• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“आंबेडकरी चळवळ- दिशा व गतीरोध ”आयु.विलास,खरात

माणगंगा by माणगंगा
November 2, 2025
in Uncategorized
0
“आंबेडकरी चळवळ- दिशा व गतीरोध ”आयु.विलास,खरात

परमपूज्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक चळवळीत “माणूस” हा मुख्य केंद्रबिंदू मानून त्यांच्या उद्धारासाठी व समतेसाठी सामाजिक कार्य सुरु केलेले होते. डॉ. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्यच अत्यंत वेगवान व क्रांतिकारक घटनेने भरलेले होते. त्यामुळे त्यांचे जीवनमान हे अत्यंत प्रभावी, तेजोमय व दीपस्तंभासारखे आहे. सदरच्याकाळी अस्पृश्यता ही मनुष्य मात्राला लागलेली कीड व कलंक होती. माणसासारखी माणसे असून सुध्दा त्यांना कुत्र्या-मांजरापेक्षा हलके समजले जात होते.

त्यामुळे अस्पृश्य वर्गाला गुलामगिरीच्या जोखंडातून बाहेर काढून माणूसकीचे हक्क व अधिकार मिळावेत यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे करोडो अस्पृश्य समुहासाठी अहोरात्र कष्ट घेत होते. त्यामुळे त्यांनी सन १९५६ साली ऑक्टोबर महिन्यात “अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची” स्थापना करण्याचा का निर्णय घेतला? याबाबत विचार होणे अत्यंत महत्वाचे आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून उच्च शिक्षण व पदव्या घेऊन भारतात आले. मुंबई येथील सिडनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करू लागलेले होते. साधारण सन १९२० साली त्यांनी “मूकनायक” हे साप्ताहिक वर्तमान पत्र सुरु करून या देशातील अस्पृश्य वर्गाच्या दु:खाला व गुलामगिरीच्या कष्टदायक घटनाना वर्तमान पत्राच्या माध्यमातून प्रथमच लोकांसमोर मांडणेस सुरुवात केलेली होती. त्यामुळे “मूकनायक” मधील अग्रलेख हे अस्पृश्य समूहामध्ये जनजागृती व आत्मभान निर्माण करू लागलेले होते.

सदरच्या काळी कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली “माणगांव” या ठिकाणी दि.२१ मार्च १९२० साली अस्पृश्यांची मोठी परिषद भरविण्यात आलेली होती. या परिषदेचे अध्यक्ष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी अध्यक्षीय पदावरून बोलताना म्हणाले होते की, अस्पृश्यांच्या मुक्तीचा मार्ग, स्वाभिमानी जीवन व त्यांच्या उद्धारांची नवीन दिशा व धोरण हे मुद्देसूदपणे परिषदेत मार्गदर्शन केलेले होते. सदरच्या भाषणाने अस्पृश्य वर्गात नवसंजीवनी व चैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत आनंद झाला होता. माणगांवच्या परिषदेत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, अस्पृश्य वर्गाला त्यांचे दु:ख जाणणारा खरा नेता मिळालेला आहे त्यामुळे अस्पृश्य वर्गाचे भविष्य उज्वल आहे असे गौरवपूर्ण उदगार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काढलेले होते. याप्रमाणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यास सुरुवात झालेली होती.

