भाजपचा पहिला नगराध्यक्ष करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील शुक्रवारी आटपाडी
माणगंगा न्युज
आटपाडी- आटपाडीचा पहिला नगराध्यक्ष भाजपाचाच करण्यासाठी उद्या शुक्रवारी दुपारी बारा वाजता भाजपची तोफ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची तोफ धडाडणार आहे. ते काय बोलणार याकडे आटपाडीकरांच्या नजरा लागल्या आहेत.
आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक लागली आहे. यामध्ये पहिला मानाचा नगराध्यक्ष करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि संयुक्त विकास आघाडी यांच्यात मोठी रस्सीखेच लागली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी शिक्षक पदाचा राजीनामा देऊन यु. टी. जाधव यांना आखाड्यात उतरवले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख दोघेही एकत्र आल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडू लागल्या आहेत. मानाचा पहिला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाची दोन नंबरची फळी उद्यापासून मैदानात उतरणार आहे. उद्या शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले आहे.
त्यांची आटपाडीत तोफ धडाडणार आहे. त्यानंतर शनिवारी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रचार सभेचे आयोजन केले आहे. भाजपाच्या या दोन दिग्गज मंत्र्यांची तोफ कोण कोणता दारूगोळा उडवणार याची उत्सुकता जनतेला लागली आहे.


