साहित्य कला अभ्यासक प्राध्यापक अनिल पाटील सह सचिन चौगुले यांची जाहीर संग्रहालय खरसुंडी ला सदिच्छा भेट..
शुक्रवार दिनांक 17 10 2025 रोजी मौजे हिंगणगाव तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली येथील रहिवाशी व आम्ही हिंगणगावकर परिवार चे सदस्य माननीय प्राध्यापक अनिल कुमार पाटील सह सचिन चौगुले यांची साहित्यिक रमेश जावीर यांच्या का ष्ट शिल्पचित्र संग्रहालयास सदिच्छा भेट दिली. संग्रहालयातील झाडांच्या मुळा, खोडातील पक्षी, प्राणी ,मानवी आकारातील काष्ठ शिल्प पाहून आनंदीत झाले .काष्ट शिल्प ही कला दुर्मिळ असून हे मान देशातील साहित्य कला क्रीडा संस्कृतीमध्ये विशेष म्हणावी लागेल .
जावीर सरांनी खरसुंडी सारख्या ग्रामीण भागात हे कलादालन उभारून लोक जागृती केली आहे. यावेळी प्राध्यापक अनिल कुमार पाटील म्हणाले दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही हिंगणगाव कर परिवार तर्फे लोक जागर साहित्य संमेलन समिती तर्फे साहित्य संमेलनाचे आयोजन करून श्री रमेश जावीर साहित्यिक कास्ट शिल्पकार यांचा विशेष शाल श्रीफळ रोख स्मृतिचिन्ह रक्कम देऊन सत्कार करणार असल्याचे सांगितले. यावेळी श्री रमेश जावीर सर यांनी धन्यवाद दिले .या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