या देशातील “अस्पृश्य” समजले गेलेल्या करोडो वर्ग समुहाची अस्पृश्यतेच्या गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्तता करून त्यांना “माणुसकीचे” हक्क व अधिकार मिळवून देणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणेसाठी अस्पृश्य समुहाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय प्रगतीच्या विकासाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य वर्ग समुहाची संघटना स्थापन करणेचा निर्णय घेतला. अस्पृश्याचे हक्क, अधिकार व समता हे उद्देश व धोरण ठरवून त्यांनी सन १९२४ साली मुंबई येथे “बहिष्कृत हितकारणी सभा” या सामाजिक संघटनेची आधिकृत स्थापना करून सदर संघटने मार्फत सामाजिक सुधारणा व समता प्रस्थापित करणेसाठी देशात प्रथमच सन १९२७ साली महाड चवदार तळ्याच्या पाण्यासाठी आपल्या हजारो अनुयाबरोबर महाड येथे सत्याग्रह सुरु केलेला होता आणि सन १९३० साली नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह केलेला होता. सदरच्या सत्याग्रहामुळे अस्पृश्य समाजात माणुसकीच्या हक्काची जागृती होऊ लागलेली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तमाम अस्पृश्य समूह एकत्र येऊन चळवळीच्या आंदोलनात सामील होऊ लागलेले होते. सन १९२५ साली संघटने मार्फत सोलापूर येथे अस्पृश्यांच्या मुलांसाठी “विद्यार्थी वसतिगृह” सुरु केलेले होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२७ साली देशात सामाजिक समता निर्माण होणेसाठी “समता समाज संघ” या नावाची संस्था स्थापन केलेली होती. सन १९२७ साली “बहिष्कृत भारत” हे साप्ताहिक सुरु केलेले होते. सन १९३१ चा मुखेडचा सत्याग्रह सुरु केलेला होता. महामानव डॉ. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून या देशातील तमाम अस्पृश्य दलित वर्गासाठी अहोरात्र कष्ट घेत होते. सन १९३० साली लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्य दलित वर्गाच्या न्याय हक्काचा “खलिता” (मेमोरॅडम) त्यांनी मांडलेला होता. हा खलिता दलिताच्या हक्कासाठीचा भारतीय इतिहासात अधोरखित झालेला आहे. अस्पृश्य समूहाच्या मुक्तीसाठी सातत्याने सत्याग्रह लढे, संघर्ष सुरु होता. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय या विचारांच्या तत्वावर देश उभा राहावा या तत्वाचे असलेमुळे ते लोकशाहीवादी होते. या देशात लोकशाहीची निकोप वाढ व्हावी. अस्पृश्य, आदिवाशी, भटके- विमुक्त, कामगार, शेतकरी इत्यादींचे शोषण होऊ नये म्हणून त्यांनी सन १९३६ साली “स्वतंत्र मजूर पक्षाची” स्थापना केली होती. सन १९३७ साली मुंबई कायदे मंडळाच्या निवडणुकीत त्यांनी १५ लोक प्रतिनिधी (आमदार) प्रचंड बहुमतांनी निवडून आणलेले होते.

सन १९४२ साली महामानव डॉ. बाबासाहेबांनी अखिल भारतीय दलित फेडरेशन (शेड्यूल काष्ट) या पक्षाची स्थापना केलेली होती. देशात वेगवेगळे अनेक बदल घडू लागलेले होते. देशातील दलित समाज्याच्या प्रगती व मुक्तीसाठी शेड्यूल काष्ट फेडरेशनच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय लढे, चळवळी, आंदोलने, मोर्चा उभी केलेली होती. दलितांच्या मुक्ती संग्रामात सामाजिक, राजकीय, आर्थिक हे प्रश्न वेगळे असू शकत नाहीत असे डॉ. बाबासाहेबांना वाटत असत. त्यामुळे त्यांना अखिल भारतीय स्थरावरचा सर्व समावेशक असा रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता दिसून येते. त्या दृष्टीने डॉ. बाबासाहेबांनी सर्वाशी विचार विनिमय करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करणेचा निर्णय घेतला व या देशातील तमाम दलित अस्पृश्य, आदिवाशी, भटके, विभुक्त, शोषित, गरीब, भूमिहीन, मजूर, कामगार, शेतकरी इत्यादींच्या मुलभूत प्रश्नावरती आवाज उठवून न्याय देणारा पक्ष असावा असे डॉ. बाबासाहेबांना वाटत होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे “शेड्यूल काष्ट फेडरेशन” हा पक्ष विसर्जित करून “अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष” स्थापन करणेची घोषणा केली व १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयासह बौध्द धम्माची दिक्षा घेतली होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन महिन्यातच म्हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले हे अत्यंत धक्कादायक व वेदनादायक असलेमुळे तमाम भारतीयांना हा फार मोठा धक्का बसलेला होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेबाच्या खुल्या पत्रावर आधारित असलेल्या त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष स्थापन करणेचे त्यांच्या अनुयायानी सर्वानुमते ठरविण्यात आले होते. त्यानंतर दादासाहेब गायकवाड, एन शिवराज, बँ. खोब्रागडे इत्यादी नेत्याच्या नेतृत्वाखाली सन १९५८ साली नागपूर येथे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना करणेत आली. सामाजिक, समता, आर्थिक या तीन प्रश्नावरती पक्षाने काम सुरु करणेत आलेले होते. परंतु काही दिवसानंतर रिपब्लिकन पक्षात गट पडले व पक्षाच्या फुटीचे ढग गडद होत गेले. डॉ. बाबासाहेबांची फौलादी संघटना म्हणून नांव लौकिक असलेला रिपब्लिकन पक्ष अनेक गटा तटात विभागला गेला होता. नंतर दलित पँथरचा उदय झाला. दलित पँथर ही संघटना शोषणाच्या विरुद्ध आक्रमण व लढाऊ होती. परंतु त्याही संघटनेत गट पडले होते.
आंबेडकरी संघटना एकत्र येवून अध्यक्षीय मंडळ स्थापन करून साधारण सन १९९९ साली रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार हे लोकसभेस निवडून आलेले होते.

