वाघडू शिवारात बिबट्याने गायीचा फडशा पाडला..
प्रविण अहिरे
वाघडू ता. चाळीसगाव:
काही महिन्यापूर्वी रांजणगाव शिवारात बिबट्याने हैदोस घातला होता. त्यानंतर बिबट्या जाळी लावून जेरबंद केला होता. त्यामुळे परिसरात बिबट्याच्या कारवाया थंडावल्या असे वाटत असतांनाच वाघडू गावानजीक असलेल्या शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने झडप घालून ठार केल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेने वाघडू परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाघडू येथील दिलीप झिपरू पाटील यांचे गावालगत शेत असून या शेतात नेहमीप्रमाणे गाय बांधलेली होती. गुरूवारी सकाळी दिलीप पाटील हे शेतात गेले असता गाय हंबरण्याचा आवाज आला नाही म्हणून ते गाय बांधलेल्या ठिकाणी गेले असता गाय मृतावस्थेत आढळून आली. गायीचे पोट फाडलेल्या अवस्थेत मिळून आली. घटनास्थळी बिबट्याचे पदमार्क आढळून आले.
त्यामुळे बिबट्यानेच गायीवर हल्ला केला असावा असे शेतकर्यंाचे म्हणणे आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने शेतकर्याचे ४० ते ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहीती वन विभागाला देण्यात आली. दरम्यान वन विभागाकडून घटना स्थळ परिसरात पिंजरे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.


