• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पूर्व व पश्चिम नगर परिषद हद्दी मध्ये अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना उभारलेले ढाबे, पानटपरी, स्टॉल, जुगार अड्डे, क्रिकेट फुटबॉल शेड टर्फ व इतर बांधकामे तोडून बांधकाम धारकांवर गुन्हे नोंद करून कार्यवाही करणे बाबत.

माणगंगा by माणगंगा
November 1, 2025
in Uncategorized
0
पूर्व व पश्चिम नगर परिषद हद्दी मध्ये अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना उभारलेले ढाबे, पानटपरी, स्टॉल, जुगार अड्डे, क्रिकेट फुटबॉल शेड टर्फ व इतर बांधकामे तोडून बांधकाम धारकांवर गुन्हे नोंद करून कार्यवाही करणे बाबत.

पूर्व व पश्चिम नगर परिषद हद्दी मध्ये अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना उभारलेले ढाबे, पानटपरी, स्टॉल, जुगार अड्डे, क्रिकेट फुटबॉल शेड टर्फ व इतर बांधकामे तोडून बांधकाम धारकांवर गुन्हे नोंद करून कार्यवाही करणे बाबत.

समाजसेवक/तक्रारदार केवल विकमाणी, डोंबिवली पूर्व, मोबाईल:- ७९०१५७५००० यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

मी आपणास लेखी तक्रार देतो की अंबरनाथ पूर्व व पश्चिम नगर परिषद हद्दी मध्ये पालेगाव, बारकुपाडा, शिवमंदिर परिसर, चिखलोली पाडा, टी जंक्शन, डिमार्ट जवळ, NMRL नेवल कंपनी जवळ, लोकनगरी परिसर असे अनेक ठिकाणी अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना उभारलेले ढाबे, पानटपरी, स्टॉल, जुगार अड्डे, क्रिकेट फुटबॉल शेड टर्फ हे सर्व अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना बांधकाम आहेत आणि कुठलीच शासनाची परवानगी न घेता ही बांधकामे केली आहेत. त्यात अंबरनाथ नगरपरिषद चे अधिकारी कर्मचारी यांनी सर्वांकडून हफ्तेवासुली करून सदरची बांधकामांना अभय दिले आहे. म्हणूनच आज रोजी पर्यंत त्या बांधकामांवर कुठली कार्यवाही झाली नाही. वारंवार आम्ही विविध संस्थेचे लोकांनी आवाज उठवून सुद्धा पैसे घेऊन भ्रष्टाचार करत कार्यवाही मात्र होत नाही असे दिसून येत आहे.

सदरच्या अनधिकृत बेकायदेशीर मध्ये ढाबे आणि क्रिकेट फुटबॉल टर्फ हे आहेत ज्यात रात्री उशिरा अंदाजे ३-५ वाजे पर्यंत सुरू असतात, ढाबे मध्ये जेवण सोबत दारू हुक्का चरस गांजा व इतर अमलीपदार्थ विक्री केले जातात ज्यातून तरुण मुले आणि मुली म्हणजेच तरुण पिढी हे व्यसनाधीन होत आहे. क्रिकेट फुटबॉल टर्फ शेड मध्ये पण रात्री क्रिकेट फुटबॉल खेळताना मुल आणि मुलगी हे दारू बियर सिगरेट गांजा चरस असे नशेखोरी पदार्थ सेवन करतात, हे सर्व त्या क्रिकेट फुटबॉल टर्फ मध्ये उपलब्ध असतात आणि तिकडून विकत मिळतात. यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ढाबे किंवा क्रिकेट फुटबॉल बॉक्स शेड टर्फ असो हे १३०×७० फुटाचे बांधकाम आहे आणि ३० फूट इतकी याला उंची आहे शिवाय आतमध्ये एकही सपोर्ट नसून तरीही प्रशासनाने परवानगी दिली कशी, स्ट्रक्चरल ऑडिट आहे का ?? जर उद्या उठून जोरात पाऊस पडला किंवा तुफानी वारा आला त्यात ते शेड कोसळले आणि त्या वेळेस ढाब्यावर ४०-५० लोकं किंवा टर्फ मध्ये १५-२० लहान मुल मुलगी खेळ खेळत असतील आणि अशी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार ???? 

ठाणे जिल्हाधिकारी की अंबरनाथ नगरपरिषद कोण जवाबदारी घेणार ????

नंतर दुर्घटना मध्ये गंभीर जखमी किंवा मृत्यू झालेल्या लोकांना तुम्ही २ किंवा ५ लाख रुपये देणार या पेक्षा आधीच आपण दक्षता घेऊन सर्वच अनधिकृत बांधकामे तोडून साफ सफाई अभियान राबवून घ्यावा….

