• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विश्वनाथ प्रताप सिंह – डॉ पी सी अलेक्झांडर संवाद….उमेश काशीकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
November 27, 2025
in Uncategorized
0
विश्वनाथ प्रताप सिंह – डॉ पी सी अलेक्झांडर संवाद….उमेश काशीकर यांचे मनोगत !!

विश्वनाथ प्रताप सिंह – डॉ पी सी अलेक्झांडर संवाद

उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

आज भारताचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांची पुण्यतिथी.

मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक २७ नोव्हेंबर २००८ रोजी विश्वनाथ प्रताप सिंह (व्ही पी सिंह) यांचे निधन झाले.

मुंबईवरील अतिरेकी हल्ला ही बातमी जागतिक माध्यमांवर गेली होती.

स्वाभाविकच देशभरातील वृत्तपत्रांचे रकाने मुंबई हल्ल्यासंबंधी बातम्यांनी भरले होते.

सन २००८ साली महाराष्ट्राचे राज्यपाल होते एस सी जमीर. त्यांनी व्ही पी सिंह यांचे निधनावर शोक व्यक्त केला होता.

राज्यपाल डॉ. अलेक्झांडर – व्ही. पी. सिंह संवाद

महाराष्ट्राचे सर्वात प्रदीर्घ काळ राज्यपाल असलेले डॉ पी सी अलेक्झांडर (जानेवारी १९९३ – जुलै २००२) हे महाराष्ट्रात येण्यापूर्वी १९८८- १९९० अशी दोन वर्षे तामिळनाडूचे राज्यपाल होते.

डॉ अलेक्झांडर हे तामिळनाडू येथे राज्यपाल असतानाच डिसेंबर १९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांचे राष्ट्रीय आघाडी सरकार केंद्रात सत्तेवर आले.

काही महिन्यातच नव्या सरकारने पूर्वीच्या सरकारने नियुक्त केलेल्या १८ राज्यपालांना एकदम राजीनामे देण्यास सांगितले.

त्यानुसार तामिळनाडूचे राज्यपाल असलेल्या डॉ अलेक्झांडर यांनी मे १९९० मध्ये तामिळनाडूच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला.

परंतु दोन ओळींचे पत्र पाठवून राज्यपालांना राजीनामा मागितला गेल्याचे तीव्र शल्य डॉ अलेक्झांडर यांच्या मनाला लागले होते.

अनेक वर्षानंतर देखील डॉ अलेक्झांडर यांना हे शल्य बोचत होते. त्यांच्या मते शासनात एखाद्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला देखील नोकरीवरून काढायचे असेल तर त्याला काही प्रोसिजर असते. त्याला त्याचे म्हणणे मांडायची संधी दिली जाते. इथे मात्र राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तीला दोन ओळींचे पत्र पाठवून राजीनामा मागितला गेला !!

तामिळनाडू प्रकरणानंतर तीन वर्षांनी, जानेवारी १९९३ साली पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी डॉ अलेक्झांडर यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नेमले.

कालांतराने डॉ अलेक्झांडर यांची माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांची मुंबईतील राजभवनात भेट झाली.

या भेटीतील चर्चेबद्दल डॉ अलेक्झांडर यांनी ‘थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर’ या आपल्या पुस्तकात लिहिले आहे ते असे:

“आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना (माजी पंतप्रधान) व्ही पी सिंह हे मुंबई येथे वैद्यकीय उपचारासाठी आले होते व त्यांचे वास्तव्य राजभवन येथे होते. त्यावेळी आपण सिंह यांना विचारले की तुम्ही ज्या पद्धतीने राज्यपालांना वागवले (काढून टाकले) त्याबद्दल आज खंत वाटते का ? राष्ट्रपतींकडून पत्र पाठवून राज्यपालांना काढून टाकण्याची पद्धत योग्य नव्हती. आपल्या सरकारचा तो निर्णय मला आश्चर्यचकित आणि व्यथित करणाराही होता. केवळ मागच्या सरकारने (आमची) नियुक्ती केली होती या एकाच कारणावरून राज्यपालांविरुद्ध इतके टोकाचे पाऊल उचलून पदावरून दूर केल्याचे मला दु:खही झाले आणि धक्का देखील बसला. यावर व्ही पी सिंह यांनी प्रांजळपणे कबूल केले की (अशा प्रकारे राज्यपालांचे) राजीनामे घेण्याची कृती ही मोठी चूक होती. तसे व्हायला नको होते, असे आता वाटते.”

अलेक्झांडर लिहितात… “या विषयावर मी तिथेच संभाषण थांबवले, कारण व्ही पी सिंह आता माझे अतिथी होते व त्यांना आणखी संकोच वाटेल असे बोलण्याचा माझा हेतू नव्हता.”

… महा खंत

अलेक्झांडर यांच्या दुर्दैवाने पुढे २००२ साली आणखी मोठी खंत त्यांच्या वाट्याला आली.

डॉ अलेक्झांडर यांचे नाव राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित झाले होते. परंतु ए पी जे अब्दुल कलाम यांचे नाव ऐनवेळी पुढे आले आणि शेवटी त्यांना उमेदवारी देण्याचे ठरले.

डॉ अलेक्झांडर यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निघून गेले.

Views: 75
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडीत नालंदा बुद्ध विहार,मध्ये संविधानाचा जागर ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

आटपाडीत नालंदा बुद्ध विहार,मध्ये संविधानाचा जागर ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)