त-हाडी गणातून उमेदवारीसाठी सोनल खोंडे यांची जोरदार चर्चा
त-हाडी- प्रतिनिधी :
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष हे त-हाडी गणातील आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे.राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील उत्साही आणि कार्यतत्पर
महिला अध्यक्ष सोनल खोंडे यांनी कबंर कसली असल्याचे महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख महेंद्र खोंडे यांनी बोलताना सांगितले आहे
नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहे. त्यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या संपूर्ण त-हाडी परिसरात जोमाने सुरू आहे. सोनल महेंद्र खोंडे यांनी अल्पावधीतच ग्रामविकास, पाणीपुरवठा, शिक्षण, शेती आणि युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करून सर्वसामान्य जनतेत चांगली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे व लोकसंपर्कामुळे ग्रामस्थ त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.
सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेली धडपड, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविलेले उपक्रम आणि गावोगावी निर्माण केलेली सकारात्मक उर्जा यामुळे त्यांचा प्रभाव सतत वाढत आहे.
त-हाडी गणातील स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये महिला अध्यक्ष सोनल खोंडे हे नाव चर्चेचा केंद्रबिंदू बनले असून, विविध समाजघटकांकडून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
ग्रामविकासासाठी स्पष्ट दृष्टीकोन, जनतेशी घट्ट नाळ आणि नव्या विचारांचे नेतृत्व अशी प्रतिमा असलेल्या या तरुण नेत्याकडून ग्रामस्थांना नवे परिवर्तन अपेक्षित आहे.
“गावोगावी विकासाची नवी दिशा मिळवण्यासाठी आता तरुण नेतृत्वाची गरज आहे सोनल खोंडे यांच्यात ती क्षमता आहे,” असे मत महेंद्र खोंडे यांनी व्यक्त केले आहे.


