• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वडाळी जिल्हा परिषद गटात उद्योगपती रविशेठ राजपुतांची एंट्री; जनतेच्या आग्रहावरून उमेदवारी जाहीर…

माणगंगा by माणगंगा
November 2, 2025
in Uncategorized
0

वडाळी जिल्हा परिषद गटात उद्योगपती रविशेठ राजपुतांची एंट्री; जनतेच्या आग्रहावरून उमेदवारी जाहीर…

वडाळी : प्रतिष्ठित उद्योगपती आणि समाजसेवक म्हणून ओळख असलेले देऊरचे भूमिपुत्र श्री रविशेठ राजपुत यांनी अखेर वडाळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या चिन्हाच्या बळावर नव्हे, तर जनतेच्या शक्तीच्या बळावर अपक्ष उमेदवार म्हणून आपला विजय मिळवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नागरिक, व्यावसायिक वर्ग आणि युवक संघटनांतून रविशेठ यांनी निवडणूक लढवावी, असा प्रचंड आग्रह व्यक्त होत होता. अखेर जनतेच्या इच्छेचा मान राखत त्यांनी मैदानात उतरायचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर वडाळी गटातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे.

रविशेठ यांच्या प्रचार मोहिमेची रणनीती आणि मोर्चेबांधणी अत्यंत प्रभावीपणे रचली गेली आहे. स्थानिक गटातील आजी माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित राजकीय मंडळी व सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या समर्थनाची सांगाड घातली आहे. तसेच कार्यकर्त्याचा भला मोठा ताफा घेऊन रविशेठ संपूर्ण गटात जनसंवाद यात्रा देखील करत आहेत. जनसंवाद यात्रेने जन मानसात त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघाली आहे. रविशेठ यांची व्युहरचना एवढ्यावरच थांबली नाहीतर, शिरपूर तालुक्यातील राजपुत समाजाचे युवा नेतृत्व आणि सावळदे गावाचे गटनेते तसेच उपसरपंच अनुभवी रणनीतिकार सचिनभाऊ राजपुत यांना संघटनात्मक जबाबदारी दिली आहे व तीं त्यांनी ठाम भूमिकेने स्वीकारली देखील आहे. तसेच वडाळी गटाला लावून असलेल्या तऱ्हाडी गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जिभाऊसो भीमराव ईशी आणि ग्रामीण राजकारणातील “प्रशांत किशोर” म्हणून परिचित असलेले दादासाहेब भुषण बागुल या तिहेरी नेतृत्वाखाली प्रचारयंत्रणेचे नियोजन जोरात सुरू आहे.

गटातील प्रत्येक गावात नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी व मतदारांशी थेट संवाद, बैठका, आणि समन्वय साधणे या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र प्रचार आराखडा तयार करण्यात आला आहे.

रविशेठ राजपुत हे केवळ उद्योगपती नसून सामाजिक जबाबदारीची जाण असलेले नेते म्हणून ओळखले जातात. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. विशेषतः युवकांना उद्योग आणि स्वावलंबनाच्या दिशेने प्रोत्साहन देणारे म्हणून त्यांच्या नावाची ओळख देखील निर्माण झाली आहे.

रविशेठ यांचा विश्वास आहे की, “प्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो, सत्तेचा नव्हे.” म्हणूनच त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारा विकास. गावोगाव रस्ते, शिक्षण, जलसंधारण आणि महिलांसाठी स्वयंरोजगार योजना हे त्यांच्या अजेंड्यावर प्राधान्याने आहेत.

गेल्या काही दिवसांत वडाळी गटातील परिसरात रविशेठ यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. युवा कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारात सहभागी झाले आहेत. गावांमध्ये त्यांच्या समर्थनार्थ बॅनर, पोस्टर, बैठका आणि भव्य सभांचे आयोजन केले जात आहे.

सर्व समाजातील नेतृत्वाची एकजूट आणि गावोगाव सक्रिय कार्यकर्त्यांचा उर्जावान सहभाग पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे. लोकांमध्ये “रविशेठ म्हणजे कामाचा माणूस” अशी भावना तयार झाली आहे.

रविशेठ यांनी आपल्या प्रचारामध्ये कोणतीही दिखाऊ घोषणाबाजी न करता ठोस आणि वास्तववादी दृष्टिकोन मांडण्यावर भर दिला आहे. त्यांचे साधे, स्पष्ट आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व हेच त्यांच्या लोकप्रियतेचे मूळ आहे. स्थानिक तरुणांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत असून ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

आगामी काही दिवसांत त्यांच्या प्रचाराची गती आणखी वाढणार असून वडाळी गटात रंगतदार राजकीय लढत रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रतिक्रिया : १)
“रविशेठ राजपुत हे जनतेशी जोडलेले, विचार आणि कृती दोन्हीने प्रामाणिक नेतृत्व आहे. त्यांची उमेदवारी म्हणजे वडाळी गटाच्या विकासासाठी नवी दिशा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. ही लढत केवळ निवडणुकीची नसून विकासाच्या संकल्पनेची आहे.”
श्री भुषण बागुल

प्रतिक्रिया : २)
रविशेठ राजपुत यांच्या उमेदवारीत वडाळी गटाच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा प्रतिबिंबित होते. विचारांमध्ये स्पष्टता आणि कृतीत पारदर्शकता या त्यांच्या नेतृत्वाच्या वैशिष्ट्यांमुळे जनतेत त्यांच्याबद्दल दृढ विश्वास निर्माण झाला आहे. ही निवडणूक एक राजकीय लढत नसून विकासदृष्टिकोनावर आधारित लोकाभिमुख चळवळ आहे.
श्री सचिनभाऊ राजपुत

Views: 56
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
निवडणुकीची वारी, सरसावले कारभारी….!इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठीवर जोर, कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम

निवडणुकीची वारी, सरसावले कारभारी….!इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठीवर जोर, कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)