आज मी या पत्राद्वारे आपणास विनंती आणि सूचना करू इच्छितो की जर १५ दिवसांत आपण या अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना शेड धारकांवर कार्यवाही केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागण्यास जाणार आणि संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी वर निलंबन ची कायदेशीर कार्यवाही करणार…., पुढील १५ दिवसांत जर कार्यवाही झाली नाही तर आम्ही सर्व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते एकत्र मिळून ३००- ५०० लोक शांतपणे कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन उपोषण (तारीख नक्की नाही) करत संविधानाने दिलेल्या मार्ग निवडून अंबरनाथ नगरपरिषद या भोंगळ भ्रष्ट लुटारू कारोबार बद्दल आवाज उठवणार आणि पर्दाफाश करून सर्व जनते समोर आणणार….

या पुढे आंदोलन उपोषण दरम्यान जर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार हे ठाणे जिल्हाधिकारी व अंबरनाथ नगरपरिषद हे राहतील याची नोंद घ्यावी. – केवल विकमानी..

आपणास लेखी तक्रार देतो की ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्र हे ठाणे पासून बदलापूर पर्यंत असून यात ठाणे कळवा मुंब्रा दिवा कोपर डोंबिवली ठाकुर्ली कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर वांगणी इतके शहर विस्तार हद्दीत येतात. या सर्वच ठिकाणी मोठी लोकवस्ती असून ठाणे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे १२ वाजलेले दिसतात. रेप मर्डर हाफ फुल मर्डर आणि चोरी दरोडे हे गुन्हे रोज घडतात तरीही पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसून कायद्याची भीती गुंड लोकांमध्ये दिसत नाही…

सदरच्या सर्व शहरांत एक नवीन अनधिकृत बेकायदेशीर व्यवसायाचा प्रकार आहे तो म्हणजे रात्री उशीरा बेकायदेशीरपणे आरडा ओरडा धिंगाणा करून ३-५ वाजे चालणारे क्रिकेट फुटबॉल बॉक्स टर्फ. स्थानीक पोलीस स्टेशन ला आणि बीट मार्शल ला हाताशी धरून हे बिंदास रात्री उशीरा पर्यंत धंदा करतात. शिवाय या टर्फ मध्ये रात्री पोर येऊन खेळताना गांजा चरस दारू बियर हुक्का असे अमलीपदार्थ सेवन करतात ……

पुढील यादी प्रमाणे प्रत्येक शहरात किती टर्फ आहेत ते बघा :-

ठाणे येथे २७-३२ अंदाजे
कळवा येथे ४- ६ अंदाजे
मुंब्रा येथे ६- ९ अंदाजे
दिवा येथे ५- ७ अंदाजे
डोंबिवली येथे ३०- ३५ अंदाजे
कल्याण येथे ३०- ३५ अंदाजे
उल्हासनगर ३७- ४० अंदाजे
अंबरनाथ २०- २२ अंदाजे
बदलापूर १२- १५ अंदाजे

अशी ही बेकायदेशीर अनधिकृत टर्फ ची यादी असून पोलिसांना दर महिन्याला प्रत्येक टर्फ मधून २००००-४०००० इतका हफ्ता मिळतो आणि म्हणूनच यांच्यावर कार्यवाही होत नाही. रात्री ३- ५ वाजेपर्यंत आरडा ओरडा आणि धिंगाणा तर करतातच पण सोबत दारू, बियर, चरस, गांजा, गुटखा असे अनेक नशेखोरी पदार्थ सेवन करतात आणि त्यामुळे तरुण पिढी वाया जात आहे. जर पोलिसांनी काही पैसे हफ्तेखोरी भ्रष्टाचार साठी असे धंदे सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिले तर येणारी तरुण पिढी वाया जाणार आणि पुढे देशाचा भविष्य खराब होणार.

सदरच्या अर्ज तक्रार च्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे की या सर्व टर्फ चे परवानगी तपासून त्यांना किती वाजे पर्यंत टर्फ सुरू ठेवण्याची परवानगी आहे हे आदेश द्यावे तसेच स्थानिक पोलीस स्टेशन ला त्यांना त्यांच्या हद्दीतील टर्फ नियमित पणे वेळेवर बंद करण्याचे आदेश द्यावे आणि जर कोणीही कायदा मोडला तर त्याला कायद्यानुसार नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी हीच विनंती आहे…

जर योग्य कार्यवाही झाली नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कार्यवाही करणार आणि ठाणे पोलीस आयुक्तांवर तरुण पिढी बरबाद केल्याचा आणि भ्रष्टाचार लाचखोरीचा गुन्हा नोंद करणार….!!!!!

कार्यवाही व तपास ची संपूर्ण प्रति मला पाठवून माहिती द्यावी…..

Views: 190
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

वडाळी जिल्हा परिषद गटात उद्योगपती रविशेठ राजपुतांची एंट्री; जनतेच्या आग्रहावरून उमेदवारी जाहीर…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)