शुभेच्छा देणारे ग्रीटिंग पत्र हरपले सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा
त-हाडी -: प्रतिनिधी दहा वर्षाआधी दिवाळीच्या दिवसात पत्र व ग्रीटिंग कार्डद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात असे आता मात्र डिजिटल युगात दिवाळीच्या शुभेच्छासाठी सोशल मीडियाच्या व्हाट्सअप ,फेसबुक ,इंस्टाग्राम ट्विटर ,ई-मेल,टाईम लाईन ,स्टेटस या या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळी शुभेच्छांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे
तर स्टिकर वर दिवाळीचे फराळ मिठाई हे कागदी पोस्टर पाठविले जात आहे यासाठी पोस्ट कार्यालय अधिकारी ग्रीटिंग कार्ड विकणारी व्यापारी आणि तरुणांशी या विषयावर चर्चा केली असता आता ग्रीटिंग कार्ड पत्र पाठवण्याची वेळ गेली आहे ते लिहा पोस्ट करा आणि दोन ते तीन दिवसानंतर संबंधितांना भेटेल त्यापेक्षा सोशल मीडियाद्वारे पाठवा आणि ताबडतोब प्रतिसाद मिळवा अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या ग्रीटिंग कार्ड व्यावसायिक मात्र आजही काही विरोधक दोन-तीन टक्के युवक युवत्या ग्रीटिंग कार्ड घेऊन जात असल्याचे दिसतात पोस्टातील शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड पत्रांची संख्या कमी झाली आहे
परंतु पूर्णपणे अद्याप बंद झाले नसून आजही अनेक जण याचा वापर करीत असल्याचे सांगण्यात आले आहेचौकट :-हजारो पत्र यायचे आता संख्या नगण्यसोशल मीडिया पूर्वी पोस्टातून हजारो ग्रीटिंग कार्ड पत्र दिवाळी काळात यायचे आता याचे प्रमाण नगण्य झाले आहे ग्रीटिंग व पत्र पाठविणाऱ्या मध्ये युवकांचे प्रमाण नगण्य आहे युवा पिढी सोशल मीडियावर विविध याद्वारे स्वतः फोटो वगैरे वापरून आपल्या सोयीनुसार ग्रीटिंग तयार करून मित्रांना पाठवीत आहेत चौकट ग्रीटिंग कार्ड ची दुकाने दिसेनाशी झालीपूर्वी ज्याप्रमाणे शहरांमध्ये ग्रीटिंग कार्ड ची दुकाने थाटायची ती आता दिशेनाशी झाली आहेत आता शुभेच्छा कार्ड कुठे मिळतात याची विचारणा करण्याची वेळ आली आहे असे असले तरी आजही बर्थडे मॅरेज एनिवर्सरी ग्रीटिंगची मागणी आहे कार्यक्रमांमध्ये एक भेट वस्तू व ग्रीटिंग घेऊन जाण्याची परंपरा आजही जोपासली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई पाटील यांनी सांगितले