त्यामध्ये मा.रा. सु.गवई, मा.प्रकाश आंबेडकर, मा. रामदास आठवले, मा. जोगेंद्र कवाडे हे निवडून आलेले होते. रिपब्लिकन पक्षाचा इतिहास हा फार मोठा आहे.

सध्या आंबेडकरी पक्षात व संघटनेत अनेक गट- तट आहेत ते पाहूया:- १)वंचित बहुजन आघाडी २) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ३) रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (गवई) ४) पीपल्स रिपब्लिक पार्टी (कवाडे) ५)रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) ६) स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष (संसारे) ७)डेमोक्रॅाटिक रिपब्लिक पार्टी ८) बहुजन समाज पार्टी ९) आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी १०) आझाद समाज पार्टी ११) आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया १२)डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी १३) बहुजन समाज परिवर्तन पार्टी १४) पँथररिपब्लिकन पार्टी १५) बहुजन महासंघ १६) प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी १७) बहुजन रिपब्लिकन एकता पार्टी १८) प्रबुद्ध भारत प्रजासत्ताक पार्टी १९) बहुजन रिपब्लिक सोशॅलिस्ट पार्टी २०)भारतीय बहुजन क्रांती दल २१)भारतीय रिपब्लिकन पक्ष २२) बहुजन विकास आघाडी २३) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिकॉमिस्ट) 24)रिपब्लिकन प्रेसिडम पार्टी ऑफ इंडिया २५) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल) २६) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोरीपा) २७) ब्लॅक पॅथर २८) बहुजन मुक्ती पार्टी २९)बहुजन वॉलिटियर फोर्स ३०)पी.पी.आई ३१)रिपब्लिकन बहुजन सेना ३२) रिपब्लिकन जनशक्ती पक्ष ३३) युथ रिपब्लिकन (भाईसंगारे) ३४) भारतीय दलित क्रोबा ३५) अ.भा. रेवोल्युशनरी शोषित समाज संघ ३६) रिपब्लिकन सेना ३७) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) ३८) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गायकवाड) ३९) नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी ४०) भीम टायगर युवा सेना ४१) संविधान वादी रिपब्लिकन पक्ष ४२) भीम आर्मी ४३) आंम्बेडक्राईट पार्टी ऑफ इंडिया (मानकर) ४४) भीमसेना ४५) भीम टायगर सेना ४६)बामसेफ (मेश्राम) ४७) बामसेफ (अनेकगट) ४८) मुलनिवासी संघटन इत्यादी अशा प्रकारच्या अनेक पक्ष व संघटना आहेत.

देशातील सामाजिक चळवळी ह्या परिवर्तनवादी विचारावर चालतात. डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेवर दलितांच्या संघटना कार्यरत असल्याचे सांगतात, तरीसुद्धा या पक्ष व संघटना एक होत नाहीत, हे वेदनादायक आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांनी मृत झालेल्या अस्पृश्य दलित समाजाला नवसंजीवनी देऊन जिवंत केले. एक चांगले घर दिले होते. दलित बौद्ध, आदिवासी, भटके विमुक्त, मागासलेले घटक, शेतकरी, कामगार, शोषित वंचित यांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी एकत्र येणे हे परमपूज्य डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा विजय ठरेल.
संदर्भ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे
राजकीय विचार डॉ. शंकरराव खरात

