आटपाडीत अजब राजकारणाची गजब कथा..नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचाच शिवसेनेला पाठिंबा
राजकारणामध्ये कधी काही होईल हे सांगता येत नाही सध्या आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक सुरू आहे यामध्ये एका युवकांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता
पण त्याचे उखाणे शिवसेना पॅनलला पाठिंबा दिला आहे.आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यातच नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या गुरुप्रसाद कवडे याने प्रचाराच्या मध्यावर शिवसेनेला पाठिंबा दिला.
आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक अनेक कारणाने सुरुवातीपासून चर्चेत राहिली आहे. बाजार समितीचे माजी संचालक पंढरीनाथ नागणे, दी. बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौडे, सोमनाथ भिंगे, प्रदीप देशमुख, पंडितराव देशमुख, सोमनाथ भिंगे, नितीन सागर अशा अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित गलांडे यांनी विकास कामात शिवसेना आघाडीवर असल्याने शिवसेनेला नगरपंचायत निवडणुकी पाठिंबा दिला. या घडामोडीनंतर भिंगेवाडीत मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम समाजाने चक्क तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मुस्लिम समाजाचे तेराशेवर मतदान संख्या आहे. शिवसेनेने खेळलेल्या या खेळीने विरोधकांना बरेच बॅकफूटवर घालवले आहे.
एवढ्यावरच शिवसेना थांबली नसून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेले सादिक खाटीक यांना उमेदवारी माघारी घेऊन पाठिंबा मिळवण्यात यश श्री. खाटीक यांनी शिवसेनेची विकासाची भूमिका पटल्याने पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.
त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाची अपक्ष निवडणूक लढत असलेले गुरुप्रसाद कवडे यांचा पाठिंबा मिळवून दोन्ही विरोधकांना जबर धक्का दिला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नगराध्यक्ष उमेदवारानेच शिवसेनेला पाठिंबा दिल्याची आश्चर्यकारक घटना आटपाडीत घेतली आहे. त्याची एक चर्चा रंगली आहे


