कॅन्सर उपचारासाठी मुंबईत येणारया रुग्ण व कुटुंबियांना सोयिबाबत अमित घायाळ यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
कॅन्सर उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानाने राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आता दोन नवीन ट्रान्झिट होम सुरू करत आहोत.
घरापासून दूर राहून उपचार घेत असताना रुग्णांना आधार, सुरक्षित वातावरण आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न सदैव राहिला आहे. आता या नवीन ट्रान्झिट होमच्या माध्यमातून अधिक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करता येणार आहे याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे.
लवकरच या दोन्ही ठिकाणांचे उद्घाटन होणार असून अधिकृतपणे रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. कामगार नगर मुंबई कुर्ला येथे हे दोन्ही भव्य अपना घर असणारं आहेत,वं देशातील कोणत्याही राज्याच्या जिल्ह्याच्या,गावाच्या कॅन्सर रुग्णांना इथ मोफत,राहणे,उत्तम भोजन ,प्रवास सुविधा मोफत मिळणार आहेत. आपले सर्वांचे सहकार्य, आणि प्रेम सदैव असेच लाभत राहो हीच सोशल क्षेत्रात CSR मधील फार मोठया प्रकल्पापर्यंत पोहचण्याची संधी मिळाली आहे याच नक्कीच महत्वपूर्ण गरजू व्यक्तीसाठी फलीत होईल…
मिळून आणखी कमाल आणि प्रभावशाली काम उभारूयात.


