्थी देशाचा पाया त्याला घडविणे आपली सामूहिक जबाबदारी - राहुल सुरवाडे यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)