जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
जि.प.प्रा. शाळा नं १ व २ निंबवडे ता. आटपाडी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले . यामध्ये जीपनदीप विद्यामंदिर कामथ या प्रशाळेने विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवीला.प्रश्नमंजुषा मध्ये कु. पुजा सरक, कु. विद्या मुढे व कु. सई मगदूम यांनी विशेष यश संपादन केले व जिल्हास्तरीय निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थीनींचे महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्यू. सोसा. कामथ चे चेअरमन महादेव चौरे ,सचिव दत्तू कोकरे ,माजी चेअरमन बी. एम. गरदडे ,माजी सचिव सी. एम. कोकरे , सर्व संचालक ,केंद्रप्रमुख विलास गळवे यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विदयार्थीनींना मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक वगरे बी. बी. यांची प्रेरणा, सहशिक्षक पाटील एम.एस .,बरकडे ए .डी . , सरक ए.आर. , बिडवे जी. एस. यांचे मार्गदर्शन व गरदडे डी. बी. , सरक ए .के., सरक एस. पी .यांचे सहकार्य लाभले.


