बापूजी!!! राष्ट्रपिता महात्मा गांधी!!!!! राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!! समाजसेवक, उद्योजक, विचारवंत, कवी, लेखक शरद (अण्णा ) उखा पवार यांचे मनोगत !!!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
रघुपती राघव राजाराम! पतित पावन सीताराम!! महात्मा गांधी यांचे जगप्रसिद्ध भजन होते!!!
हिंदू कुटुंबात जन्म घेतलेल्या महात्मा गांधी याचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते, वडिलाचे नाव करमचंद उत्तमचंद गांधी,आईचे नाव पुतळाबाई करमचंद गांधी होते.तर महात्मा गांधी यांचा जन्म ०२/१०/१८६९ रोजी पोरबंदर (गुजरात) येथे गांधी घराण्यात जन्म झाला, महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा मोहनदास गांधी होते. त्यांना हरिलाल, मणिलाल,रामदास व देवदास चार मुले होती. महात्मा गांधी हे देशभक्त, वकील, बॅरिस्टर,लेखक, कवी, समाजसेवक, सत्याग्रही, सत्यवादी, अहिंसावादी, प्रेमळ व्यक्तिमत्व,प्रेम व करुणा, स्वराज चा संदेश देणारे मोहनदास करमचंद गांधी होते!!!
महात्मा गांधी यांनी लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले, नंतर त्यांनी दक्षिण आफ्रिका येथे वकिली केली, गांधीजी यांना दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदचा त्रास झाला,त्याचानंतर तिथे वर्णभेदासाठी लढा दिला, मग त्यांनी सत्याग्रह व अहिंसा विकसित करून लढा यशस्वी केला. मोहनदास करमचंद गांधी यांना राष्ट्रपिता नावाने ओळखले जाऊ लागले, तर त्यांना बापूजी टोपणनाव नावाने लोक हाक मारत असतं,तर महात्मा गांधी यांनी भारतातील स्वातंत्र्यलढासाठी स्वराज ची घोषणा देणारे महात्मा गांधी होते, अहिंसा व सत्याग्रह मार्गाने ब्रिटिश राजवट विरुद्ध लढा दिला!!!
१९१५ मध्ये महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवट विरुद्ध जो लढा उभा केला, त्याचा मध्ये अहिंसक व शांततेचा मार्गाने लढा सुरू केला, मिठाचा सत्याग्रह,दांडी यात्रा, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन, भारत छोडो आंदोलन सर्व भारत देशातील लोकांना एकत्र करून स्वातंत्र्य साठी प्रेरणा देऊन लढ्यात सामील केलं. गांधीजी यांनी अहिंसा व सत्याचा मार्ग व अन्याय दूर करणे हाच हेतू होता. खेडयातील लोकांना शिक्षण, शेती व व्यक्तीचा विकास कसा करावा त्याकरिता महत्वाची भूमिका घेतली. शिक्षणाचे महत्त्व, शिक्षण सक्तीचे हवं, स्वदेशी, स्वावलंबन या तत्वे सर्व गावागाड्यातील लोकांना रुजवली, शांतता मध्ये क्रांती करता येते, त्या क्रांतीतून एकता तयार करून एकजुट तयार होते,हीच शिकवण महात्मा गांधी यांनी भारतातील स्वातंत्र्यलढासाठी स्वराज साठी दिली होती!!!
२ ऑक्टोबर हा दिवस भारतात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा करण्यात येतो, तर जगाभरात जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. महात्मा गांधी यांनी शेती, खेड़ा विकास, शेतकरी पीके,सामाजिक कार्य, दारूबंदी, मांसाहारी बंदी, गरिबी हटाव, शिक्षण व जातीत जाती उच्चनीच भेदभाव, नागरिकाचे हक्क व अधिकार, स्वदेशी, स्वावलंबन, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता चे भेदभाव निवारण व महिलांचे हक्क व अधिकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली!!!
महात्मा गांधी यांनी आपले आयुष्य सत्याचा साठी, सर्वात महत्त्वाचे लढा वाईट प्रवृत्ती, भय असुरक्षितता याचा विजय प्राप्त करणे होतो, परमेश्वर सत्य आहे, सत्य हेच परमेश्वर आहे. अहिंसा मार्गाने कोणतेही काम इतिहास करतो, सत्य व प्रेमाचा विजय होतो,तर कुरकर्म करणारे चे पराभव होतो. महात्मा गांधी शुद्घ शाकाहारी होते, लंडन शिकायला जाण्याआधी त्याची आई पुतळाबाई यांना एक वचन दिले होते की मांस, बाई व दारू पासून दूर रहा.हेच वचन त्यांनी आयुष्यभरासाठी अबाधित ठेवले!!!
१९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी ग्रामीण भागातील विकास व गरिबी हटाव, खेड्यात शिक्षण हवे व सक्तीचे शिक्षण हवं, त्यांनी खेड्याकडे चला हीच हाक भारत देशात दिली, तर त्यांनी ग्रामीण भागातील गरिबांची ओळख साठी धोतर व शाल साधी राहणी आयुष्यात आत्मसात केली, त्यांनी ग्रामीण भागात राहून खूप वेळा अन्नत्याग केले, साधे जेवण महात्मा गांधी करत होते. खेड्यापाड्यात, गावागावात व सर्व धर्म व पंथ यांना जाऊन भेटले, त्यांनी स्वराज चळवळ उभी केली!!!
१९२९ मध्ये ३१ डिसेंबर रोजी लाहोर येथे अधिवेशनात भारत तिरंगा ध्वज फडकवला गेला. स्वराज दिवस सर्व भारतात साजरा करण्यात येत होता. महात्मा गांधी गांधी पहिल्या महायुध्दात फार मोठी भूमिका बजावली आहे, तर दांडी यात्रा असो की गोलमेज परिषद महात्मा गांधी यांनी पुढाकार घेतला. महात्मा गांधी व आणि सुभाषचंद्र बोस,जवाहरलाल नेहरू,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्ये वेगळेवेगळे करार झाले होते!!!
१९३९ दुसरे महायुद्ध व १९४२ भारत छोडो आंदोलन मध्ये महात्मा गांधी ची भूमिका फार महत्त्वाची होती. ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारत छोडो ची चळवळ मध्ये एकच मूलमंत्र होता की करो या मरो, करा किंवा मरा याच आंदोलन मध्ये मोठे यश मिळाले. लाखो वीर हुतात्मा मरण पावले, लाखो विरपुत्र जेलमध्ये होते.त्यांची सुटका झाली.तेव्हा ब्रिटिश सरकारने जाहीर केलं. भारतीयाचा हाती सत्ता देऊन,आम्ही निघून जाणार, महात्मा गांधी यांना ५ वेळा जेलमध्ये व २ वेळ नजरबंदी मध्ये ठेवले गेले होते,तर त्यांच्यावर ७ वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करण्यात आले होते, महात्मा गांधी यांनी पूर्ण आयुष्य भारतमाते साठी व आपल्या देशासाठी अर्पण केल!!!
!!!बापूजी!!!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन..!!!


