ॲड.विद्याताई मोटे यांच्या संकलपनेतून तरुणांना मिळणार रोजगार…विश्वराज डेअरीचे काम युद्ध पातळीवर सुरू
साध्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई मोटे यांच्या संकल्पनेतून प्रेरणेने अनेक तरुणांना नोकरी व्यवसायाची संधी मिळणार आहे. यासाठी साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून व विद्यालय मोटे यांच्या संकल्पनेतून दूध डेअरीचा मोठा प्रोजेक्ट चे काम युद्धपातळीवर सुरू आहे
यातून अनेक तरुणांना रोजगार निर्मिती होणार आहेसांगली जिल्ह्यातील चितळे डेअरी नंतर दोन नंबरचा मिल्क प्रॉडक्ट बनवण्याची क्षमता असलेला प्लांट ग्रामीण भागात म्हणजे विभूतवाडी ता.आटपाडी येथे उभा राहत आहे.तसेच सांगली, सोलापूर बेल्ट मधील पहिलाच चीज प्लांट आहे…सांगोला, महूद, पिलीव ,तासगाव ,कडेगाव, रायगाव ,वडूज, दहिवडी, म्हसवड.. या ठिकाणी बल्क कुलर व चीलिंग सेंटर होणार आहेत… कमीत कमी पाच हजार लिटर पेक्षा जास्त दूध हँडलिंग या सेंटर्स मधून होणार आहे.
डेअरीमार्फत पुढील सेवा उपलब्ध केल्या जातील..शेतकऱ्यांना दुधाची बिले त्यांच्या इच्छेप्रमाणे घेता येतील जसे की रोजच्या रोज, पाच दिवसांनी,दहा दिवसांनी…तसेच मोफत जनावरांची डेअरीमार्फत आरोग्य तपासणी.. त्यासाठी आपण डेरीमार्फत veterinary डॉक्टरांची नेमणूक करत आहोत… तसेच गाय गोठा अनुदान उपलब्ध करून देणे तसेच ..अधिक सरकारी योजना जशा येत जातील तशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ करून देणे.. त्यासाठी डेरीमार्फत एक कर्मचारी नेमणूक करून देत आहोत. सद्यस्थितीमध्ये जे दूध संघ रेट देत असतील त्यांच्यापेक्षा दुधाचा दर जास्त असणार आहे…
तसेच विभूतवाडी,गुळेवाडी, गारुडी, झरे..या परिसरामध्ये आपण गेली दोन वर्षे दुधाचा रेट दोन ते तीन रुपये जास्त देत आहे आपण त्या भागामध्ये खात्री करू शकता.. जे शेतकरी दूध उत्पादन व्यवसायाबरोबर.. दूध वाहतुकीचा व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांना डेअरीमार्फत गाडीसाठी 35%अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.तसेच बल्क कुलर अथवा चीलिंग सेंटर साठी अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत .विश्वराज डेअरी पहिलीच डेअरी अथवा दूध संघ आहे की जो एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या दारातून दूध उचलणार आहे…
त्याचे पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे. कोणताही एजंट अथवा कमिशन संकलक नसेल.. दूध थंड करून देणाऱ्या बल्क कुलर अथवा चिलिंग सेंटरला फिक्स स्वरूपात चिलिंग चार्जेस दिले जातील.. सर्व यंत्रणा डेअरी मार्फत राबवली जाईलचांगल्या प्रतीच्या पशुखाद्याचा पुरवठाही थेट डेअरीमार्फत केला जाईल.. डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना डेअरीमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल..
.डेअरी मधून प्रत्यक्ष 270 प्लस युवकांना रोजगार मिळणार आहे व तसेचअप्रत्यक्षरीत्या पूरक व्यवसायाच्या निमित्ताने पाच हजार शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती होणार आहे. डेअरी मध्ये तयार होणारे पदार्थ दररोज पुणे,मुंबई,बेंगलोर,हैदराबाद सारख्या मेट्रो सिटीज मध्ये क्लाऊड शॉप मार्फत थेट ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत…तसेच USA,UK, USSR मधील देश आणि गल्फ कंट्रीज मध्ये प्रीमियम कॉलिटी चे पदार्थ निर्यात केले जाणार आहेत..
. डेरीमार्फत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची यादी खालील प्रमाणे:गाय–गोठा अनुदान योजना 100% पर्यंत(मर्यादित रक्कम)शरद पवार ग्रामसमृद्धी – गाय गोठा 100% पर्यंत (मर्यादित रक्कम),Dairy Entrepreneurship Development Scheme (DEDS) – केंद्र 25% (सामान्य) / 33% (SC/ST),Animal Husbandry Infrastructure Development Fund (AHIDF) – केंद्र व्याजदरात सवलत + भांडवल सहाय्य,Breed Multiplication Farm Entrepreneurship – केंद्र50% पर्यंत,National Livestock Mission (NLM) – केंद्र 50% पर्यंत,किसान क्रेडिट कार्ड (KCC) – केंद्र व्याजदर सवलत (सब्सिडी स्वरूपात)जनावरांसाठी कमी दरात विमा उपलब्ध करून दिला जाणार आहे तरी वरील प्रमाणे शेतकऱ्यांना,तरुणांना साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.


