• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

त-हाडी गट परिवर्तनाची परंपरा राखणार का?

माणगंगा by माणगंगा
October 18, 2025
in Uncategorized
0

त-हाडी गट परिवर्तनाची परंपरा राखणार का?

त-हाडी- प्रतिनिधी
शिरपूर तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचा भाग असलेल्या तापीकाठ भागातील त-हाडी गट हा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या गटावर सत्ता मिळविण्यासाठी तालुक्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असतात त्यामुळे मागील काही पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी निवडून दिले नाही त-हाडी गट हा परिवर्तनवादी असल्याने ती परंपरा यंदाच्या निवडणुकीत राखणार का?
त-हाडी परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय असून या भागात सहकाराचे जाळे तळागाळात पोहचले आहे गावागावातील सहकारी सोसायटी आणि शेतकरी पतसंस्था , दूध संघ, शेतकी संघ , बाजार समिती अशा वेगवेगळ्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या गट निर्माण झाले आहे गटा तटात विभागलेले राजकारण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा पहायला मिळते आपल्या पक्षाच्या आणि गटाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी गाव पुढारी प्रयत्न करत असतात त्यामुळे त-हाडी गटाची निवडणूक अद्याप विकासावर झालेली नाही त्यामुळे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत,
सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारा हा परिसर शिरपूर साखर कारखाना बंद पडल्याने नगदी पीक घेण्याकडे वळला आहे त्यामुळे कांदा, केळी पपई कापूस , मका, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांच्या शेतीकडे वळलेला शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी होत असल्याचे चित्र दिसत आहे शेती पिकावर आधारित कोणताही प्रकल्प उभारला नाही किंवा या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे रस्ते अद्याप पक्के झाले नाहीत, शिवाय या भागातून वाहणारी तापीवरी नदीच्या सारंगखेडा बॅरेज कायमस्वरूपी उपाययोजना नाही आरोग्यसाठी सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात आले नाही त्यामुळे शेतीमुळे समृद्ध होत असलेला त-हाडी गट विकासापासून दूर आहे
विकासाच्या अपेक्षेने मतदार प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन घडवून आणतात , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहे परंतु अजून सलग त्याच पक्षाचा उमेदवाराला निवडून दिले नाही त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तनाची परंपरा राखणार होणार की पुन्हा त्याच पक्षाचा उमेदवाराला निवडून आणणार हे पाहणं औत्सुक्याचे आहे

चौकट

जातीय समीकरणाची जुळवा जुळव

त-हाडी गट हा प्रमुख दोन जातींमध्ये विभागला आहे अलीकडच्या काळात जातीय राजकारणाचे वारे राज्यात वाहत असल्याने त-हाडी गटात सुद्धा हे समीकरण जुळवले जाऊ शकते एकाच जातीचे दोन पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उभे राहिले तर दुसऱ्या जातीच्या उमेदवाराला काहीसा फायदा होऊ शकतो त्यामुळे यावेळीची निवडणुकीचा निकाल धक्कादायक असण्याची शक्यता अधिक आहे

चौकट
त-हाडी गटात महिला राज
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी नुकत्याच निघालेल्या आरक्षणा नुसार त-हाडी गटाचे आरक्षण हे अनु जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले असून त-हाडी गटातील जळोद गणात अनुसूचित जमाती महिला आरक्षण व त-हाडी गण सुद्धा इतर मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाल्याने या गटात महिलाराज असणार आहे

चौकट
त-हाडी गटातील गावे
त-हाडी , ममाणे, अभानपुर , भटाणे , वरुळ, जवखेडा,जळोद, सटीपाणी, नवी अंतुली, जुनी अंतुली, त-हाडकसबे, लोढरे,

त-हाडी गटातील गण
त-हाडी, जळोद
जळोद गण-
जळोद, सटीपाणी त-हाडकसबे, भटाणे, वरुळ,,
त-हाडी गण-
त-हाडी, ममाणे,अभानपुर, नवी अंतुली जुनी अंतुली जवखेडा लोढरे ,

चौकट
मागील जिल्हा परिषद सदस्य
चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
कलाबाई ठाकरे (काँग्रेस )
भिमराव कोळी(भारतीय जनता पार्टी)

चौकट
अशा लढतीची शक्यता
त-हाडी गटात पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेच्या उबाठा गटात होणारी निवडणूक यंदा तिरंगी होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार उभा करू शकते किंवा इच्छुक उमेदवार अपक्ष लढू शकतात त्यामुळे निवडणुक ही चुरशीची होण्याची शक्यता आहे

चौकट

पती ऐवजी पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न

त-हाडी गटाचे आरक्षण अनु जमाती महिला यासाठी राखीव झाल्याने जे पुरुष इच्छुक होते ते आता पक्षाकडे आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागणार असल्याचे चित्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टवरून पाहायला मिळत आहे

चौकट
नागरिकांच्या अपेक्षा
त-हाडी गटातील निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आणि विकासाभोवती फिरली पाहिजे गटाचा गटातटाचे राजकारण न करता केवळ प्रलंबित असलेल्या कामांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला मतदारांनी निवडून द्यावे अशी नागरिकांच्या अपेक्षा आहे सोशल मीडियावर या संदर्भात अनेक पोस्ट वायरल होत आहे

Views: 69
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कधीकाळी ‘कंगाल लोकांसाठी सोडिलेले’ वाळकेश्वर – मलबार हिल…..उमेश काशीकर यांचे मनोगत !!…..

कधीकाळी 'कंगाल लोकांसाठी सोडिलेले' वाळकेश्वर - मलबार हिल.....उमेश काशीकर यांचे मनोगत !!.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)