• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

एकोणसत्तर वर्षांपूर्वीची कथा,,,,,शपथ घेण्यापूर्वीच ‘या’ राज्यपालांची बदनामी; संपादकांची दिलगिरी…….उमेश काशीकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
October 23, 2025
in Uncategorized
0
एकोणसत्तर वर्षांपूर्वीची कथा,,,,,शपथ घेण्यापूर्वीच ‘या’ राज्यपालांची बदनामी; संपादकांची दिलगिरी…….उमेश काशीकर यांचे मनोगत !!

एकोणसत्तर वर्षांपूर्वीची कथा

शपथ घेण्यापूर्वीच ‘या’ राज्यपालांची बदनामी; संपादकांची दिलगिरी

उमेश काशीकर यांचे मनोगत !!

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या श्रीप्रकाश यांची नियुक्ती सन १९५६ साली मुंबई राज्याचे राज्यपाल म्हणून झाली होती.

श्रीप्रकाश राज्यपाल पदावर असतानांच दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यामुळे तेच महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल झाले.

कोण होते श्रीप्रकाश :

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीप्रकाश हे भारताचे पाकिस्तानमधील पहिले उच्चायुक्त होते. त्यानंतर ते आसामचे राज्यपाल झाले. पुढे सन १९५२ ते १९५६ या काळात ते मद्रास राज्याचे राज्यपाल होते.

सर्व सुरळीत असताना मुंबई राज्याचे राज्यपाल असलेले डॉ हरेकृष्ण महताब यांची ऑक्टोबर १९५६ मध्ये ओडिशाच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली. (महताब हे पूर्वीही ओडिशाचे मुख्यमंत्री होते) त्यामुळे त्यांनी दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी मुंबई राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर दिनांक २५ ऑक्टोबर १९५६ रोजी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी श्रीप्रकाश यांची मुंबईचे राज्यपाल पदावर नियुक्ती केली व तशी अधिसूचना काढली.

परंतु त्या कालावधीत मद्रासचे राज्यपाल असलेल्या श्रीप्रकाश यांच्या तरुण मुलाचे अकाली निधन झाले. त्यामुळे श्रीप्रकाश पदभार स्वीकारेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एम सी छगला यांची मुंबईच्या राज्यपाल पदावर हंगामी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

परंतु, श्रीप्रकाश मुंबईला येण्यापूर्वीच ‘ब्लिट्झ’ या मुंबईतील इंग्रजी साप्ताहिकाने दिनांक १० नोव्हेंबर १९५६ रोजी ‘मुंबईचे पदनिर्देशित राज्यपाल पुन्हा विवाह करणार’ अशी सनसनीखेज बातमी दिली.

श्रीप्रकाश यांना बातमी समजली तेंव्हा ते आपल्या गृहगावी वाराणशी येथे होते. त्यांनी तातडीने तेथून मुंबईचे हंगामी राज्यपाल न्या. छगला यांना तार पाठवून सदर वृत्तपत्रातील बातमीचे ताबडतोब खंडन करावे व खुलासा करावा असे कळवले. या प्रकरणात कायदेशीर कारवाई करता येईल का याची देखील चाचपणी करावी असे देखील श्रीप्रकाश यांनी न्या. छगला यांना कळवले.

न्या. छगला यांनी लागलीच ब्लिट्झचे संपादक रुसी करंजिया यांना समक्ष येऊन भेटण्यास सांगितले व असे वृत्त कुठलीही शहानिशा न करता दिल्याबद्दल त्यांना जाब विचारला.

दिनांक १४ नोव्हेंबर १९५६ रोजी श्री प्रकाश यांना पाठविलेल्या पत्रात न्या. छगला लिहितात:

“I immediately called Mr Karanjia, Editor of the Blitz and took him severely to task. He gave me his explanation which I asked him to put on paper.”

करंजिया यांनी आपल्याला या वृत्ताची कल्पना नव्हती व आपण प्रवासात असताना आपल्या उपसंपादकांनी आपल्याला पुरेसे विश्वासात न घेता सदर बातमी छापली व श्रीप्रकाश यांना झालेल्या मनस्तापाबद्दल खेद व्यक्त केला. याप्रकरणी आपण वृत्तपत्राच्या पुढच्याच अंकात दिलगिरी प्रसिद्ध करू अशी ग्वाही दिली, असे न्या. छगला यांनी श्रीप्रकाश यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले.

या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी किंवा कसे याबद्दल न्या. छगला यांनी या पत्रात फार विचारपूर्वक लिहिले आहे:

“With regard to the question of legal action, I think it would be extremely inadvisable for a man in your position to go to Court. There is so much dust thrown at public men these days that the best thing is to ignore it. I think every right minded person will be satisfied with the contradiction which the Blitz has promised to publish.”

न्या. छगला यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज्यपाल श्रीप्रकाश यांनी आपली वेदना व्यक्त केली आहे:

“…(The news) It came as a very cruel blow – a vertical stab in the back – when I am overwhelmed with grief owing to the loss of my dear son – a bright young man of 32 full of life and hope.”

श्रीप्रकाश यांची पुढचे वाक्य त्यांच्या मनाची स्थिती दर्शवणारे आहे:

“I cannot understand how a strange fatality is pursuing me at the moment which gives me high office on the one hand, and deprives me of all that a man can hold dear – son and reputation – on the other.”

न्या. छगला यांनी संपादकांना श्रीप्रकाश यांची क्षमा मागावी असे सांगितले होते. त्यानुसार संपादक करंजिया यांनी श्रीप्रकाश यांची क्षमा मागितली व हे प्रकरण संपले.

दिनांक १० डिसेंबर १९५६ रोजी श्रीप्रकाश यांनी राजभवनातील दरबार हॉल येथे (त्यावेळी हॉलचे नाव ‘जल नायक’ होते) द्विभाषिक मुंबई राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.

Views: 153
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शुभेच्छा देणारे ग्रीटिंग पत्र हरपले सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा

शुभेच्छा देणारे ग्रीटिंग पत्र हरपले सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)