“विद्यार्थी देशाचा पाया त्याला घडविणे आपली सामूहिक जबाबदारी – राहुल सुरवाडे यांचे प्रतिपादन
पुणे जिल्हा परिषद शाळा वडकी नाला ता. हवेली येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संस्थेच्या वतीने करण्यात आले आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभर सध्या चालु आहे.
त्यातचं काल जिल्हा परिषद शाळा वडकी नाला येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संस्थेच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीमाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी होळकर वाडी केंद्रातील विद्यार्थीना संस्थेच्या वतीने बॅग, बसण्याची मॅट व चप्पल इत्यादी साहित्य देण्यात आले. संस्थेने यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा मानस केला असुन त्यासाठी कष्टकरी शेतकरी, कामगार व एखाद्या व्याधीने ग्रस्त अनाथ व एकल पालकांच्या गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व त्याचे पालकत्व घेण्याचे ठरविले आहे.
त्यासाठी संस्थेने ध्येय व उद्दिष्ट ठेवून कार्य आराखडा तयार केला असून त्यानुसार जिल्हा परिषद शाळेमध्ये साहित्य वाटप त्याच बरोबर मुलींना स्व:संरक्षणाचे धडे देण्याचे कार्य सध्या हाती घेतले आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बॅग, बसण्याची मॅट व चप्पल इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक राहुल सुरवाडे यांनी सांगितले कीं, विद्यार्थ्यांना ध्येय गाठायचे असेल तर प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास केल्यास नक्कीच यश गाठता येते आज आपला सन्मान त्याचे द्योतक आहे. त्यासोबतच माणसाने मानवता धर्म जोपासणे सुद्धा आजच्या काळात फार गरजेचे आहे. ही मदत सुद्धा त्याचाच भाग आहे. देण्याची सवय माणसाने बाळगणे फार गरजेचे आहे. विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहे त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आम्हीं आमचे कर्तव्य समजतो.कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ फडतरे हे म्हणाले, विद्यार्थ्यांनी बौद्धिक प्राप्ती साधण्यासाठी प्रचंड वाचन केले पाहिजे आझाद नारी फाउंडेशन च्या अशा स्तुत्य कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळते .
आपातकालीन संकट असो अथवा सामाजिक शैक्षणिक कार्य असो आझाद नारीची संपूर्ण टीम हे स्वतःला झोकुन देवून काम करते त्यामुळे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून, विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून कौतुकाची थाप पडते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम आहे असे कौतुक देखील त्यांनी याप्रसंगी केले.!सदरील कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य जुबेर तांबोळी , खेमराज टकुल्ला, व्यवस्थापक मालाबार ज्वेलर्स प्रसाद , यांनी मदत केली. शाळा व्यवस्थापन समिती नवनाथ फडतरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते .प्रमुख पाहुणे म्हणून राहुल सुरवाडे ,सपना क्षीरसागर लाभले होते.गणेश शेवाळे, पंडित झेंडे, शरयू ढवळे, उर्मिला साबळे, सोनम साबळे, भरत गुळूंजकर मोनाली जाधव ,अक्षदा जाधव आदी उपस्थित होते.
दिपाली चौधरी, सुलोचना आल्हाट, अनिता इंदलकर, संगीता पवार आदी शिक्षकवृंद. तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक तावरे यांनी केले तर शिक्षिका सीमा भंडारे यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.


