• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

राजभवनातली दिवाळी : सोहळा आपुलकीचा आणि स्नेहाचा उमेश काशीकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
October 19, 2025
in Uncategorized
0
राजभवनातली दिवाळी : सोहळा आपुलकीचा आणि स्नेहाचा उमेश काशीकर यांचे मनोगत !!

*राजभवनातली दिवाळी : सोहळा आपुलकीचा आणि स्नेहाचा* उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

राज्याचे वैभव असलेले राजभवन ही संसदीय लोकशाहीतील प्रमुख संस्था आहे. ‌राज्यपाल राज्याचे घटनाप्रमुख असतात. परंतु राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता राज्यपाल हे कुटुंबप्रमुख देखील असतात. राजभवनात अनेक वर्षांपासून दिवाळीनिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले जाते. राज्यपालांच्या पत्नी देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आणि प्रत्येक कर्मचाऱ्याशी संवाद साधतात, त्यांची विचारपूस करतात. यावेळी कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते मिठाई वाटप केले जाते.

यंदा महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार असलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत प्रवासात असल्यामुळे त्यांच्या वतीने राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना मिठाईवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता राज्यपाल आणि राजभवनातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्यातील स्नेहबंधाचा सोहळा असतो. राजभवनातील कर्मचाऱ्याला, कामगाराला, पोलीस जवानांना व अधिकाऱ्यांना हा कार्यक्रम म्हणजे राज्यपालांना प्रत्यक्ष भेटण्याची व शुभेच्छा देण्याची एक संधी असते. त्यामुळे सर्व लोक या संधीची वाट पाहत असतात. अर्थात या कार्यक्रमासाठी पूर्वनियोजन केले जाते. राजभवनातील सर्व विभागांमधील कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाचे कर्मचारी, माळी खाते, खानपान विभाग, पोलीस दलातील कर्मचारी, कंत्राटी कामगार व श्रमिक – सेवक वर्ग या सर्वांना या कार्यक्रमाला आवर्जून बोलावले जाते. कार्यक्रमाच्या सकाळपासूनच कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते.

काही कर्मचारी पोशाखात तर काही सणावाराचे कपडे घालून कार्यक्रमाला उपस्थित राहतात. पूर्वी मिठाई सोबत फटाके देण्याची देखील पद्धत होती. परंतु, पर्यावरण जागरुकता निर्माण झाल्यामुळे आता मात्र केवळ मिठाई वाटप केले जाते. कार्यक्रमाच्या दिवशी बरेचदा मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात व दिवे लावून परिसर सजवला जातो. राज्यपाल शंकरनारायणन व त्यांच्या पत्नी राधा तसेच राज्यपाल विद्यासागर राव व त्यांच्या पत्नी विनोदा या कार्यक्रमाशिवाय कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना निवासस्थानी बोलावून दिवाळी साजरी करीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका दिवाळीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.

राजभवनातील प्रत्येक कर्मचारी, छोटा असो वा मोठा, या दिवशी आपण एकाच परिवाराचा भाग असल्याचा अनुभव घेतो. हा सोहळा सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात आपुलकी व स्नेहाचा भाव जागवतो. या दिवशी घेतलेली छायाचित्रे कर्मचाऱ्यांच्या घरी अनेक वर्षानंतर देखील भिंतीवर विराजमान झालेली दिसतात. ती आठवण असते त्या राज्यपालांसोबत सोबत घालवलेल्या अनमोल क्षणांची !

Views: 92
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सणासुदीमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताय, सतर्क राहा-अॅड चैतन्य भंडारी*

सणासुदीमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताय, सतर्क राहा-अॅड चैतन्य भंडारी*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)