माया फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
प्रविण अहिरे
वाघडू ता. चाळीसगाव रोकडे येथे जि. प. प्राथमिक शाळेत माया फाउंडेशन मुंबई विरार यांच्या वतीने शाळेतील १२० विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
या कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर सह खोडरबर पेन्सिल पेन व आवश्यक शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील हे होते यावेळी माया फाउंडेशनच्या अध्यक्ष माया पाटील माजी सरपंच संदिप पाटील शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अजय जाधव दिपक पाटील राजधर शेलार दिगंबर पाटील सुनिल शेलार संदिप पाटील सुनिल पाटील मोहन गायकवाड सर्वज्ञ संदिप पाटील ऋषीकेश पाटील शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील विजय पाटील सर्व शिक्षक वर्ग उपस्थितीत होते. कार्यक्रम दरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगून नियमित अभ्यास करण्याचा संदेश दिला
शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन माया फाउंडेशनने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ व पालकांनी समाधान व्यक्त केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह वाढेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली असे उपक्रम हे समाज उपयोगी ठरत आहे


