जॉबकार्ड धारकांना ई केवायसी बंधनकारक;अन्यथा जॉब कार्ड होणार रद्द
रोहयोच्या मजुरांनी ई केवायसी करावी.गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांचे आवाहन
त-हाडी – प्रतिनीधी
राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधे पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने आता मनरेगाच्या सर्व मजुरांसाठी ई- केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून,या ई केवायसी प्रक्रियेमध्ये आधार क्रमांक टाकून मजुरांचे फेस स्कॅनिंग करण्यात येणार आहे.त्यामुळे यापुढे मनरेगा मार्फत होणाऱ्या प्रत्येक कामांमध्ये पारदर्शकता येणार आहे.जे मजूर ई केवायसी करणार नाहीत त्यांचे जॉब कार्ड बंद देखील होऊ शकते.असेही सुचित होत आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी कायद्याची सुरुवात ही २००५ मध्ये झाली आहे.त्यातून गावातील मजुरांना सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना ज्यामध्ये सिंचन विहीर,पांणद रस्ते,जनावरांचे गोठे,घरकुल, आदी शेकडो प्रकारच्या कामांमधे जॉब कार्ड धारक मजूर काम करून आपला उदर निर्वाह चालवत आहेत.गावातील मजुरांना जॉब कार्ड काढून देण्याची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायत,रोजगार सेवकांची असून त्यांचे मजुरी देयके देखील संकेत स्थळावर अपलोड करण्याची जबाबदारी देखील रोजगार सेवकांची आहे.मात्र या योजनेला ग्रामीण भागात “रोजगार हमी,अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही” या नजरेतून पाहिल्या जात होते.शासनाने या योजनेमध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी म्हणून ई केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता प्रत्येक मजुराचे ई-केवायसी झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शासकीय कामावर तो मजूर कामावर उपस्थित असल्याबाबत मजुराचे चेहरा प्रमाणीकरण करता येणार असून तो कामावर उपस्थित असल्याचा फोटो पोर्टलवर नोंदवला जाणार आहे.त्यामुळे कामकाज अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे.
(—— प्रतिक्रिया ——-
शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व रोजगार हमी मजुरांचे ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या संदर्भात शिरपूर तालुक्यांतील सर्व ग्रामसेवक,ग्राम रोजगार सेवक यांची संयुक्तिक आढावा सभा घेत सर्व ग्रामपंचायतींना ई केवायसी प्रक्रिया प्राधान्याने करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.अधिक जलद काम होण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचारी देखील या कामासंदर्भात लक्ष देऊन आहेत.लवकरच तालुक्यातील मजुरांची
ई केवायसी प्रक्रिया पूर्णत्वास येईल.
फोटो सह -प्रदीप पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर)
(—– प्रतिक्रिया
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व मजुरांचे ई केवायसी करण्याचा सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत.त्यानुसार मजुरांचे ई केवायसी ग्राम रोजगार सेवक हे प्रत्येक मजुराच्या घरी जाऊन करत आहेत.शंभर टक्के काम पूर्ण करण्याचा मानस आहे.
फोटो सह -देविदास धाडे ग्रामसेवक त-हाडी.)