“आंबेडकरी चळवळ- दिशा व गतीरोध ”
आयु.विलास,खरात

परमपूज्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक चळवळीत “माणूस” हा मुख्य केंद्रबिंदू मानून त्यांच्या उद्धारासाठी व समतेसाठी सामाजिक कार्य सुरु केलेले होते. डॉ. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्यच अत्यंत वेगवान व क्रांतिकारक घटनेने भरलेले होते. त्यामुळे त्यांचे जीवनमान हे अत्यंत प्रभावी, तेजोमय व दीपस्तंभासारखे आहे. सदरच्याकाळी अस्पृश्यता ही मनुष्य मात्राला लागलेली कीड व कलंक होती. माणसासारखी माणसे असून सुध्दा त्यांना कुत्र्या-मांजरापेक्षा हलके समजले जात होते. त्यामुळे अस्पृश्य वर्गाला गुलामगिरीच्या जोखंडातून बाहेर काढून माणूसकीचे हक्क व अधिकार मिळावेत यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे करोडो अस्पृश्य समुहासाठी अहोरात्र कष्ट घेत होते. त्यामुळे त्यांनी सन १९५६ साली ऑक्टोबर महिन्यात “अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची” स्थापना करण्याचा का निर्णय घेतला? याबाबत विचार होणे अत्यंत महत्वाचे आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून उच्च शिक्षण व पदव्या घेऊन भारतात आले. मुंबई येथील सिडनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करू लागलेले होते. साधारण सन १९२० साली त्यांनी “मूकनायक” हे साप्ताहिक वर्तमान पत्र सुरु करून या देशातील अस्पृश्य वर्गाच्या दु:खाला व गुलामगिरीच्या कष्टदायक घटनाना वर्तमान पत्राच्या माध्यमातून प्रथमच लोकांसमोर मांडणेस सुरुवात केलेली होती. त्यामुळे “मूकनायक” मधील अग्रलेख हे अस्पृश्य समूहामध्ये जनजागृती व आत्मभान निर्माण करू लागलेले होते.
सदरच्या काळी कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली “माणगांव” या ठिकाणी दि.२१ मार्च १९२० साली अस्पृश्यांची मोठी परिषद भरविण्यात आलेली होती. या परिषदेचे अध्यक्ष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी अध्यक्षीय पदावरून बोलताना म्हणाले होते की, अस्पृश्यांच्या मुक्तीचा मार्ग, स्वाभिमानी जीवन व त्यांच्या उद्धारांची नवीन दिशा व धोरण हे मुद्देसूदपणे परिषदेत मार्गदर्शन केलेले होते. सदरच्या भाषणाने अस्पृश्य वर्गात नवसंजीवनी व चैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत आनंद झाला होता. माणगांवच्या परिषदेत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, अस्पृश्य वर्गाला त्यांचे दु:ख जाणणारा खरा नेता मिळालेला आहे त्यामुळे अस्पृश्य वर्गाचे भविष्य उज्वल आहे असे गौरवपूर्ण उदगार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काढलेले होते. याप्रमाणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यास सुरुवात झालेली होती.
या देशातील “अस्पृश्य” समजले गेलेल्या करोडो वर्ग समुहाची अस्पृश्यतेच्या गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्तता करून त्यांना “माणुसकीचे” हक्क व अधिकार मिळवून देणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणेसाठी अस्पृश्य समुहाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय प्रगतीच्या विकासाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य वर्ग समुहाची संघटना स्थापन करणेचा निर्णय घेतला. अस्पृश्याचे हक्क, अधिकार व समता हे उद्देश व धोरण ठरवून त्यांनी सन १९२४ साली मुंबई येथे “बहिष्कृत हितकारणी सभा” या सामाजिक संघटनेची आधिकृत स्थापना करून सदर संघटने मार्फत सामाजिक सुधारणा व समता प्रस्थापित करणेसाठी देशात प्रथमच सन १९२७ साली महाड चवदार तळ्याच्या पाण्यासाठी आपल्या हजारो अनुयाबरोबर महाड येथे सत्याग्रह सुरु केलेला होता आणि सन १९३० साली नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह केलेला होता. सदरच्या सत्याग्रहामुळे अस्पृश्य समाजात माणुसकीच्या हक्काची जागृती होऊ लागलेली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तमाम अस्पृश्य समूह एकत्र येऊन चळवळीच्या आंदोलनात सामील होऊ लागलेले होते. सन १९२५ साली संघटने मार्फत सोलापूर येथे अस्पृश्यांच्या मुलांसाठी “विद्यार्थी वसतिगृह” सुरु केलेले होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२७ साली देशात सामाजिक समता निर्माण होणेसाठी “समता समाज संघ” या नावाची संस्था स्थापन केलेली होती. सन १९२७ साली “बहिष्कृत भारत” हे साप्ताहिक सुरु केलेले होते. सन १९३१ चा मुखेडचा सत्याग्रह सुरु केलेला होता. महामानव डॉ. