• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बोराडीत आठवडे बाजारात मुलींची छेडछाडीचा जाब विचारला म्हणून ग्राम सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण !आठवडे बाजारात दहशत वाजवणाऱ्या टवाळखुरांची दिंड काढा नागरिकांची मागणी…

माणगंगा by माणगंगा
November 8, 2025
in Uncategorized
0
बोराडीत आठवडे बाजारात मुलींची छेडछाडीचा जाब विचारला म्हणून ग्राम सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण !आठवडे बाजारात दहशत वाजवणाऱ्या टवाळखुरांची दिंड काढा नागरिकांची मागणी…

बोराडीत आठवडे बाजारात मुलींची छेडछाडीचा जाब विचारला म्हणून ग्राम सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण!

आठवडे बाजारात दहशत वाजवणाऱ्या टवाळखुरांची दिंड काढा नागरिकांची मागणी…

     बोराडी - बोराडी गावात एक-दोन दिवसात शेती  कामाला किंवा शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोर पोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी तालुका पोलीस स्टेशनने व दामिनी पथकाने त्वरित लक्ष करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण गुरुवारी आठवडे बाजारात चार-पाच टवाळखोर मुलांनी मद्यप्राशन करून दुकानदारांसह कामाला जाणाऱ्या मुलींची छेड काढली या कारणावरून गावकऱ्यांनी त्यांना चांगला चोप दिला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले पण अद्याप गुन्हा दाखल न झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत बोराडी गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
    बोराडी  येथील आठवडे बाजारात मुलींची छेड काढणाऱ्यांना जाब विचारणे ग्राम सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. छेड काढणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येऊन या ग्राम सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना काल गुरुवार सायंकाळी घडली. याबाबत गावकऱ्यांनी मध्यस्थी करून पोलिसांना पाचारण करण्यात आले व मारहाण करण्यात तरुणांना पोलिसांचा ताब्यात देण्यात आले. पण अशा टवाळखोर पोरांची गावातून दिंड काढावे जेणेकरून मुलींची छेडछाड करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
         बोराडी  आठवडे बाजारात काही टवाळखोर तरुण बाजारात दुकानदारांना, आईस्क्रीमच्या दुकानदारांना, कापड दुकानदारांना व भाजीपाला यांना विनाकारण मारहाण करून पैसे न देता वस्तू घेऊन जात होते.  त्यातच बाहेरगावाहून काम करणाऱ्या मुली बाजार करण्यासाठी बाजारात गेले असता त्या मुलींची छेड काढण्यास या टवाळकर पोरांनी सुरुवात केली याबाबत माहिती मिळताच ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य सना पावरा, विकी शिंदे, बादल पावरा यांनी घटनास्थळी जाऊन मुलांची समजूत काढून तुम्ही घरी जा मुलींचे नाव घेऊ नका असे सांगितले पण त्या मुलांनी ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांवरच हल्ला करून त्यांना जखमी केले व गावातील बाजारपेठेत दहशत माजवत गेले हे सर्व पाहताच काही गावकऱ्यांनी त्यांना पकडून पोलिसांना बोलविले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांना सोडून देण्यात आले. यामुळे बोराडी सह परिसरात टवाळकरांचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे यास या पोलिसांनी खत पाणी घातले आहे त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी बोराडीकरांनी केली आहे.
    बोराडी हे गाव बाजारपेठेचे मोठे गाव असल्याकारणाने या ठिकाणी बाजार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आदिवासी भागातील 50 ते 60 खेळाडू लोक येतात यातच परिसरातील मोलमजुरी करण्यासाठी आदिवासी भागातील मुले हे बाहेरगावी पोलिसांच्या नाकावर टिचकून जात असतात यातील बऱ्याचशा गाड्या बोराडीत थांबून मुलं कपडे किंवा बाजार करतात अशा मुलींची छेड काढणाऱ्या टवाळकरांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे याबाबत अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रार करून देखील या टवाळकरांचा बंदोबस्त करण्यात येत नाही.
       बोराडी आठवडे बाजारात बाहेर गावाहून व्यापारी वर्ग येत असतात यातील कापड विक्रेता यास टवाळखोरपोरांनी फायटर व लोखंडी रौड चा दणका मारल्याने डोक्याला दुखापत झाली होती. तसेच काही भाजी विक्री त्यांना व आईस्क्रीमच्या दुकानावर आईस्क्रीम खाऊन पैसे न देता खुर्च्या फेकून शिवीगाळ केली व बाजारात घरी जाणाऱ्या मुलींची छेड काढली.

पोलिसात गुन्ह्याची नोंद नाही:

मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याने तात्काळ शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित तरुणांविरुद्ध तक्रार करण्यास गेले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी उडाउडीची उत्तरे दिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्राम सुरक्षा दलाची भूमिका:-

बोराडी गावातील ग्राम सुरक्षा दल गावातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी सक्रिय असते. मात्र, छेड काढणाऱ्यांनी थेट पदाधिकाऱ्यावरच हल्ला केल्यामुळे गावातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदस्यांवर हल्ला होऊन देखील पोलिसात गुन्हा दाखल न झाल्यामुळे यापुढे ग्राम सुरक्षा दलासाठी युवक काम करणार नसल्याचे सांगितले जात आहे.

    *मुलींच्या छेड छाडीचे प्रकारात वाढ*:-

बोराडी येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर परिसरातील लोक व महिला मोठ्या प्रमाणावर जीवन आवश्यक वस्तू खरेदीसाठी येत असतात व शाळा भरल्याची वेळ व शाळा सुटण्याच्या वेळेस देखील बाजारपेठेत व शाळेच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर टवाळकरांची मोटरसायकलसह गर्दी झालेली दिसून येते यातूनच काही टवाळखोर मुलींची छळ काढण्यास माहीर झाल्यामुळे यांचा बंदोबस्त केला नाही तर पुढे जाऊन मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत पालक वर्ग आणि चिंता व्यक्त केली आहे.

Views: 37
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
चाळीसगाव नगरपालिका संदर्भात शिवसेनेची जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न संपन्न..

चाळीसगाव नगरपालिका संदर्भात शिवसेनेची जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न संपन्न..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)