अंतुली येथे महर्षी वाल्मीकी जयंती साजरी
त-हाडी प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील वरुळ सह अंतुली गावात महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
महर्षी वाल्मिकी यांचा जन्मदिवस आश्विन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला येतो. म्हणजेच अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते.
यावेळी आदिवासी कोळी समाजचे जेष्ठ नेते शिवाजी नाना यांनी सांगितले की, वाल्मिकी हे एक महान संत होते. हिंदू पौराणिक कथेनुसार, प्रभू श्री रामाच्या पत्नी माता सीता यांनी अयोध्या सोडून वनवास पत्करला होता. तेव्हा ऋषी वाल्मिकी यांनी त्यांना आश्रय दिला. माता सीता यांनी प्रभु श्री रामाचे पुत्र लव आणि कुश यांना ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात जन्म दिला.
वाल्मिकी जयंतीच्या दिवशी त्यांचे स्मरण आणि त्यांनी दिलेल्या ज्ञान आणि शिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. यावेळी अंतुली येथील लोकनियुक्त सरपंच आरती धर्मेंद्र ईशी , कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर माजी उपसभापती धर्मेंद्र ईशी, ललित कोळी, विजय बागुल, प्रविण क़ोळी रविंद्र ईशी हिरालाल ईशी बन्सीलाल ईशी यांच्यासह कोळी समाज बांधव उपस्थित होते.


