• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कधीकाळी ‘कंगाल लोकांसाठी सोडिलेले’ वाळकेश्वर – मलबार हिल…..उमेश काशीकर यांचे मनोगत !!…..

माणगंगा by माणगंगा
October 18, 2025
in Uncategorized
0
कधीकाळी ‘कंगाल लोकांसाठी सोडिलेले’ वाळकेश्वर – मलबार हिल…..उमेश काशीकर यांचे मनोगत !!…..

कधीकाळी ‘कंगाल लोकांसाठी सोडिलेले’ वाळकेश्वर – मलबार हिल

उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

आज केवळ मुंबईतच नव्हे, तर भारतात, वाळकेश्वर – मलबार हिल परिसरातील जागेच्या – घरांच्या किमती सर्वाधिक असाव्यात.

महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, अनेक मंत्री, मुख्य न्यायमूर्ती यांसह अनेक बड्या उद्योगपतींचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बंगले व निवासस्थाने असलेले मलबार हिल कोणे एकेकाळी ‘कंगाल’ लोकांसाठी ‘सोडिलेले’ होते यावर सहसा विश्वास बसणार नाही.

येथील जागेच्या – घरांच्या – आजच्या भाषेत रिअल इस्टेटच्या किमती – केव्हापासून वाढल्या, हे पहायचे झाल्यास मागे जावे लागते.

वाळकेश्वर – मलबार हिल परिसर पूर्वी लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय विरळ होता.

वाळकेश्वर येथील बाणगंगेला लोक दूरदुरून येत. परंतु तो भाग सोडला तर आसपासचा परिसर जंगल होते. अठराव्या शतकात राजभवन परिसरात ‘हंटिंग लॉज’ होते व ब्रिटिश लोक त्यांच्या शिकारीच्या ‘बॉबरी हंट’ खेळाची सुरुवात मलबार पॉईंट येथून करीत असा उल्लेख आढळतो. त्याअर्थी या परिसरात लोक शिकारीसाठी येत असत, हे सिद्ध होते.

माऊन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन गव्हर्नर असताना (१८१९-१८२७) त्यांनी मलबार हिल येथे आज राजभवन उभे आहे त्या ठिकाणी छोटी बंगली बांधली होती. तिला ‘प्रिटी कॉटेज’ किंवा समुद्र किनारी असल्याने ‘मरीन व्हिला’ म्हणत !

परळ येथून गव्हर्नर एल्फिन्स्टन मलबार हिल येथे अधून मधून हवपालटासाठी येत. त्यांच्या कार्यकाळात १८२६ साली मुंबईची लोकसंख्या दोन ते अडीच लाख होती ; तर वाळकेश्वरची लोकसंख्या २६०० होती !

वाळकेश्वरच्या लोकसंख्येत त्यावेळी ५९ इंग्रज, ४४ पोर्तुगीज, ११९ पारशी व अंदाजे २१८० हिंदू होते असे ‘राजभवन्स इन महाराष्ट्र’ पुस्तकात नमूद केले आहे.

आज दोनशे वर्षांनी, मलबार हिल मतदार संघातील मतदार संख्या तेंव्हाच्या मुंबईच्या लोकसंख्येइतकी झाली आहे !!

एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीला वाळकेश्वरच्या टोकापर्यंत पोहोचायला सरळ रस्ता नव्हता.

लेखिका मारिया ग्रॅहम यांनी मलबार पॉईंटला सन १८०९ साली भेट दिली, त्यावेळी राजभवन उभे आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अगोदर सिरी रोडने (शिडी रोड) हँगिंग गार्डन आहे, तिथे पोहोचावे लागे. त्यानंतर डोंगरकडेने (आजचा रिज रोडने) चालत राजभवनाच्या दिशेने यावे लागायचे, असे त्यांनी ‘Journal of a Residence in India’ मध्ये नमूद केले आहे.

सन १८२८ साली गिरगाव चौपाटी ते वाळकेश्वर असा ‘कोस्टल रोड’ बांधला व वाळकेश्वर शहराच्या इतर भागांशी जोडले गेले.

सन १८१७ साली पुणे ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणात आले व त्यानंतर १८५० पर्यंत मुंबई राज्याचा (प्रेसिडेन्सी) विस्तार सिंध – एडन पर्यंत वाढला व शहर व्यापाराचे मोठे केंद्र म्हणून उदयास आले.

वाळकेश्वर – मलबार हिल परिसर कनेक्टिव्हिटी सुधारल्यावर कसा वाढला याचे वर्णन गोविंद माडगांवकर यांनी सन १८६३ साली प्रकाशित केलेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात केले आहे, ते असे:

“तीस वर्षांमागे एका गृहस्थाचा वालुकेश्वरी डोंगराचा तुकडा होता, तो चार पाचशे रुपये घेऊन कोणास तरी विकून टाकावा म्हणून तो गिऱ्हाईक शोधी, परंतु त्या किमतीस तेवढा तुकडा घेणारा त्याला कोणी सांपडला नाही.

परंतु, तीच जागा आज तीस हजार रुपयांस मागितली असतां मिळत नाही.

ज्या ठिकाणी पूर्वी नुसते गवत वाढत असे, तेथे आतां शेंकडो लाखो रुपये खर्चून हवाशीर बंगले व बाग उठविले आहेत. सर्व मुंबई बेटांतील हवेपेक्षा एथील हवा मोठी आरोग्यदायक आहे. बहुतेक इंग्रज लोक एथे राहतात.

प्रस्तुत वालुकेश्वराच्या डोंगरावर रिकामी जागा कोठें आढळत नाही. जे स्थळ पूर्वी कंगाल लोकांसाठी सोडिले होते, ते आता फक्त श्रीमंत लोकांस राहावयास योग्य असें झालें आहे.”

माडगांवकर यांनी केलेल्या मुंबईच्या वर्णनानंतर पंचवीस वर्षांनी सन १८८५ साली ‘गव्हर्मेंट हाऊस’ परळ येथून मलबार हिल येथे आले. याच सुमारास अनेक संस्थानिकांनी वाळकेश्वर – मलबार हिल परिसरात जागा घेऊन टुमदार बंगले बांधले. साधारण १९६० नंतर बगीचे असणारे बंगले जाऊन त्याठिकाणी ‘हायराइज’ बांधण्यास सुरुवात झाली. जागेअभावी हेरिटेजचा बळी गेला. परंतु, या परिसरात राहणे प्रतिष्ठेचे झाले आणि वाळकेश्वर – मलबार हिलचा परिसर मुंबईतील ‘एलिट’ किंवा साध्या भाषेत श्रीमंती – महागडा परिसर झाला.

Views: 57
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राजभवनातली दिवाळी : सोहळा आपुलकीचा आणि स्नेहाचा उमेश काशीकर यांचे मनोगत !!

राजभवनातली दिवाळी : सोहळा आपुलकीचा आणि स्नेहाचा उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)