रयत सेवक माननीय शिवाजी टीकोळे सह सौ सुनंदा शिवाजी टिकवणे शिक्षक दांपत्यांची जाहीर संग्रहालय खरसुंडीला सदिच्छा भेट ……
आज गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी रयत शिक्षण संस्थेतील महर्षी शिंदे विद्यालय एनकूळ तालुका खटाव जिल्हा सातारा येथून सेवानिवृत्त झालेले माननीय शिवाजी काशिनाथ टिकोळे बी.एस.सी .बी.एड यांनी रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक ,प्रसिद्ध साहित्यिक ,कवी, का ष्ट शिल्पकार ,रमेश जावीर निर्मित जावीर का ष्टशिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे सदिच्छा भेट दिली
.संग्रहालयातील नैसर्गिक दृष्ट्या पक्षी ,प्राणी ,मानवी आकारातील 300 हून अधिक का ष्ट शिल्पे व चित्रकार सुधीर रमेश जावीर सह महाराष्ट्रातील चित्रकारांची प्रबोधनात्मक पेंटिंग पाहून” भारावून गेले .संग्रहालयाच्या अभिप्राय पुस्तकात श्री टिकोळ म्हणतात ,आज रोजी श्री रमेश जावीर सर यांच्या का ष्ट शिल्पसंग्रहालयात सदिच्छा भेट दिली .स्वतः इंग्रजी विषय शिक्षक असून देखील त्यांनी कास्ट शिल्पकलेच्या निर्मितीचा छंद चांगल्या पद्धतीने जोपासला .ते साहित्यिक असून कविता करण्याचा छंद वाखाण्याजोगा आहे .
मानवी जीवनात अनेक संकटे आल्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ही कास्ट शिल्प प्रतिकृती व संग्रहालयाची निर्मिती केली. खूप खूप शुभेच्छा सौ सुनंदा टीकुळे यानी रयत शिक्षण संस्थेत 33 वर्ष गणिताचे शिक्षिका म्हणून काम पाहिले त्यां सेवानिवृत्त मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले आहे .
तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथेही त्यांनी अध्यापन केले आहे .यावेळी जुन्या आठवणी जागृत झाल्या संस्थेतील प्रयोगशील साहित्यिक ,कवी ,कास्ट शिल्पकार रमेश जावीर यांचे कार्य कौतुक करेल तेवढे थोडे आहे .ही भावना व्यक्त केली .या संग्रहालय ला शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी सदिच्छा भेटी जरूर द्याव्यात असे आवाहन केले .रमेश जावीर यांनी श्री व सौ टीकोळे कुटुंबीयांचे आभार मानले .धन्यवाद दिले.