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून या देशातील तमाम अस्पृश्य दलित वर्गासाठी अहोरात्र कष्ट घेत होते. सन १९३० साली लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्य दलित वर्गाच्या न्याय हक्काचा “खलिता” (मेमोरॅडम) त्यांनी मांडलेला होता. हा खलिता दलिताच्या हक्कासाठीचा भारतीय इतिहासात अधोरखित झालेला आहे. अस्पृश्य समूहाच्या मुक्तीसाठी सातत्याने सत्याग्रह लढे, संघर्ष सुरु होता. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय या विचारांच्या तत्वावर देश उभा राहावा या तत्वाचे असलेमुळे ते लोकशाहीवादी होते. या देशात लोकशाहीची निकोप वाढ व्हावी. अस्पृश्य, आदिवाशी, भटके- विमुक्त, कामगार, शेतकरी इत्यादींचे शोषण होऊ नये म्हणून त्यांनी सन १९३६ साली “स्वतंत्र मजूर पक्षाची” स्थापना केली होती. सन १९३७ साली मुंबई कायदे मंडळाच्या निवडणुकीत त्यांनी १५ लोक प्रतिनिधी (आमदार) प्रचंड बहुमतांनी निवडून आणलेले होते.
सन १९४२ साली महामानव डॉ. बाबासाहेबांनी अखिल भारतीय दलित फेडरेशन (शेड्यूल काष्ट) या पक्षाची स्थापना केलेली होती. देशात वेगवेगळे अनेक बदल घडू लागलेले होते. देशातील दलित समाज्याच्या प्रगती व मुक्तीसाठी शेड्यूल काष्ट फेडरेशनच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय लढे, चळवळी, आंदोलने, मोर्चा उभी केलेली होती. दलितांच्या मुक्ती संग्रामात सामाजिक, राजकीय, आर्थिक हे प्रश्न वेगळे असू शकत नाहीत असे डॉ. बाबासाहेबांना वाटत असत. त्यामुळे त्यांना अखिल भारतीय स्थरावरचा सर्व समावेशक असा रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता दिसून येते. त्या दृष्टीने डॉ. बाबासाहेबांनी सर्वाशी विचार विनिमय करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करणेचा निर्णय घेतला व या देशातील तमाम दलित अस्पृश्य, आदिवाशी, भटके, विभुक्त, शोषित, गरीब, भूमिहीन, मजूर, कामगार, शेतकरी इत्यादींच्या मुलभूत प्रश्नावरती आवाज उठवून न्याय देणारा पक्ष असावा असे डॉ. बाबासाहेबांना वाटत होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे “शेड्यूल काष्ट फेडरेशन” हा पक्ष विसर्जित करून “अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष” स्थापन करणेची घोषणा केली व १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयासह बौध्द धम्माची दिक्षा घेतली होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन महिन्यातच म्हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले हे अत्यंत धक्कादायक व वेदनादायक असलेमुळे तमाम भारतीयांना हा फार मोठा धक्का बसलेला होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेबाच्या खुल्या पत्रावर आधारित असलेल्या त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष स्थापन करणेचे त्यांच्या अनुयायानी सर्वानुमते ठरविण्यात आले होते. त्यानंतर दादासाहेब गायकवाड, एन शिवराज, बँ. खोब्रागडे इत्यादी नेत्याच्या नेतृत्वाखाली सन १९५८ साली नागपूर येथे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना करणेत आली. सामाजिक, समता, आर्थिक या तीन प्रश्नावरती पक्षाने काम सुरु करणेत आलेले होते. परंतु काही दिवसानंतर रिपब्लिकन पक्षात गट पडले व पक्षाच्या फुटीचे ढग गडद होत गेले. डॉ. बाबासाहेबांची फौलादी संघटना म्हणून नांव लौकिक असलेला रिपब्लिकन पक्ष अनेक गटा तटात विभागला गेला होता. नंतर दलित पँथरचा उदय झाला. दलित पँथर ही संघटना शोषणाच्या विरुद्ध आक्रमण व लढाऊ होती. परंतु त्याही संघटनेत गट पडले होते.
