हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने माधवी पडळकर यांनी साधला मतदाराशी संवाद
आटपाडी तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे वारे जोमात सुरू आहे . यानिमित्ताने माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या सौभाग्यवती माधवी पडळकर यांनी हळदीकुंकवाच्या निमित्ताने महिलांशी संवाद साधलाया हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये महिलांनी हिरहिरीने भाग घेतला व येणाऱ्या जिल्हा परिषद च्या उमेदवार माधवी पडळकर यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिला
यावेळी माधवी काकी पडळकर यांनी महिलांना संबोधित करताना महणल्या.गोपीचंद पडळकर व माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी गावातील केलेली विकास कामे, तसेच जिल्हा व महारष्ट्र भर कशा प्रकारे निधी देतात याचा प्रकर्षाने उल्लेख केला. येत्या काळात जिल्हा परिषद सदस्य व जील्हा अध्यक्ष पद आपल्याला मिळू शकते त्यामुळे आपल्याला हवा तेवढा निधी मिळू शकतो हा विश्वास त्यांनी यावेळी दिला. सरपंच चंद्रकांत पावणे यांनी वेळोवेळी आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच कोणत्याही कामासाठी जनतेला आमदार गोपीचंद पडळकर हे उपलब्ध असतात असे सांगितले.
तसेच गावात झालेल्या व येणाऱ्या कामांची माहिती दिली. समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी समाज कल्याण चे पदभार सांभाळले आणि निधी चा पाऊस पाडला ,तर विभुतवाडी सारख्या गावात न भूतो न भविष्यती असा निधी दिला. तसेच त्यांनी कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांसाठी देव दर्शन घडावे त्यासाठी बाळू मामा, मायक्का चिंचणी व आरेवाडीचा बिरोबा असे निजोजन केले आहे .
संघर्षात विभुतवाडी गाव पडळकर बंधूंच्या मागे कसे राहिले होते याचा उल्लेखही यांनी यावेळी केला. येत्या काळात आम्ही कुठेच कमी पडणार नाही याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. JSW कंपनीच्या माध्यमातून ३००० लोकांना रोजगार मिळेल तेही कोणताही स्वार्थ न साधता असे ही त्यांनी यावेळी सांगितले.