आंबेडकरी संघटना एकत्र येवून अध्यक्षीय मंडळ स्थापन करून साधारण सन १९९९ साली रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार हे लोकसभेस निवडून आलेले होते. त्यामध्ये मा.रा. सु.गवई, मा.प्रकाश आंबेडकर, मा. रामदास आठवले, मा. जोगेंद्र कवाडे हे निवडून आलेले होते. रिपब्लिकन पक्षाचा इतिहास हा फार मोठा आहे.
सध्या आंबेडकरी पक्षात व संघटनेत अनेक गट- तट आहेत ते पाहूया:- १)वंचित बहुजन आघाडी २) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ३) रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (गवई) ४) पीपल्स रिपब्लिक पार्टी (कवाडे) ५)रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) ६) स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष (संसारे) ७)डेमोक्रॅाटिक रिपब्लिक पार्टी ८) बहुजन समाज पार्टी ९) आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी १०) आझाद समाज पार्टी ११) आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया १२)डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी १३) बहुजन समाज परिवर्तन पार्टी १४) पँथररिपब्लिकन पार्टी १५) बहुजन महासंघ १६) प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी १७) बहुजन रिपब्लिकन एकता पार्टी १८) प्रबुद्ध भारत प्रजासत्ताक पार्टी १९) बहुजन रिपब्लिक सोशॅलिस्ट पार्टी २०)भारतीय बहुजन क्रांती दल २१)भारतीय रिपब्लिकन पक्ष २२) बहुजन विकास आघाडी २३) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिकॉमिस्ट) 24)रिपब्लिकन प्रेसिडम पार्टी ऑफ इंडिया २५) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल) २६) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोरीपा) २७) ब्लॅक पॅथर २८) बहुजन मुक्ती पार्टी २९)बहुजन वॉलिटियर फोर्स ३०)पी.पी.आई ३१)रिपब्लिकन बहुजन सेना ३२) रिपब्लिकन जनशक्ती पक्ष ३३) युथ रिपब्लिकन (भाईसंगारे) ३४) भारतीय दलित क्रोबा ३५) अ.भा. रेवोल्युशनरी शोषित समाज संघ ३६) रिपब्लिकन सेना ३७) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) ३८) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गायकवाड) ३९) नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी ४०) भीम टायगर युवा सेना ४१) संविधान वादी रिपब्लिकन पक्ष ४२) भीम आर्मी ४३) आंम्बेडक्राईट पार्टी ऑफ इंडिया (मानकर) ४४) भीमसेना ४५) भीम टायगर सेना ४६)बामसेफ (मेश्राम) ४७) बामसेफ (अनेकगट) ४८) मुलनिवासी संघटन इत्यादी अशा प्रकारच्या अनेक पक्ष व संघटना आहेत.

देशातील सामाजिक चळवळी ह्या परिवर्तनवादी विचारावर चालतात. डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेवर दलितांच्या संघटना कार्यरत असल्याचे सांगतात, तरीसुद्धा या पक्ष व संघटना एक होत नाहीत, हे वेदनादायक आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांनी मृत झालेल्या अस्पृश्य दलित समाजाला नवसंजीवनी देऊन जिवंत केले. एक चांगले घर दिले होते. दलित बौद्ध, आदिवासी, भटके विमुक्त, मागासलेले घटक, शेतकरी, कामगार, शोषित वंचित यांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी एकत्र येणे हे परमपूज्य डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा विजय ठरेल.
संदर्भ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे
राजकीय विचार डॉ. शंकरराव खरात

Views: 87
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ॲड.विद्याताई मोटे यांच्या संकलपनेतून तरुणांना मिळणार रोजगार…विश्वराज डेअरीचे काम युद्ध पातळीवर सुरू

ॲड.विद्याताई मोटे यांच्या संकलपनेतून तरुणांना मिळणार रोजगार...विश्वराज डेअरीचे काम युद्ध पातळीवर सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)